ऊसतोडीला कामगार रवाना

ऊसतोडीला कामगार रवाना

नांदगाव | संजय मोरे | Nandgaon

नांदगाव तालुक्यातील (Nandgaon Taluka) ऊसतोड कामगार (sugarcane worker) आपल्या परिवारासह बैलगाड्या, टँक्टर, ट्रकमध्ये आपल्याला लागेल तो संसारबांधून कारखान्याच्या (Factories) दिशेने निघालेल्या चित्र सध्या दिसून येत आहे. ऊसतोड कामगारांना जगण्यासाठी ऊसतोडीच्या आधाराने मजुरांना धावाधाव सुरु केली आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावेच्या गावे ओसाड पडू लागल्याने विदारक चित्र पाहायला मिळत आहे

ऊसतोडीचा हंगाम (Sugarcane harvesting season) सुरु झाल्याची संधी साधुन आपल्या कुटुंबासह जनावरांचाही व रोजीरोटीसाठीचा प्रश्न सुटणार आहे. म्हणून ऊसतोड कामगार (sugarcane worker) कारखान्याकडे सर्वांची धावधाव सुरु झाली आहे. आपल्या परिवारासह बैलगाड्या, टँक्टर व ट्रकमधून आपल्याला लागेल तो बांधून कारखान्याच्या दिशेने निघालेल्या चित्र सध्या गावागावात दिसत आहे.घरातील वयोवृद्ध व शाळेत जाणारी मुले घर संभाळ्यासाठी गावात दिसत असुन गावेगाव मात्र ओस पडू लागली आहेत.

ऊसतोड कामगार 4ते 5 महिने पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या कुटुंबसह जातात. ऊसतोड मजुरांचे या गावाहून त्या गावाला मजुरांचे आठ ते पंधरा दिवसांत स्थलांतर होत असते. ठिकाणी शाळांची (school) सोय नसल्याने ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान (Educational loss) होत असते. ट्रक, टँक्टरने तालुक्यातील वाड्यावस्ती व रस्त्यावर हजर होतात.

नगर, पुणे, सोलापूर, बारामती, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यासह थेट गुजरात (gujrat) आणि मध्यप्रदेश (Madhya Pradesh) राज्यात टँक्टर, ट्रकने गावागावातील आपल्या परिवारासह व बैलगाड्यासह जथ्येच्या जथ्ये निघाले आहेत. बैलगांड्याच्या रांगाच रांगा रस्त्याने जातांना दिसत जवळपास 30 ते 40 टक्के लोक तालुक्यातील ग्रामीण भागातुन (rural area) निघाल्याचा अंदाज नागरिकांच्या चर्चातुन समजते. पोट भरण्यासाठी शेतमजूरांच जगणं आहे.

कारण आपल्या डोक्यावर वरील बोजा फेडतांना व पोटाची खळगी भरतांना अत्यंत कष्टाची असलेली हि वाट कितीही बिकट असली तरीही आनंदाने चालावी लागते. नांदगाव तालुक्यात मका, कांदा, कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणावर झाले आहे. यामुळे तालुक्यात रोजगाराचा प्रश्न (employment issue) निर्माण झाला आहे.

नांदगाव तालुक्यात मजूरांना रोजगारासाठी दुसरा पर्याय नसल्याने साखर कारखान्याची वाट धरावी लागते. जनावरांचा चार्‍याचा व मजूरांचा हाताला काम मिळत असल्याने साखर कारखान्याची वाट धरावी लागत असल्याचे ऊसतोड कामगारांनी बोलताना सांगितले. कष्टकरी वर्ग आज केवळ हाऊस- मजा,मस्ती म्हणून नव्हे तर पोटाची खळगी भरेल.व दोन वेळच्या भाकरीची तात्पुरती का होईल.याच आशेने आज कारखान्याची वाट धरत असतात.

नांदगाव तालुक्यातील कांंदा व कापूस उत्पादकांची होणार कोंंडी नांदगाव तालुक्यातील बहुतांश शेतमजूर ऊस तोडणीसाठी जिल्ह्या बाहेर जात आहे.शेतमजूर चांगल्या रोजगाराच्या शोधात दरवर्षी मजुरांचे कुटुंबाचे कुटुंब स्थलांतरित होत असतात. परंतु, या स्थलांतरामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांची मोठी कोंंडी होत सध्या कांदा लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.तसेच कापूस वेचणीचे काम सुरू आहे. मात्र तालुक्यातील कामगार मोठ्या प्रमाणात बाहेर जात असल्याने शेतकर्‍यांची अडचण निर्माण झाली आहे.

ऊसतोड कामगारांच्या स्थलांतमुळे नांदगाव बाजारपेठेवर मोठा परिणाम जाणवणार आहे.अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी मिळवण्यासाठी धडपडत असलेला माणूस आज ते मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करत आहे. चित्र बदलण्यासाठी आज तरी प्रयत्न करणे गरजेचे आहे.नाही तरी आपणास अश्या कितीतरी पिढ्या न् पिढ्या रस्त्याने जाणारी बैलगाडी त्यावर एक सुखी संसारासाठी प्रयत्न करणारी जोडी त्यांच्या बैलगाडीवर बांधलेली लाहानग्याची झोळी हे चित्र पाहवयास मिळेल,यात तिळमात्रही शंका नाही! हे मात्र नक्की.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com