…अन् माकडीण जेरबंद झाली

0
वेळुंजे (सुनील बोडके) | गेल्या वीस दिवसापासून वेळुंजे येथे पाहुणी आलेल्या माकडीणीला पकडण्यात वनविभागाच्या अधिकार्‍यांना यश आले आहे. गावात पंचविसहुन अधिक महिला व मुलांना चावा घेतल्याने गावात भीतीचं वातावरण होत.वनविभागाने अनेक प्रयत्न करूनही हाती न येणारी माकडीण एका मांजराच्या पिलाच्या प्रेमापाई वनविभागाच्या हाती लागली.

कोणाच्याही घरात घुसून नासधूस करणे, तेथील महिलेला चावा घेणे , हा तिचा नित्याचा दिनक्रम होता.पण या पाहुणीला गावातील मांजराच्या पिल्लाचा अगदीच लळा लागला होता. तब्बल वीस दिवस हे मांजरीच पिल्लू माकडीणी सोबत वावरत होत.

माकडीण त्या पिल्लाला दूध पाजत असे. एक क्षणही पिल्लू बाजूला गेले की,माकडीण सैरावैरा होऊन मग असेल त्याला चावत असे. या माकडीणीच पिलू हरवल असावा असा संशय वनविभागाला आला व त्यांनी ते मांजरीच पिलू त्या माकडीणी जवळच राहु द्या असे गावकर्‍याना सांगितले.

वीस दिवसांपासून गावातील महिला वर्ग तसेच बालकांमध्ये या माकडीणीची मोठी दहशत निर्माण झाली होती.या माकडीणीच विशेष म्हणजे तिची पुरुषांशी सलगी होती, पुरुष मंडळींच्या अंगा-खांद्यावर खेळत असे पण कोणी पकडण्याचा प्रयत्न केला तर त्यालाच चावा घेऊन पळून जात असे.

त्यामुळे गावातील लोकही त्या माकडीणीला पकडायला घाबरत असे.गावातील लोकांनी वनविभागाकडे तक्रार केली. वन विभागाचे अधिकारी येऊन पकडण्याचा प्रयत्न करत असत. परंतु चालाक माकडीण त्यांना जवळ येऊ देईनात.पिंजरा ही लावला, अनेक प्रयत्न केले पण वनविभागाला पकडण्यात अपयश आले.

अखेर आरएफओ कैलास अहिरे यांनी एक नामी कल्पना शोधली स्पेशल टीम बोलावून रात्री झोपेत असताना पकडावे असे ठरले. त्यानंतर काल (दि.8) रात्री अकरा ते दोन वेळी स्टिंग ऑपरेशनसाठी मेजर थोरात यांच्या मदतीने नामदेव त्र्यंबक काशीद यांच्या घरात झोपलेल्या अवस्थेत माकडीणीला पकडले.

अन् गावातील लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.गावात आलेल्या या माकडीणी ला पकडून नॅशनल पार्क येथे सुरक्षित ठिकाणी सोडल्याचे वनवीभागाचे अधिकारी अहिरे यांनी सांगितले.यावेळी वेळुंजे येथील उपसरपंच राजू बोडके, यांनी मेजर थोरात व वनविभागाच्या अधिकार्‍यांचे आभार मानले.

या कारवाईत वनविभागाचे अधिकारी आरएफओ कैलास अहिरे,वनरक्षक निवृत्ती कुंभार,राजेंद्र भोसले, दर्शना सौपुरे, ऋषिकेश जाधव , स्टिंग ऑपरेशनसाठी मदत करणारे स्पेशल मेजर थोरात ,ऋषिकेश पवार ,पोलीस पाटील नानासाहेब काशीद , दिनकर ताठे , नामदेव काशीद , राजू काशीद , भाऊसाहेब काशीद, भगवान शिंदे, यांनी या ऑपरेशन साठी वन विभागाला मदत केली वनविभागा तर्फे त्यांची ही आभार मानले.

LEAVE A REPLY

*