Type to search

विमानसेवा सुरु झाल्यापासून पन्नास हजार नाशिककरांनी केला प्रवास; २०६ मेट्रिक टन मालाची वाहतूक

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

विमानसेवा सुरु झाल्यापासून पन्नास हजार नाशिककरांनी केला प्रवास; २०६ मेट्रिक टन मालाची वाहतूक

Share

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकच्या विमान सेवेला प्रारंभ झाल्यानंतर नाशिकमधून सूमारे पन्नास हजार पर्यटकांनी विमान सेवेचा लाभ घेतल्याचे आशादायी चित्र समोर आले आहे.

सूरूवातीला विमानतळ उपलब्ध असूनही विमान कंपन्या सेवा देण्याला तयार होत नव्हत्या. मात्र, त्याच वेळी भारत सरकारच्या उडान योजनेमुळे विमान सेवा सूरू करण्याला गती मिळाली असून दिल्ली पाठोपाठ अहमदाबाद व हैद्राबाद सेवा सूरू झाल्याने नागरीकांची मोठी गैरसोय दूर झालेली आहे.

जुलैै 2018 ते एप्रिल 2019 दरम्यान 49 हजार 834 प्रवाश्यांनी विमान सेवेचा लाभ घेतला आहे. त्याोबतच या सेवांसोबतच 206.1 मे.ट.माल वाहतूक लगेजच्या माध्यमातून वाहण्यात आलेली आहे.  विमानाच्या क्षमतेच्या ती 87 टक्कांएवढी झालेली आहे.

मागिल आर्थिक वर्षातील पर्ययकांची संख्या ही फेब्रुवारी व मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात राहीलेली आहे. त्यामानाने जुलै ते जानेवारी दरम्यान, ही संख्या स्थिर होती.

दिल्ली सेवा बंद झाल्याने पर्यटकांनी अहमदाबाद व हैद्राबाद मार्गे दिल्ली गाठण्यास सूरूवात केली आहे. त्यामुळे या दोनही विमान सेवांना त्याचा फायदाच झाला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!