Monday, April 29, 2024
HomeUncategorizedशिवसेना कोणाची? शिवसैनिक संभ्रमात

शिवसेना कोणाची? शिवसैनिक संभ्रमात

नाशिक | रवींद्र केडिया | Nashik

शिवसेनेचा (shiv sena) बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा नाशिक जिल्हा (nashik district) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांच्या चळवळीचे केंद्रस्थान म्हणून या शहराकडे पाहिले गेले. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात नासिकरोड (nashik road) येथे शिवसेनेने आपली चळवळ ज्वलंत केली होती.

- Advertisement -

राजकीय वाटचालीमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी नाशिक (nashik) येथे महामेळावा घेऊन दार उघड बये दार उघड, अशी हाक आई सप्तशृंगीच्या दारी मांडली होती आणि राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. त्यातूनच त्यांना यशही मिळाले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या अंतर्मनातील शहर म्हणून नाशिककडे पाहिले जाते. शिवसेना (shiv sena) सोडताना युवा नेते राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या पक्षाची घोषणा नाशिकमधूनच केली होती. त्यामुळे शिवसेनेच्या घडामोडींमध्ये होत असलेले बदल लक्षात घेत खा. संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी नाशिकची सूत्रे स्वतःकडे घेतली. पक्षांतर्गत जे फुटीचे सुरू असलेले राजकारण (politics) विश्वासू लोकांचे पक्षांतर या सर्व घडामोडींमुळे शिवसेना मलुल झाली होती.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सूत्रे हाती घेतात. सर्वप्रथम संघटना एकजीव करण्याचा धडाका लावला. नाराजी नाट्याने पक्षातून बाहेर गेलेल्या माजी आमदार वसंत गीते (Former MLA Vasant Geete), माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल (sunil bagul) यांना पुन्हा लक्षात आणण्याची किंवा या केली पक्षांतर्गत असलेल्या गटबाज बंद करण्यासाठी सर्वांचा मनोमिलन सुरू केले आणि यातून शिवसेना (shiv sena) एक संघ उभी राहिल्याचं दिसून येऊ लागले होते.

भाजपच्या (BJP) संकटमोचन गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी देखील शिवसेना नाशिकमध्ये निश्चित चांगली कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला होता. शिवसेनेने शहरात पहिल्यांदा महिला संघटन उभे केले. महिलांची फळी निर्माण केली. महिलांचे पदाधिकारी नियुक्त केले आणि शहराच्या महिला शिवसैनिकांचा (shiv sainik) एक वेगळं मोहोळ उभे केले. त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकाच्या मनातही शिवसेनेचे प्रेम आणखी ठसून वर येऊ लागले.

सारं काही ऑलवेल सुरू असताना महानगराच्या तसेच जिल्हा परिषद (zilha parishad), पंचायत समितीच्या (panchayat samiti) निवडणुका (election) समोर आल्या आणि राजकारणाचे डाव सुरू झाले 50 आमदार 12 खासदार शिवसेनेची साथ सोडून बाहेर पडले आणि शिवसेनेवर दोनही गटांनी आपला आपला दावा दाखल केला आहे लोकांच्या मतदानावर जनसामान्यांच्या पाठबळावर निवडून आलेले नेत्यांची पळापळ आणि पळवा पळवा सुरू आहे. सामान्य शिवसैनिक मात्र या घटनाक्रमामुळे व्यतीत झाला असल्याचे दिसून येत आहे.

सामान्य शिवसैनिक (shivsainik) शिवसेना कोणाची, अशी विचारणा करण्यापेक्षा माझी सेवा सेना कुठे आहे? याचा विचार करताना दिसतो. संजय राऊत यांनी पाठबळ दिलेल्या नाशिक शहरातील शिवसैनिक मात्र अजूनही शिवसेनेच्या झेंड्याखाली उभे आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्व व कर्तृत्वावर त्यांचा अजूनही विश्वास आहे. ज्या पद्धतीने शिवसेना पायउतार झाली ते सर्वसामान्य शिवसैनिकांना पचनी पडलेले नाही. त्यामुळे शिवसैनिकांचा कौल अजूनही बंडखोराऐवजी शिवसेनेसोबतच दिसून येतो.

हेमंत गोडसे (hemant godse) यांच्या जाण्याने शिवसेनेमध्ये आश्चर्य व्यक्त होऊ लागलं होते. प्रत्यक्षात पाहता शिवसेनेच्या व्यासपीठावरून नाशिक जिल्ह्याला (nashik district) विकासाची गंगा आणण्यासाठी हेमंत गोडसे यांनी सातत्याने धडपड केली आणि त्यांच्या धडपडीला यश मिळवण्यासाठी त्यांना नेहमीच भारतीय जनता पक्षाच्या (Bharatiya Janata Party) नेतृत्वाशी सलगी ठेवणे भाग होते. परिणामी त्यांचे प्रेमाचे संबंध जास्त घट्ट झाले आणि त्या माध्यमातून बंडखोर घटना सोबत हेमंत गोडसे (hemant godse) गेले असावे, असा तर्क व्यक्त केला जातो हेमंत गोडसे यांनी प्रत्येक मुलाखतीच्या वेळी लोकांशी संवाद साधताना नागरिकांच्या विकास कामासाठी आपण झटत राहणार असल्याचे सांगितले.

प्रलंबित असलेले प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्यात एकच सरकार असेल तर कामे गतीने होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसे पाहता खा. गोडसे जिल्ह्यातील राजकारणात किंवा जिल्ह्यातील संघटन कामात कधीच रमले नाहीत. जिल्ह्याच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरही त्यांचा फारसा अस्तित्व दिसून आले नाही. अकेला चलो रे या उक्तीप्रमाणे हेमंत गोडसे यांनी सातत्याने आपला एक गल्ली मार्ग अवलंबला होता.

विकासाचे प्रकल्प तयार करणे केंद्र व राज्याच्या माध्यमातून ते मंजूर करून आणणे आणि विकास कामाला गती देणे हे त्यांनी लक्ष ठेवलेलं होते. चालू पंचवार्षिक भाजपतर्फे डॉ. भारती पवार विजयी झाल्यानंतर त्यांची चांगली गट्टी जमली होती. केंद्रातील विविध वाटचालींकडे भारती पवार हेमंत गोडसेसोबतच गिरवत होते. त्यामुळे काही अंशाने गोडसे यांची भाजपशी जवळीक वाढण्याचे कारणे असू शकते. त्यामुळे आगामी काळात खासदारकीसाठी हेमंत गोडसे भाजपतर्फे उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र खरा शिवसैनिक अजूनही संभ्रमात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या