Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedपाठपुराव्याने रेल्वे गाड्यांना थांबा

पाठपुराव्याने रेल्वे गाड्यांना थांबा

नांदगाव । संजय मोरे | Nandgaon

करोना (corona) महामारी कमी झाल्यामुळे झेलम (Jhelum), कामायनी (Kamayani) हुतात्मा महानगरी, जनता काशी एक्स्प्रेस, आदी रेल्वे गाड्यांचे थांबे (Railway Stations) पूर्ववत करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यापासून नांदगावकरांच्या मागण्या होत्या.

- Advertisement -

खासदार (MP) तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar) व आम्ही नांंदगांवकरांनी या मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू होता अखेर काशी व महानगरी एक्स्प्रेसचे (Mahanagari Express) थांबे पूर्वरत करण्यात आले आहेे.

रेल्वे प्रशासनाने (Mahanagari Express) करोना काळात अनेक सुपरफास्ट गाड्यांचे थांबे रद्द केले होते. करोना काळापासून आजपर्यंत नांदगाव रेल्वे स्थानकावरील (Nandgaon Railway Station) काशी, कामायनी, महानगरी, झेलम, जनता , कुशीनगर इतर एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) रद्दच ठेवले होते. खासदार तथा केद्रीय आरोग्य राज्यमंंत्री डॉ. भारती पवार (dr bharti pawar) व आम्ही नांंदगांवकरांनी या मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू होता अखेर काशी व महानगरी एक्स्प्रेसला थांबे पुर्वरत करण्यात आले.

नांदगावकरांनी कामायनी, झेलम, जनता ,अनेक वेळा आंदोलने (agitation) करून मोठ्या संघर्षातून मिळविलेल्या रेल्वे गाड्या आहेत. या रेल्वे गाड्यांचे थांबे पूर्वरत करण्यासाठी शहरातील मध्यवर्ती असलेल्या गांधी चौकात शांततेच्या मार्गाने एक दिवसाचे भर पावसात धरणे आंदोलन (agitation) करण्यात आले.

शहर व तालुक्यातून नाशिक (nashik), मुंबई (mumbai), पुणे (pune), नागपूर (nampur) येथे कामानिमित्ताने दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी, विद्यार्थी, व 200 ते 300 चाकरमाने व ये-जा करतात. नांदगाव रेल्वे स्थानकाला आरक्षण व नियमित तिकीट विक्री लक्षात घेता जवळपास महिन्याला अंदाजे 30 ते 35 लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होत असल्याचे रेल्वेच्या सूत्रांकडून समजते.

दरम्यान, झेलम, कामायनी, कृशीनगर, हुतात्मा, जनता एक्स्प्रेस,आदी रेल्वे गाड्यांचे थांबे पूर्ववत करण्यासाठी आदी प्रकारचे आंदोलने करण्यात येणार असल्याचे आम्ही नांदगावकर कृती समितीने निर्धार व्यक्त केला आहे. कामायनी, महानगरी, काशी, जनता,झेलम एक्स्प्रेस या रेल्वेगाड्या मोठ्या संघर्षातून थांबा मिळविलेल्या आहेत.जनता दलाचे दिवंगत खासदार हरिभाऊ महाले यांनी 1989 वर्षी पंजाबमेल व झेलम एक्स्प्रेसचा थांबा मिळून दिला होता. पंजाबमेल कालांतराने बंद करण्यात आली.

त्यानंतर कामायनी थांंब्यासाठी नाशिकचे तत्कालीन खासदार समीर भुजबळ व मालेगाव लोकसभा मतदारसंघातील तत्कालीन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी प्रयत्न करून तो मंजूर आणला होता. पहाटे सेवाग्राम एक्स्प्रेसनंतर मुंबई व नाशिकला एकही रेल्वेगाडी नसल्याने महानगरी एक्स्प्रेस थांबा खासदार चव्हाण यांनी काही वर्षांपूर्वी तो मंजूर करून आणला होता. बर्‍याच वेळा दिवंगत खासदार हरिभाऊ महाले आणि तत्कालीन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी नांदगावकरांसोबत जनआंदोलनात सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या