World Optometry Day : चष्मा खरेदी करताना काय काळजी घ्यावी? जाणून घ्या सविस्तर

World Optometry Day : चष्मा खरेदी करताना काय काळजी घ्यावी? जाणून घ्या सविस्तर

प्रत्येक माणसाने आपल्या डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक असून डोळ्यांची नियमितपणे तपासणी करायला हवी. उन्हात चांगल्या प्रतीचा चष्मा वापरला हवा. कारण अतिनील किरणांपासून मोतीबिंदू सारखा डोळ्यांना होणारा अपाय टाळता येऊ शकतो...

चष्मा बनवतांना अनुभवी असलेल्या दुकानातूनच चष्मा घ्यावा. कारण आजकाल मिळणाऱ्या स्वस्त काचांपासून डोळ्यांना इजा होण्याची दाट शक्यता असते. याशिवाय स्वस्त काचा या योग्य नंबरच्या नसू शकतात, त्यांच्यामध्ये काही त्रुटी देखील असतात.

तर प्रत्येकाच्या कामानुसार योग्य त्या काचा सुद्धा मिळू शकतात. जसे की ब्लु ब्लॉक लेन्स सर्रास सगळेच विकतात. पंरतु, त्या योग्य असतीलच असे नाही. त्यामुळे काचा घेताना वय व कामाचे स्वरुप याचा विचार करुन योग्य त्या गुणवत्तेच्या घेतल्या पाहीजेत.

तसेच हलक्या दर्जाच्या ब्लु ब्लॉकमुळे निसर्गातील काही रंग हे वेगळे दिसतात. कारण या लेन्सेंसना एक हलक्या रंगाची पिवळट छटा असते. या लेन्सेस शक्यतो १८ वर्ष वयापर्यंत तरी बिलकुल वापरू नयेत. आणि जर तशी गरज भासली तर योग्य त्या नामांकित कंपनीच्या घ्याव्यात.

चष्मा बनवताना प्रोग्रेसीव्ह लेन्स घेतली तर एका वेळेस लांबच, मधल्या अंतरावरचे आणि जवळचे काम करु शकणे शक्य होते. चष्मा दिसताना चांगला दिसेल आणि वयाचा येणारा नंबर ओळखू येणार नाही. प्रोग्रेसिव्ह चष्म्याची सवय होण्यासाठी कमीत कमी आठ दिवस लागतात. कॉम्प्युटरचा वापर करणाऱ्यांसाठी प्रोग्रेसीव्ह लेन्स हा चांगला पर्याय आहे.

बायफोकल लेन्स घेतली तर काचेमध्ये लांबचे आणि जवळचे दिसते, मधल्या अंतरावरचे दिसत नाही. काचेवर गोल राऊंड दिसेल. बायफोकलमध्ये चष्म्यातील नंबर वयाचा आहे हे ओळखू येईल. बायफोकल चष्म्याची सवय होण्यासाठी कमीत कमी आठ दिवस लागतात.

तसेच आजकाल विविध प्रकारच्या कॉन्टॅक्ट लेन्सेस बाजारात उपलब्ध आहेत. विविध समारंभासाठी लोक या लेन्सेसचा वापर करतात. यात वेगवेगळे कलर उपलब्ध असतात. मात्र या लेन्सेस घालताना व काढताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जेणेकरून डोळ्यांना कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

आजकाल लहान मुलांसाठीदेखील आकर्षक चष्मे बाजारात उपलब्ध आहेत. मात्र पालकांनी आपल्या मुलांना चष्मा बनवताना चांगल्याच प्रतीच्या काचा निवडाव्यात जेणेकरून मुलांचा चष्म्याचा नंबर भविष्यात वाढणार नाही.

लेखक : मिलिंद देशपांडे, देशपांडेज ऑप्टिव्ह्यू.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com