Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedगणितात नोबेल का दिला जात नाही ?

गणितात नोबेल का दिला जात नाही ?

स्विडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचा २१ ऑक्टोंबर १८३३ मध्ये जन्म झाला. त्यांनी डायनामायटाचा शोध लावला.आपल्या शोधाचा उपयोग युद्धातच जास्त होत असल्याचे व त्यामुळे आपण स्वतः इतरांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे शल्य नोबेलच्या मनाला सलत होते. त्याकारणाने आल्फ्रेड नोबेलने दहा लाख स्वीडिश क्रोनरांचे विश्वस्त मंडळ स्थापले व जगातील उत्तमोत्तम संशोधकांना व शांतिदूतांना त्यातून पारितोषिक देणे आरंभले. हे पारितोषिक म्हणजेच नोबेल पारितोषिक होय.

दरवर्षी साहित्य, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शांतता, अर्थशास्त्र,औषधी आणि शरीरशास्त्र अशा सहा क्षेत्रात हा पुरस्कार दिला जातो. परंतु भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रचा बेस असणाऱ्या गणितात हा पुरस्कार का दिला जात नाही. यावर अनेक चर्चा सुरु असतात.

- Advertisement -

आल्फ्रेडने नोबेल पुरस्काराच्या रकमेसाठी आपल्या मृत्युपत्रात खास तरतूद करून ठेवली आहे. १८९७ साली त्याचा मृत्यू झाला तेंव्हा हे मृत्युपत्र उघडून पाहण्यात आले. चार वर्षानंतर हे मृत्युपत्र कायदेशीर असल्याचे सिद्ध झाले. पूर्वी हे पारितोषिक पाच क्षेत्रांसाठी दिले जायचे. १९६९ पासून स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेने यात अर्थशास्त्रातील मौलिक कार्यासाठी सहाव्या नोबेल पारितोषिकाचा समावेश केला. नोबेल यांनी मृत्युपत्रात त्याने कुठले पारितोषिक कुठल्या संस्थेने जाहीर करावेत याचे स्पष्ट निर्देशही दिले आहेत.गणितात नोबेल न देण्यामागे चार कारणे सांगितली जातात. परंतु चारही कारण तथ्यांवर आधारलेले नाही. जाणून घेऊया गणितासाठी नोबेल न देण्यामागे कोणकोणते तर्क आजवर लढवले गेले आहेत.

पहिले कारण आहे, आल्फ्रेड नोबेलचे खाजगी आयुष्य

आल्फ्रेड नोबेल हे अविवाहित होते. हे अनेकांना माहीत आहे. यासंदर्भात एक जे कारण ते म्हणजे गणितज्ञाचे नोबेल यांच्या मैत्रिणीसोबत अफेअर होते. स्वीडिश गणितज्ञ गोस्टा मितग-लेफ्लर याचे आणि आल्फ्रेडची मैत्रीण सोफी हेस हिचे संबंध होते. यामुळे गोस्टाला हा पुरस्कार मिळू नये म्हणून आल्फ्रेडने या पुरस्काराच्या यादीत गणितज्ञांना स्थानच दिले नाही. परंतु या दाव्यात अनेकांता तथ्य वाटत नाही. तसेच कुठलेही पुरावे आढळत नाही.

दुसरे कारण आहे, मानवी जीवनावर परिणाम करणारे घटक

मानवतेच्या सेवेसाठी दिला जाणाऱ्या योगदानासाठीच हे पुरस्कार दिला जातात. गणिताचा व्यावहारिक जीवनात फारसा ‌उपयोग होत नाही. गणित हा विषय खूपच सैद्धांतिक आहे. त्यामुळेही त्यांनी गणिताकडे दुर्लक्ष केले. परंतु यात तथ्य वाटत नाही. गणिताच्या आकडेवारीशिवाय आपल्या जिवनातील अनेक व्यवहार ठप्प होतील. यामुळे गणित हे व्यावहारिक शास्त्र नाही, हे म्हणण्यात अर्थ नाही.

तिसरे कारण, गणितात रस नव्हता

आल्फ्रेड यांनी स्वतः भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात संशोधन केले होते. साहित्य आणि औषधशास्त्र हे त्यांचे आवडते विषय होते. त्यांनी डायनामाइटचा शोध लावून मानव जातीला एका हिंस्र आयुधाची भेट दिली म्हणून त्यांच्यावर ‘मरणाचा व्यापारी’ अशी टीका चारी बाजूंनी होऊ लागली होती. त्यामुळे जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी झटणाऱ्या शांतीदूतांनाही हा पुरस्कार मिळावा म्हणून यात शांततेसाठीच्या नोबेल पुरस्काराचा समावेश करण्यात आला. मात्र गणितासंदर्भात असे कोणतेही कारण नव्हते. परंतु हे कारण इतिहासकारांना पटत नाही.

चौथे कारण, गणितासाठी पुरस्कार होताच

नोबेलच्याच तोलामोलाचा एक पुरस्कार गणित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जात होता. मग गणितासाठी आधीच एक पुरस्कार असताना दुसरा कशाला? असाही विचार यामागे असावा. पण यातही तथ्य वाटत नाही, कारण गणितासाठी नोबेल नसल्यामुळे किंग ऑस्कर द्वितीय यांच्या मदतीने हा पुरस्कार सुरु करण्याची चर्चा सुरु झाली. १८९९ मध्ये नोबेल पुरस्कारची चर्चा सुरु झाली. त्यानंतर १९०१ मध्ये हा पुरस्कार दिला गेला.

- Advertisment -

ताज्या बातम्या