Type to search

क्रीडा नाशिक

‘जागतिक तलवारबाजी’साठी महाराष्ट्राच्या चार खेळाडूंची निवड

Share

नाशिक | प्रतिनिधी

बुडापेस्ट (हंगेरी) येथे होत असलेल्या जागतिक स्पर्धेच्या वरिष्ठ स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या चार तलवारबाज खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. भारताचे पथक प्रमुख म्हणून अशोक दुधारे हेदेखील या टीमसोबत असून त्यांनी याबाबत माहिती दिली.

वरिष्ठ गट जागतिक स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे चौघेही खेळाडू या स्पर्धा दि. १५ ते २३ जुलै २०१९ दरम्यान खेळणार आहेत. दोन दिवसांपूर्वीचे हे खेळाडू रवाना झाले आहेत.

या समूहासोबत भारताचे पथक प्रमुख म्हणून अशोक दुधारे यांची निवड झाली आहे. गोहत्ती (आसाम) येथे संपन्न झालेल्या वरिष्ठ गट राष्ट्रीय स्पर्धेतून यांची निवड झाली असून यात अभय शिंदे (सॅबर) तुषार आहेर , दुर्गेश जाहगिरदार, अनिल महिपती (सर्व फॉईल) यांचा समावेश आहे.

वरील  सर्वांना भारतीय तलवारबाजी महासंघाचे अध्यक्ष राजीव मेहता , सचिव बशीर खान , डॉ. उदय डोंगरे , प्रकाश काटूळे , आनंद खरे , दत्ता पाटील , राजू शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!