Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedवाहनधारकांना शिस्त लावणार कोण?

वाहनधारकांना शिस्त लावणार कोण?

नाशिक | निशिकांत पाटील | Nashik

नाशिक शहरात (nashik city) आगामी काळात सीसीटीव्ही यंत्रणा (CCTV system) कार्यान्वित होणार असल्याने सिग्नल तोडल्यास घरपोच दंडाची पावती येणार आहे आणि यामुळे बेशिस्त वाहन चालकांना आता जरब बसणार असल्याने काही बेशिस्त नाशिककरांना शिस्त लागणार, यात शंकाच नाही.

- Advertisement -

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या (Commissionerate of Police) वाहतूक शाखेतर्फे संपूर्ण शहरात सुमारे 50 ठिकाणी सीसीटीव्ही (cctv) बसवण्याचा प्रस्ताव स्मार्ट सिटीला (samrt city) देण्यात आला होता. त्यानुसार गेल्या बर्‍याच वर्षांपूर्वी सीबीएस (CBS) व मेहेर सिंग्नल येथे सीसीटीव्ही बसविण्यात आले. मात्र अद्याप त्याचे नियंत्रण वाहतूक (traffic control) शाखेला देण्यात आले नसल्याने काही बेशिस्त वाहनचालक दररोजच सिग्नलच्या नियमांचे पालन करताना दिसून येत नाही. शहरातील सर्वच सिग्नलवर सीसीटीव्ही बसवण्यामागील मूळ उद्देश म्हणजे शहरातील बेशिस्त वाहतुकीसह गुन्हेगारीवर त्यातून नियंत्रण साधणे शक्य होणार आहे.

स्मार्ट सिटीच्या कामाची पध्दत पाहता सर्व कामे धिम्या गतीने सुरु असल्याने शहरात सीसीटीव्ही यंत्रणा (CCTV system) कार्यान्वित करण्यासाठी अजून किती दिवस जातात, हे सांगणे म्हणजे अशक्य गोष्ट आहे. बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी, याकरिता त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून शहरातील सिग्नलवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करून त्याचे नियंत्रण वाहतूक शाखेला देण्यात येणार असल्याने जर कुणी सिग्नल तोडला तर त्याच्या वाहनाच्या नंबर प्लेटचा (number plate) फोटो स्वयंचलित पद्धतीने काढला जाऊन वाहतूक शाखेतर्फे संबंधित वाहचालकाच्या पत्त्यावर दंडाची पावती पोहोचेल.

असे झाल्यास सिंग्नल तोडण्याचे प्रमाण कमी होऊन अपघाताच्या घटनांवर देखील नियंत्रण करता येईल. नाशिक शहरात सध्या पार्किंग (parking) हा विषय वाहनचालकांसाठी डोकेदुखीचा विषय ठरत आहे. काही वाहन चालक रस्त्यावरच आपली वाहने पार्क करून आपल्या नियोजित कामासाठी जातात आणि त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी हा नेहमीचाच विषय ठरला आहे. सीसीटीव्ही यंत्रणेमुळे या अडचणीवर देखील तोडगा निघु शकेल.

स्मार्टरोडची कमाल

घोडेस्वारीचा अनुभव घ्यायचा असेल तर त्रंबकनाका सिग्नल ते अशोकस्तंभ चौक दरम्यान दुचाकी चालवत जा, असे आता नाशिककर बोलू लागले आहेत. स्मार्ट सिटीचे काम अशा पद्धतीने असल्याने वाहतूक शाखेने 50 सिग्नलवर सीसीटीव्ही बसवण्याचा पाठवलेला प्रस्ताव स्मार्ट सिटीच्या कार्यालयात हा धूळखात पडून राहील का? असा सवाल नाशिककर विचारत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या