Friday, April 26, 2024
HomeUncategorizedआंदोलनातून शेतकर्‍यांना दिलासा मिळणार?

आंदोलनातून शेतकर्‍यांना दिलासा मिळणार?

नाशिक | नरेंद्र जोशी | Nashik

तब्बल वर्षभर दिल्लीच्या सीमवेर (delhi border) आंदोलन (agitation) करुन तीन कृषी कायदे (Three agricultural laws) मागे घेण्यास भाग पाडणार्‍या शेतकर्‍यांंनी (farmers) आता राज्यातील शेतकर्‍यांच्या थकित वीजबिलापोटी (electricity bills) सुरू असलेली वीज कनेक्शन (Power connection) तोडण्याची मोहीम तातडीने थांबवा.

- Advertisement -

अतिरिक्त उसाचा प्रश्न तातडीने सोडवून सर्व उसाचे गाळप होईल, यासाठी हस्तक्षेप करा, पीक विमा भरपाई (Crop insurance compensation) तातडीने शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करा, या प्रमुख मागण्यांसाठी प्रखर आंदोलन (agitation) उभे करण्याचा निर्धार केला आहे. त्यांचे पडसाद या आठवड्यापासुन उमटणार आहेत. दिल्लीप्रमाणे (delhi) याही आंदोलनातून शेतकर्‍यांंचे हे ज्वलंत प्रश्न सुटून त्यांना दिलासा मिळावा, अशीच सवार्ंंची इच्छा आहे. त्यात संघटना कसा लढा देते. व शासकीय यंत्रणा यातून सन्मानीय मार्ग कसा काढते, हे स्पष्ट करणारे हे आंदोलन आहे.

शेतकर्‍यांचे वीजबिल संपूर्णे माफ करा. पुढील काळात वीजबिल (electricity bills) देत असताना अतिरिक्त अधिभार, वेगवेगळे दंड व कराच्या निमित्ताने अवास्तव बिले देणे तातडीने थांबवा. मीटर रीडिंग (Meter reading) न घेता चुकीची बिले देऊन शेतकर्यांची होत असलेली लूटमार थांबवा. शेतकर्यांना दिवसा किमान 8 तास पुरेशा दाबाने सलग वीज द्या. उसाच्या एफ.आर.पी. चे तुकडे करण्याचे कारस्थान तातडीने बंद करा. पीक विमा भरपाई तातडीने शेतकर्यांच्या खात्यात वर्ग करा,’ या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन (agitation) होत असल्याचें किसान सभेकडून सांगण्यात आलें आहे.

दिनांक 16 मार्च पासून राज्यभर तीव्र आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारण अद्यापही आधार भावाच्या संरक्षणाबद्दलचा लढा अपूर्ण आहे. सन 2020 च्या परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्यांना देय असलेली विमाभरपाई तातडीने पीक विमा कंपन्यांकडून वसूल करून ती शेतकर्यांच्या खात्यात वर्ग करणेगरजेचे आहे. कसत असलेल्या वन जमिनी, देवस्थान इनाम वर्ग 3 जमिनी, गायरान, वरकस, बेनामी, आकारीपड जमिनी कसणारांच्या नावे झालेली नाही.

निराधार योजनेचे पेंन्शन, रोजगार हमी, रेशन, घरकुल, सिंचन, पुनर्वसन सारखे वेगवेगळे प्रश्न उग्र होत चालले आहे.. म्हणुनच आंदोलनाचे हत्यार उपसण्याची वेळ आली आहे.यातुन मार्ग काढतांना राज्यकर्त्यांची कसरत होणार आहे. कारण प्रत्येकवेळी बळी राजाच्या नावाने गळा काढुन आपण शेतकरी हितासाठीच बसलो आहोत म्हणाणारे आता मुळ प्रश्नाला हात घालता की बगल देतात हे दिसणार आहे. शेती आणि शेतीचे प्रश्न व त्याची आपल्या रोजच्या जीवनाशी थेट संबंध याची जाणीव सर्वांना आ हे ..

सध्या शेतकरी का झगडत आहेत? एवढा हेकेखोरपणा का करतात? हे समजावून घेणे गरजेचे झाले आहे.े.शेती-प्रश्न आणि शेतीचे प्रश्न व त्याची आपल्या रोजच्या जीवनाशी थेट संबंध याची जाणीव सर्वांना असणे हे फार अत्यावश्यक आहे.. आपण त्यांच्याशी आर्थिक-सामाजिक अन्याय करत तर नाही ना? असे प्रश्न विचारले जायला हवेत. आपण त्यांच्याशी सामील होऊन त्यांचे प्रश्न कसे कमी होतील. यावर विचार करणे काळाची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या