उद्योगात महिला सहभाग मोलाचा
फिचर्स

उद्योगात महिला सहभाग मोलाचा

दैनिक देशदूत वर्धापन दिन विशेष लेख

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिकच्या उद्योग क्षेत्रात एक अभूतपूर्व प्रेरणा आहे. माझ्या मते पुढील 25 वर्षांतील बदलात याचा सिंहाचा वाटा असेल. काही लक्षणीय बदल नेमायचे झाल्यास वुमन एंटरप्रेनर्स, कर्मचारी आणि कामगारवर्गात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आणि मोलाचा असेल हे नक्कीच!...

नाशिकच्या उद्योगाशी माझा संबंध हा कदाचित लहानपणापासूनच जोडला गेला असावा. कॉलेजरोड ज्या काळी शहराबाहेर होता आणि तो ओलांडून सातपूरला जाण्याचा रास्ता कसा वेगळा होता... इतक्या जुन्या आणि अशा असंख्य गोष्टी मी माझ्या बाबांकडून ऐकल्या आहेत.

2006 मध्ये मी आमच्या कारखान्यात काम करायला सुरूवात केली आणि बाबांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ताज्या झाल्या. त्या वेळी माझ्या लक्षात नाही आलं, पण मीसुद्धा कुठल्या तरी गोष्टीत सामील होतच होते. 14 वर्षे सातपूर आणि अंबडला काम करून आता पुढील उद्योगाचा बदलता चेहरा कसा असेल, हा विचार करताना मला अनेक गोष्टी आठवतात.

त्यावेळी ङ्गवूमन एंटरप्रेनर्सफ ही संकल्पना केवळ मोठ्या शहरांपुरतीच सीमित होती. नाशिकमध्ये मात्र उद्योगात बायका खूपच कमी प्रमाणात दिसायच्या. कर्मचारी आणि कामगारवर्गात काही ठराविकच उद्योगात महिला नोकरी करताना आढळत. अपवाद सगळीकडेच असतात. त्यामुळे ते याही बाबतीत होतेच, पण ते अपवादच होते. हे चित्र बदलताना मी बघितलं आहे. पुढील 25 वर्षांत काही लक्षणीय बदल नेमायचे झाले तर वुमन एंटरप्रेनर्स, कर्मचारी आणि कामगारवर्गात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आणि मोलाचा असेल हे नक्कीच!

नाशिकच्या उद्योग क्षेत्रात एक अभूतपूर्व प्रेरणा आहे. माझ्या मते पुढील 25 वर्षांतील बदलात याचा सिंहाचा वाटा असेल. या प्रेरणेचे उगमस्थान म्हणजे गेल्या 14 वर्षांत मला ङ्गउद्योजकफ म्हणून घडवणारे लोक, ज्यांच्याकडून मी आजही शिकतेच आहे. अर्थातच माझा बाबा (लोकेश शेवडे), माझा काका (देवेश शेवडे) आणि रिलायबल ऑटोटेक प्रा. लि. चे संस्थापक व माझे गुरु राजेंद्र बागवे अशी माणसे जी लिंगभेदाबाबतचे पूर्वाग्रह मोडीत काढण्यात मदत करतात. मेहनतीला दुजोरा देतात. महत्वाकांक्षा जोपासतात आणि समाजात आदर्श होतात.

2005 मध्ये राजेंद्र बागवे यांनी स्थापित केलेली टिचिंग लर्निंग कम्युनिटी (टिएलसी) ही आदर्शचा विस्तारलेला भाग झाली. आज त्याही गोष्टीला 15 वर्षे झाली आहेत. पहिल्या वर्षी असलेला 17 उद्योजकांचा समूह आज 500 हून जास्त उद्योजकांचा समुदाय झाला आहे. पुढील 25 वर्षांत नाशिकच्या उद्योगांचा बदलता चेहरा हा टिचिंग लर्निंग कम्युनिटीत, 1000 हून अधिक उद्योगांचे रूपांतर जागतिक दर्जाचे होईल. याबद्दलची मी साक्षीदार असेनच, पण माझ्या बाबासारख्या असंख्य गोष्टी मी पुढच्या पिढीला आनंदाने सांगेन.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com