आवक वाढूनही मेथीचे दर तेजीतच!

0
नाशिक । गेल्या आठवड्यात बाजार समितीत अवघ्या हजार -बाराशे जुडयांची होणारी मेथी आवक सध्या 30 ते 35 हजार जुड्या होत असताना, दरात मात्र घट झालेली नाही.

काल मार्केट यार्डात सुमारे 37 हजार मेथीच्या जुड्या लिलावात विक्रीसाठी शेतकर्‍यांनी आणल्या होत्या. मेथीला शेकडा 2 ते 3 हजार रुपये भाव लिलावात मिळाला. जेवहा आवक कमी होती. तेव्हा लिलावात मेथी शेकडा 4 ते 5 हजार रुपये दराने विक्री होत होती. आता आवक वाढूनही दर किंंचित घटलेले असताना ग्राहकांना जुन्याच दराने मेथीची भाजी खरेदी करावी लागत आहे. त्यामूळे आवक वाढून दरावर परिणाम झाली नसल्याची प्रतिक्रिया ग्राहकांमध्ये आहे.

उन्हाळ्यात लागवड केलेल्या मेथीच्या भाजीची आवक आता यार्डात होत आहे. मात्र गत महिन्यात या पालेभाजीला पावसाने झोडपल्याने प्रतवारीवर त्याचा विपरित परिणाम झालेला होता. त्याच दरम्यान शेतकरी संप आणि बाजार समित्यात माल आणण्यास शेतकर्‍यांना झालेला प्रतिबंध, यामुळे मेथी उत्पन्न होऊनही शेतकर्‍यांना ते विक्रीला आणता आले नव्हते.

त्यामूळे ीाजीचा दर्जा आणखी खालावला होता. शेतकरी आंदोलन संपल्यानंतरही ज्या भाजीपाल्याला विक्रीला शेतकर्‍यांनी बाजारात आणले, त्या भाजीपाल्याला चांगला दर मिळाला. त्यात मेथी आणि कोथिंगिर सर्वाधिक दर मिळवणारी पालेभाजी म्हणून चर्चेत होती.

पंधरा दिवसांपुर्वी मेथीची आवक जेमतेम आणि मागणी अधिक असे, चित्र बाजार आवारात होते. जो शेतकरी मेथीच्या जुड्या विक्री आणत होता.

त्याचे वाहन लिलावाच्या अगोदरच हेरन व्यापारी त्या शेतकर्‍याला तो म्हणेल ती किमत देऊन मेथीच्या जुड्या त्यालाच विक्री करावी, अशी गळ शेतकर्‍यांना घातली जात होती.

कारण, बाजारात मेथी उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांकडूनही या पालेभाजीची मागणी अधिक होती. त्यामुळे विक्रेता म्हणेल तो दर देण्यास ग्राहकही राजी होते. मागणीची ही चढाओढ मेथीला भाव खाऊन जाण्यास पुरक असल्याने मेथीची जुडी 60 रुपयांपर्यत भाजीबाजारात विक्री होताना दिसत होती.

LEAVE A REPLY

*