Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedकाँग्रेसअंतर्गत गटबाजीचे ग्रहण सुटणार?

काँग्रेसअंतर्गत गटबाजीचे ग्रहण सुटणार?

नाशिक | Nashik | दखल | विजय गिते

संपूर्ण देशभरात दिल्लीपासून (delhi) ते अगदी गल्लीपर्यंत काँग्रेस पक्षात (congress party) जोरदार घमासान सुरू आहे. मग ते काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा मुद्दा असो, की अगदी शहर, जिल्हा अथवा तालुका अध्यक्षपदाचा मुद्दा असो.

- Advertisement -

एके काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक शहर (nashik city) व जिल्ह्यातही यापेक्षा फारसे वेगळे चित्र नाही. प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर, त्यावरून पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली. जोपर्यंत या कार्यकारिणीतील काही नावे वगळली जात नाहीत, तोपर्यंत एका नाराज गटाने एमजी रोड (m.g. road) वरील काँग्रेस कमिटीवरच (congress committee) बहिष्काराची (boycott) अगदीच टोकाची भूमिका घेतली होती.

याचीच पुनरावृत्ती नाशिकचे माजी उपमहापौर गुरुमित सिंग बग्गा (former deputy mayor gurmeet singh bagga) यांच्या काँग्रेस प्रवेशावरून झाली. नाराज गटाने त्यांच्या प्रवेश सोहळ्याला हजेरी न लावता गटबाजीचे ग्रहण लावले. बग्गा यांचा काँग्रेसमध्ये केवळ प्रवेश झालेला आहे. अजून त्यांच्यावर पक्षाने कुठलीही जबाबदारी टाकलेली नाही. तोच त्यांना काँग्रेसच्या अंतर्गत एका गटाने तीव्र विरोध करत एकप्रकारे गटबाजीचे ग्रहण लावले आहे.

अजून तर त्यांच्यावर कुठलीही जबाबदारी देण्यात आलेली नसताना देखील या नाराज गटाने त्यांच्या प्रवेशावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आगामी नाशिक महानगर पालिका (Nashik Municipal Corporation) निवडणुकीच्या (election) पार्श्वभूमीवर बग्गा यांच्यावर नाशिक शहराध्यक्ष पदाची जबाबदारी येणार हे निश्चित आहे. मात्र तत्पूर्वीच अंतर्गत नाराज गटाने केलेला विरोध पाहता बग्गा यांना शहराध्यक्ष पद मिळाल्यानंतर गटबाजीचे हे ग्रहण सोडविण्याचे मोठे आव्हान राहणार आहे.

अर्थात बग्गा हेही काँग्रेस मध्येच मुरलेले एक नेतृत्व असून त्यांची एकूणच राजकारणातील शैली पाहता ते ही गटबाजी संपविण्यासाठी वा काही प्रमाणात ती कमी करण्यासाठी निश्चितच प्रयत्न करतील हे त्रिकाल सत्य आहे. दरम्यान, त्यांच्यासमोर गटबाजी बरोबरच नाशिक महानगरपालिकेतील पक्षाची बोटावर मोजण्याइतकी नगरसेवकांची संख्या दोन आकड्यापर्यंत नेण्याची मोठी जबाबदारी पेलावी लागणार आहे.

नाशिककडे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून पाहिले जात होते. मात्र, हा आता इतिहास झाला.त्यामुळे काँग्रेससमोर कार्यकर्ते वाढविण्याबरोबरच लोकप्रतिनिधींची संख्याही वाढविण्याची मोठी जबाबदारी आली आहे. ही जबाबदारी पेलत असताना नाराज गटाने ऊठसूट विरोध करणे आता सोडून देणे काळाची गरज आहे.

कोणाचीही निवड वा कोणाचाही पक्ष प्रवेश झाला की, लागलीच एका नाराज गटाने त्याला विरोध करायचा आणि आपली भाकरी भाजण्याचा प्रयत्न करायचा. मात्र, या नाराज गटाला अजून हेही लक्षात येत नाही की, प्रदेशस्तरावर आपल्या नाराजीची काहीही दखल घेतली जात नाही, हे या नाराज गटाने वेळीच ओळखणे गरजेचे आहे.

नाहीतर आहे ती काँग्रेस संपण्यास अजूनही काही दिवस लागणार नाही, हे येथे लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे अंतर्गत विरोध असला तरी प्रदेश स्तरावरून झालेल्या निवडी मान्य करत पक्ष काम करणे आवश्यक आहे. प्रदेश पातळीवर नुकत्याच झालेल्या पदाधिकर्‍यांच्या निवडीला शहरातील एका गटाने तीव्र विरोध केला होता. त्याची दखल प्रदेशाध्यक्ष पटोले यांना घ्यावी लागली.

त्यांनी मुंबईतील (mumbai) टिळक भवन (tilak bhavan) येथे शहरासह जिल्ह्याची बैठक बोलावली. त्यामुळे नाराज गटाच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र, बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराज गटाचा ‘क्लास ’ घेत ही कार्यकारिणी पक्षश्रेष्ठींकडून मंजूर झाली असून, ती मान्यच करा, त्यात बदल होणार नाही, असे स्पष्ट शब्दांत नाराजांचे कान टोचले. या बैठकीत शहराध्यक्षपदाच्या वादाचे घोंगडे तसेच भिजत ठेवून महापालिका निवडणुकांसाठी कामाला लागा, असा कानमंत्र दिला.

आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीचा विचार करता बग्गा यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे पक्षाला सत्ता मिळेलच अशातला काही भाग नाही. मात्र, भाजपा (bjp) विरुध्द शिवसेना (shiv sena) अशा लढाईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (nationalist congress) या दोन पक्षांना आपल्याला अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागेल, असे संकेत आहेत. त्यामुळे बग्गा यांच्यामुळे काँग्रेसची ताकद थोडीफार वाढेलही.

परंतु, काँग्रेसमध्ये जिवंतपणा येण्याला महत्व आहे. त्यासाठी कार्यकत्यांना सक्रिय करण्याची जबाबदारी बग्गा यांना पार पाडावी लागणार असून त्यांच्यासमोर ते आव्हानआहे. बग्गा यांच्याप्रमाणे आणखी काही नगरसेवक (Corporator) आणि नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा हेतू आपल्या वैयक्तिक प्रभावाला काँग्रेसच्या पारंपरिक मतांची जोड देणे हाच आहे.

कोणाचा कोणताही हेतू असला, तरी काँग्रेसला आज कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांची गरज आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षात प्रवेश करणारांची संख्या कशी वाढेल, याबरोबरच कार्यकर्ते पक्षाला कसे जोडले जातील याचे आव्हान पक्षासमोर आहे. हे आव्हान पेलत काँग्रेस अंतर्गत गटांनी याचे वेळीच अवलोकन करणे गरजेचे आहे आणि पक्ष कसा वाढेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

शहर काँग्रेस पुर्णत: गटातटात विभागली गेली आहे. यामुळे शहरात नेतृत्व बदलाबाबत अनेकदा चर्चा झाली. परंतू, अतंर्गत गटबाजीमुळे शहराध्यक्षपदाचा तिढा सुटत नाही. अशी अवस्था आहे. गत दोन महिन्यांपासून बग्गा यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा पक्षातंर्गत होती. बग्गा यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली जाणार अशी अनेकदा चर्चा झाली. अखेर, बग्गा यांनी पक्षप्रवेश केला.

त्यामुळे शहराध्यक्षपद निवडीचा मार्ग आता खुला झाला आहे. बग्गा यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा देण्याची तयारी पक्षाने सुरू केली आहे. त्यामुळे आठवडाभरात बग्गांवर शहराध्यक्षपदाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. पक्ष स्थापनेपासून आजतागायत काँग्रेसचा इतिहास ज्ञात असलेले जे थोडेफार लोक नाशिकमध्ये आहेत, त्यात गुरमित बग्गा यांचे नाव नक्कीच अग्रस्थानी आहे.

अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असलेले एक व्यक्तिमत्व म्हणून बग्गा नाशिककरांनाच परिचित असून, इतर सर्वच राजकीय पक्षांत त्यांची तीच प्रतिमा आहे. गत दहा वर्षांत काँग्रेसची ताकद दिवसेंदिवस कमालीची कमी झाली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यापासून नाना पटोले काँग्रेस पक्षात जान फुंकण्याचा प्रयत्न नक्की करत आहेत. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी त्यांनी जुन्याजाणत्या, अनुभवी नेत्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. पटोले यांच्या संपर्कात आल्यानंतरच बग्गा यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात सक्रिय होण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.

पुनर्वैभवाचे आणण्याचे आव्हान

काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने विचार करायचा म्हटल्यास आगामी नाशिक महापालिका निवडणूक लक्षात घेता बग्गा यांच्या प्रवेशाला एक वेगळे महत्व आहे. त्यांच्याकडे शहराध्यक्षपद देण्याचा नाना पटोले यांचा विचार आहे तो येथे काँग्रेसचे शहरातील बळ वाढविण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा म्हणता येईल.

अर्थात पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी निभावण्याची तयारी बग्गा यांची आहे. शहर काँग्रेसमधील मरगळ दूर करण्यासाठी बग्गा यांना हेच पद मिळणार हे निश्चित आहे. सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा त्यांचा स्वभाव, अभ्यासूवृत्ती आणि विशेष परखड वक्तृत्वशैली यांचा विचार करता कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याची त्यांच्यात नक्कीच क्षमता देखील आहे. असे असले तरी पक्षांतर्गत गटबाजीची कीड संपविण्याचे अवघड काम त्यांना करावे लागणार आहे.

अर्थात काँग्रेसमध्येच मुरलेल्या बग्गा यांना गटबाजीचा अनुभवही आहे. भाजपाचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेसला सक्षम करणे, हेच त्यांचे मुख्य ध्येय राहणार असल्याने गटबाजीकडे ते फारसे लक्षही देणार नाहीत. बग्गा यांच्यासारख्या अनुभवी नेत्याची नाशिक शहर काँग्रेसला आता गरज असल्याने त्यांचा प्रवेश म्हणजे काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने तितकाच मोलाचा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या