पद्मावतला आम्ही केवळ तीन स्टार का देतोय? वाचा रिव्ह्यू सविस्तर

0

नाशिक : नील कुलकर्णी

कथानक : चित्तोडचा राजा रतनसिंग(शाहिद कपूर) मोती खरेदी करण्यासाठी राजकुमारी पद्मावती(दीपिका पदुकोन)च्या साम्राज्यात जातो आणि तिच्या प्रेमात पडतो इथून कथानकला सुरुवात होते. त्याचा लगेच विवाह होतो आणि पद्मावती चितौडची राणी होऊन राजमहालात येते.

रतनसिंगच्या कर्तृत्त्वाला पैलू पाडणारा आणि राजकीय डावपेज शिकवणारा त्याचा हुशार गुरु राघव चेतन त्याला नेहमीच राज‘निती’ शिकवत असतो. मात्र त्याच्या सहजीवनात एका खासगी गोष्टीत लक्ष दिल्यामुळे रतनसिंग राघव चेतन याला तडिपार करतो.

या अपमानाचा बदला घेण्यासाठी राघव चेतन अल्लाहऊद्दीन खिलजीला जाऊन मिळतो आणि चितौडगडवर आक्रमण करण्यास भाग पाडतो. पद्मावतीची बुद्धी आणि सौंदर्य अफाट आहे ते मिळाल्यानंतरच अल्लाउद्दीन खिलजील देशभर साम्राज्य वाढवू शकतो असेही सांगतो.

त्यानंतर खिलजी रतनसिंगावर हल्ला करतो आणि पद्मावती मिळवण्यासाठी जंगजंग पछाडतो. मात्र राजनीतिमध्ये वाकबगार असलेला रतनसिंग त्याच्याशी लढाई न करता तह स्वीकारतो. मात्र त्यातील अटीमध्ये तो पद्मावतीला पाहण्याची इच्छा व्यक्त करतो.

स्वत:चा पती आणि साम्राज्य अबाधित राहवे म्हणून पद्मावती यासाठी तयार होते मात्र खिलजी कपटी मनसुबे आखून पद्मावती मिळवण्यासाठी कट करतो. शेवटी आण बाण शान वाचवत नीतिमत्ता, लढाईचे नियम वापरुन लढणार्‍या रतनसिंगावर कपट आणि पाठीमागून हल्ला करुन प्रेमात आणि युद्धात नीतिमत्ता नसते असे सांगत खिलजी पद्मावतीसाठी चित्तोडवर हल्ला करतो…. रतनसिंगाचे काय होते? खिलजीचा पाडाव होतो का?  पद्मवती शील जपण्यासाठी टोकाची भूमिका का स्वीकारते हे पाहण्यासाठी दर्शकांनी एकदा तरी चित्रपटगृहात हा चित्रपट पाहावाच.

अभिनय : शाहिद कपूरचा अभिनय रणबिर कपुरच्या खलनायकी अभिनयात दाबला आहे.  दीपिका पदुकोनचा  अभिनय मस्त बाकींच्या कलाकारांनी त्यांच्या वाटेल्या आलेल्या भूमिकांचे सोनं केलं आहे. मात्र शेवटी एक प्रश्न अनुत्तरीत राहतो. भन्साळींनी मुख्य पात्रातील रतनसिंगापेक्षा नकारात्मक प्रवृत्तीच्या अल्लाउद्दीन खिलजीला इतके मोठे का केले?

का पाहावे : ज्यांना ऐतिहासिक चित्रपटात नव्या फॉर्ममध्ये पाहायला हवा त्याच्यासाठी हा नक्कीच एक चांगला चित्रपट आहे. तीन तास संपूणपणे उत्सुकता ताणून खूर्चीला खिळवून ठेवणारे कथानक हाच चित्रपटाचा यूएसपी आहे. बाकी संजय लीला भंन्साळीच्या इतर भव्यदिव्य चित्रपटांसारखाच पद्मावत देखील अतिभव्य, अ‍ॅनिमेशनचा प्रभावी वापर आणि कलाकारांच्या अभिनयाने सजलेला असाच आहे. दीपिका पदुकोन आणि रणबीरसिंगाच्या कसदार अभिनयासाठी चित्रपट पाहयला हवा.

संगीत : यातील गाणी ओठावर रुळणारी नसली तरी राजस्थानी लोकनृत्य असलेले घुमर नृत्याचे घुमेरे घुमेरे गाणे छान झाले असले तरी संगीतासाठी येणार्‍या दर्शकांचा हिरमोड होतो.

गेली अनेक दिवस ज्या चित्रपटासाठी इतका वाद झाला त्यामध्ये वादासारखे खरे तर काहीच नाही. अर्थात हा चित्रपट कट्स सुचवून दाखवण्यात आला असल्यानेही वादग्रस्त असे काहीच नाही.

मात्र ज्यांना इतिहास तोड मोड न पाहायचा असेल त्यांच्यासाठी हा चित्रपट नाही.  सिनेमॅटीक लिबर्टीचा सढळ हाताने उपयोग करुन हा चित्रपट तयार केला असल्याने बरेच अतिरंजीत/अवास्तव सिन्स चित्रपटात आहेत.

रेटींग :3 स्टार 

LEAVE A REPLY

*