वेतनासाठी शिक्षकांचाही सुरु होणार लढा

शिक्षकांची सहविचार सभा संपन्न

0
दिंडोरी | दि. ४ प्रतिनिधी- माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे गेल्या तीन महिन्यापासून शासनाच्या आडमुठी धोरणामुळे सेवकांचे वेतन न मिळाल्याने सेवक मोठ्या आर्थिक कोंडीत सापडला आहें.हा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व संघटना बाजूला ठेवून एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या तालुका स्तरावर बैठका घेऊन सर्वाना एकत्र येण्याचा प्रयत्न होत आहे.
दिंडोरी येथील जनता इंग्लिश स्कुल मध्ये दिंडोरी तालुक्याची बैठक जिल्हा नेते के.के. अहिरे व सी.बी. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. त्यावेळी सर्वांनी एकत्र येऊन वेतन मिळण्यासाठी लढा देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

जिल्हा अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य सी.बी. पवार यांनी सांगितले की, आपले हक्काचे वेतन मिळत नसल्याने शिक्षक व कर्मचारी यांचे दैनंदिन जीवन आर्थिक परिस्थिमुळे विस्कळीत झाले आहे. कर्जाचे हप्ते, मुलांचे लग्न, शाळा प्रवेश, कुटुंबातील घरखर्च, या सर्व बाबी वेतनावर अवलंबून असल्याने आर्थिक कोंडी झाली आहे ,त्यामुळे संघटित लढा देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित यावे.आम्ही जिल्हा स्तरावर व शिक्षण मंत्र्याशी पण भेट घेतली होती व लढा चालूच ठेवला आहे.

शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाअद्यक्ष प्राचार्य के.के. अहिरे यांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून आपले वेतन होत नाही. हक्काचे पैसे मिळत नाहीत म्हणून दोन महिन्यांपासून आपण सलग आंदोलन करत आहोत मात्र आपसातील हेवेदावे मुळे म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही आंदोलन कोण करतोय ह्यापेक्षा कोणासाठी ह्याला लोकांनी महत्व दिले पाहिजे संघटना म्हणजे आपण सर्वजन कोणा दोन माणसाची संघटना होत नाही वेतनाचा गंभीर प्रश्न निर्माण होऊनही लोक तसे अजुनही उदासीन आहेत.

पुढील दिवस फार कठीण आहेत. एकजुट नसेल तर कोणताही प्रश्न सुटणार नाही, जिल्ह्यात एकूण १४ हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत असे असूनही एवढ्या मोठ्या गंभीर प्रश्नावर लोक पुढे येत नाहीत. या उलट राजकारण करत आहेत. वाईट वाटते तुम्ही निवडणुकीच्या वेळी मतदान ज्याला करायचे त्याला करा पण सामुदायिक प्रश्‍नांवर एकत्र आले पाहिजे.

तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक बंधुभगिनिंनी आपल्या स्तरावर शिक्षकांची बैठक आयोजित करून किंवा निरोप पाठवून आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा, आज नाहीतर ह्यापुढे कधीच नाही. शासकीय धोरण रोज बदलता आहेत.

याापुढे गंभीर प्रश्न उदभवतील एकी नसेल तर त्रास होईल माझ्यापर्यंत येण्याची वाट पाहु नका. कोणीतरी पुढे असेल तर हे सर्व घडते, कोणीही पुढे व्हा नेतेगिरीचा प्रश्न नाही मतभेद विसरून एक व्हा ,नाहीतर कोणीच पुढे राहणार नाही, श्रेय कोणाला मिळते ह्याकडे लक्ष देऊ नका, कोणीही पुढे व्हा, पण प्रश्नांसाठी एक व्हा , असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी ए.डी. काळे, डी.बी. चंदन ,बी.के.शेवाळे घुले, मुख्याध्यापक व्ही.के. मोहिते, मविप्र सेवक सोसायटी संचालक पी.यु.जाधव यांनीही आपले मनोगत व व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील मुख्याध्यापक ,शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आभार मुख्याध्यापक बी.के. शेवाळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

*