महिलेच्या अंत्यविधीत पती व सासर्‍याला मारहाण

0
राहुरी (प्रतिनिधी) – मारहाण केल्यामुळेच विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत राहुरी येथे अंत्यविधीसाठी आलेल्या पढेगाव (ता. श्रीरामपूर) येथील महिलेचा पती व सासर्‍याला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी गुंजाळ बापलेकांनी दिलेल्या जबाबावरून राहुरी पोलिसांनी मारहाण करणार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अंत्यविधी चालू असतानाच ही घटना घडल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. पत्नीच्या अंत्यविधीत पतीसह सासर्‍याला मारहाण झाल्याने खळबळ उडाली आहे.
राहुरी येथील सुनीता हिचा विवाह पढेगाव ता. श्रीरामपूर येथील विलास गुंजाळ यांच्याशी झाला होता. काही दिवसांपूर्वी आजारी अवस्थेतच माहेरी राहुरी येथे आलेल्या सुनीताचा मृत्यू झाला. पत्नीच्या निधनाची घटना समजताच तिचा पती विलास चंद्रभान गुंजाळ व चंद्रभान गुंजाळ (रा. पढेगाव, ता. श्रीरामपूर) हे अंत्यविधीसाठी राहुरी येथे आले.
अंत्यविधीला आलेले असताना विलास गुंजाळ व चंद्रभान गुंजाळ या बापलेकांना आरोपी दादा मारुती धोत्रे, काळू एकनाथ धोत्रे, सुनील काळू धोत्रे, नवनाथ रामलाल गुंजाळ, लाचाबाई रामलाल गुंजाळ, रवींद्र रामलाल गुंजाळ, अनिल रामदास गुंजाळ (रा. वडारगल्ली, राहुरी बु., ता. राहुरी) यांनी मारहाण केली.
जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांनी घटनेचा जबाब श्रीरामपूर पोलिसांना दिला. श्रीरामपूर पोलिसांनी दिलेल्या जबाबानुसार राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.

LEAVE A REPLY

*