अमिताभ बच्चन यांच्या पहिल्या तेलुगु चित्रपटाचा लूक रिलीज

0

मुंबई : बॉलिवूडचा ‘शहेनशहा’ अमिताभ बच्चन लवकरच दाक्षिणात्य (साउथ) चित्रपटात दिसणार आहेत. ‘सई रा नरसिम्हा रेड्डी’ या चित्रपटात त्यांची भूमिका असून चित्रपट निर्मात्याने अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या चित्रपटाचा लूक मोशन टीझर यूट्यूबवर प्रदर्शित केला आहे.

बिग बी ‘स्येरा नरसिम्हा रेड्डी’ या चित्रपटातूल तेलुगु चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. या चित्रपटात त्यांची एक लहानशी भूमिका आहे. यात अमिताभ साधूच्या भूमिकेत दिसत आहेत. पांढरे केस, लांब दाढी, कपाळावर लाल टीळा, भगवी वस्त्र असा त्यांचा हटके लूक या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात चिरंजीवी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट स्वातंत्र्यसैनिक यू नरसिम्हा रेड्डी यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट तेलुगु, कन्नड, तामिळ, मलयाळम या चार भाषांमध्ये डब केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

*