तरुणास झाडास बांधून मारहाण

0

नेवाशात चौघांविरोधात गुन्हा दाखल

नेवासा (का. प्रतिनिधी)-घरासमोरील झाडाला दिवसभर बांधून ठेवून मारहाण केल्याची घटना तालुक्यातील शिरसगाव येथे घडली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विठ्ठल भाऊराव गाडेकर (वय 22) रा. शिरसगाव ता. नेवासा याने फिर्याद दिली असून त्यावरुन जालिंदर लक्ष्मण आसने, नारायण सोपान गायकवाड, नारायण गायकवाडचा मेव्हाणा (नाव माहित नाही) व कडूबाळ सोपान गायकवाड (सर्व रा. शिरसगाव ता. नेवासा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत म्हटले की, 27 जून रोजी दुपारी 12.30 ते सायंकाळी 5 या दरम्यान आरोपी 1 ते 3 यांनी फिर्यादीस आमच्याविरुद्ध दिलेली फिर्याद मागे घे असे म्हणून शिवीगाळ करुन आरोपी नं. 1 याने फिर्यादीच्या कानामागे हाताने दोन फटके मारले.
त्यानंतर ही हकीगत फिर्यादी हा त्याची बहीण व दाजी यांना सांगण्यासाठी आरोपी नं.2 याचे घरासमोरुन जात असताना आरोपी नं. 4 याचे मदतीने अडवून आरोपी नं.4 याचे घरासमोरील बदामाच्या झाडास दोराने बांधून ठेवले व काठीने मांडीवर मारहाण केली. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 341, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

*