संभाजी स्टेडियमचे काम येत्या सहा महिन्यांत पुर्ण होणार ?

संभाजी स्टेडियमचे काम येत्या सहा महिन्यांत पुर्ण होणार ?

नाशिक | निशिकांत पाटील Nashik

नवीन नाशकातील (Navin Nashik) सर्वात मोठ्या खदानींवर सुमारे 438 गुंठे जागेत वसलेले राजे संभाजी स्टेडियमच्या (Raje Sambhaji Stadium) विस्तारीकरणासाठी 20 वर्षानंतर मोठ्या प्रमाणावर निधी (Fund) मिळाला मात्र अनेक अडचणींमुळे रखडलेले संभाजी स्टेडियमचे काम येत्या सहा महिन्यांत पूर्ण होणार असल्याची शक्यता लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. .

गेल्या सुमारे 22 ते 25 वर्षांपूर्वी शहरातील घंटागाडी (Ghantagadi) ठेकेदार सध्याच्या राजे संभाजी स्टेडियमच्या जागी असलेल्या खदानीत शहरातील कचरा टाकीत असे. त्यामुळे या परिसरात सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असायचे, येथील बर्‍याच रहिवाशानी तर मिळेल त्या भावात आपली राहती घरे, बंगलो विक्री केली होती. अशा परिस्थिती त्यावेळचे नगरसेवक मामा ठाकरे यांनी मनपा प्रशासनाकडून संबंधित खदान बुजवून त्याठिकाणी क्रीडासंकुल (Sports Complex) उभे करण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला.

या कामासाठी सुमारे 2.5 कोटी रुपयांचा निधी मनपाने मंजूर केला होता. 1998-99 मध्ये तत्कालीन महापौर अशोक दिवे (Former Mayor Ashok Dive) यांच्या हस्ते या क्रीडा संकुलाचे भूमिपूजन (Bhumipujan) करण्यात आले. पडित खदानीला भव्य असे राजे संभाजी स्टेडियम असे नामकरण करण्यात आले. नवीन नाशिक परिसरातील एकमेव मोठे असे इनडोअर व आउटडोअर स्टेडियम (Outdoor stadium) म्हणून या स्टेडियम ची ओळख झाली.

राजे संभाजी स्टेडियमच्या विस्तारासाठी सुमारे तब्बल 20 वर्षानंतर खेलो इंडिया खेलो योजने (Khelo Indian) अंतर्गत राजे संभाजी स्टेडियमच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकार (Central Government) कडून 6 कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्याने क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मात्र येथे काम करीत असलेल्या ठेकेदाराला आलेल्या वैयक्तिक अडचणीमुळे येथील काम बंद पडले होते. त्यानंतर या प्रभागाच्या नगरसेविका किरण दराडे (Corporator Kiran Darade) व त्यांचे पती बाळा दराडे यांनी सदर काम सुरु करण्याकरिता संभाजी स्टेडियम येथेच उपोषण केल्याने दहा दिवसांतच येथील काम सुरु झाले. मात्र सद्यपरिस्थितीत सुरु असलेल्या कामाचा वेग अशाच प्रकारे सुरु राहो अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींनी केली आहे.

असे असणार नवीन क्रीडांगण

नवीन विस्तारीकरण होणार्‍या क्रीडांगणामध्ये बास्केट बॉल (Basketball), लॉन टेनिस (Lawn tennis), स्पोर्ट्स अकेडमी अँड ट्रेनिंग सेंटर (Sports Academy and Training Center), होस्टेल इमारत, अत्याधुनिक लायब्ररी (Sophisticated library), एक्सेसेटिंग सिटिंग गेलरी अत्याधुनिक व्हीआयपी गॅलरी व उपहारगृह (Restaurant) या सुविधा असतील.

या ठिकाणी सर्व प्रकारच्या खेळांचे प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग सेंटर (Training Center) असल्याने नवीन नाशिक मधील युवकांना लाभ मिळणार आहे. तसेच प्रशिक्षण घेणार्‍या युवकांना राहण्यासाठी होस्टेलची व्यवस्था करण्यात आली आहे. परिसरातील विद्यर्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी अत्याधुनिक लायब्ररी असून एकाच ठिकाणी क्रीडांगण सराव व लायब्ररी हि सुविधा मिळणार आहे. सीटिंग गैलरीची क्षमता वाढल्याने अंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉलीबॉल, लाँग टेनिस, बास्केट बॉल, खो - खो, कब्बड्डी , क्रिकेट अशा विविध स्पर्धांचे आयोजन करता येईल.

Related Stories

No stories found.