अपना घर है स्वर्ग से सुंदर...

अपना घर है स्वर्ग से सुंदर...

नाशिक | नरेंद्र जोशी | Nashik

अन्न, वस्र, निवारा या मानवाच्या मुलभुत गरजा आता पर्यंत अन्न (food) व वस्राची (cloths) गरज बर्‍यापैकी भागली. मात्र निवार्‍याचीच कमतरता होती. भारत सरकारच्या (indian government) धोरणामुळे निवार्‍याला चालना मिळाली.

2022 पर्यंत सर्वांसाठी घरे देण्याच्या केंद्र शासानाच्या (central government) धोरणामुळे केवळ सवलतीत घरांसाठी सिडको (CIDCO) अथवा म्हाडावरच (MHADA) अवलंबुन राहणार्‍यांंना आता खासगी बिल्डरांंचाही आधार मिळु लागला. त्यामुळे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करणे सामान्यांना शक्य होऊ लागले आहे. गेल्या पाच वर्षापुर्वी घरांच्या किमती एवढ्या वाढल्या होत्या की सामान्यांचे घराचे स्वप्न साकर होईल की नाही? अशी भिती व्यक्त होऊ लागली होती.

त्यामुळे झोपडपट्ट्या वाढण्याचाच धोका निर्माण झाला होता. मात्र भारत सरकारने 2015 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana) नावाची योजना सुरू केली. आणि अन्न,वस्र,निवारा या मानावाच्या मुलभुत गरजांपैकी निवाराला गती मिळाली. गृहनिर्माण व शहरी गरीबी निवारण मंत्रालयानेे (Ministry of Housing and Urban Poverty Alleviation) जून 2015 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम (Credit Linked Subsidy Scheme) - सर्वांसाठी घरे,

खरेदी, बांधकाम, विस्तार, भारतातील निवार्‍याच्या गरजा भागविण्याकरिता अल्प मध्यम उत्पन्न घटकातील लोकांना त्यांच्या घरांमध्ये सुधारणा करण्यासाठी व्याज अनुदान योजना (Interest subsidy scheme) सुरू केली. नोंदणीत सवलत दिली. त्या योजनांचा फायदा उठवण्यासाठी बिल्डरांनी (Builders) पुढाकार घेतला. जे फक्त श्रीमंतांसाठीच घरे बांधत होते. तेही गरीबांसाठी लहान लहान आकारचे घरे बांधण्यासाठी पुढाकर घेेऊ लागले.

होम लोन (home loan) प्रॉडक्ट, अपना घर हे प्रधानमंत्री आवास योजनेच्या विस्तारासाठी बँकाही पुढाकार घेऊ लागल्या. 2.67 लाखापर्यंत अनुदानाचा लाभ मिळतो म्हणुन घर घेण्यास हिंम्मत मिळाली. अर्जाच्या प्रक्रियेपासून ते पात्रतेच्या मानदंडापर्यंत, परतफेड पर्यायांपर्यंत व कुटुंबाचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी हात भार लावल्याने हे शक्य हाऊ लागले आहे.

त्यामुळे आता शहारात वाल्मिकी आंबेडकर आवास, म्हाडा घरकुल योजना (MHADA Gharkul Yojana) ग्रामीण भागात रमाई घरकुल योजना कार्यरत आहेत. रमाई घरकुल योजनेतुन नाशिक विभागात 36 हजार जणांना घरकुल मिळाले आहे. अजुन 25 हजार घरांची कामेेे सुरु आहेत. नाशिक जिल्हा परिषदेने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यात पहिल्या क्रमांक मिळवला.

तर बांधकाम टक्केवारीत नाशिक द्वितीय क्रमांकावर कायम आहे. यामुळे राज्य सरकारने त्यांचा यापुर्वी सन्मानही केला आहे. ही योजना तीन टप्प्यात राबविली जात असून पहिल्या दोन टप्पे संपुष्टात आलेले आहेत. सध्या, शेवटचा टप्पा सुरू आहे. त्याची सुरुवात 1 एप्रिल 2019 ला झाली आहे आणि 31 मार्च 2022 रोजी संपणार आहे. सध्या व्याज अनुदाना बाबात संभ्रम व्यक्त होत आहे. अनुदान आले नाही, अशा तक्रारी होतात. मात्र ते ज्यावेळी सर्व कर्ज फेडले जाते त्यावेळी ते हमखास जमा होते. असा बिल्डरांचा कयास आहे.2022 पर्यंंत सर्वाचे घरांचे स्वप्न साकार होवो. हिच सर्वांची इच्छा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com