Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedशिवसेनेच्या बालेकिल्ल्यात कोणत्या गटाचे वर्चस्व?

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात कोणत्या गटाचे वर्चस्व?

नाशिक | निशिकांत पाटील | Nashik

शिवसेनेच्या (shiv sena) दोनही गटांचे महानगरप्रमुख (Metropolitan Chief) हे नवीन परिसरात वास्तव्यास असल्याने आगामी महापालिका निवडणुकीमध्ये (Municipal election) नवीन नाशिकचे (nashik) चित्र कसे असणार? शिवसेनेचा बालेकिल्ला कोणत्या गटाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

- Advertisement -

एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून नवीन नाशिक (navin nashik) परिसराची ओळख होती. शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी मोर्चेबांधणी करत नवीन नाशकात (nashik) शिवसेनेची पायेमुळे घट्ट रोवायला सुरुवात केली होती व परिसर भगवेमय दृष्टीने प्रयत्न सुरु केले होते. अशातच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन करून भाजपसोबत (bjp) राज्यात सत्ता स्थापन करत खरी शिवसेना (shiv sena) ही आमचीच असे विधान केले होते.

शिंदे गटाने शिवसेनेचे महानगरप्रमुख हे नवीन नाशिक परिसरातील असल्याचे हेरत नवीन नाशकातील (navin nashik) माजी नगरसेवक प्रवीण उर्फ बंटी तिदमे यांना गटाचे महानगरप्रमुख पद देत नवीन नाशकातून शिवसेनेला खिंडार पडले. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने खेळी करत बंटी तिदमे अध्यक्ष असलेल्या महापालिकेच्या म्युन्सिपल कर्मचारी सेनेच्या पदावरून त्यांची हकालपट्टी केल्याचे जाहीर करत राजीव गांधी भवन (Rajiv Gandhi Bhavan) येथे असलेल्या म्युन्सिपल कर्मचारी सेनेच्या कार्यालयात प्रवेश घेतला.

त्यानंतर सत्ताधारी पक्षाचे महानगरप्रमुख असलेल्या तिदमे यांनी सरकारवाडा पोलीस (Sarkarwada Police) म्युन्सिपल कर्मचारी सेनेच्या कार्यालयावर दावा सांगत सरकारवाडा पोलीस ठाण्यात बडगुजर यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल केला. सध्या हा वाद परिमंडळ दोनच्या सहायक पोलीस आयुक्त तथा विशेष न्यायदंडाधिकार्‍यांकडे यांच्याकडे सुनावणीस आहे.

एकंदरीत नवीन नाशिकमध्ये शिवसेनेचे किती पदाधिकारी शिंदे गटात जातील हे तर येणारा काळ ठरवेल, मात्र गेल्या काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री भुसे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे माजी नगरसेवक शाम साबळे यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांच्यासोबत व महानगरप्रमुख बंटी तिदमे यांना उद्धव ठाकरे गटाचे किती माजी नगरसेवक फोडायला यश मिळेल, हे चित्र महापालिका निवडणुका नजीक आल्यावरच समजेल.

मात्र सध्या सुरु असलेला वाद विकोपाला जाऊ नये याकरिता पोलीस प्रशासनाची देखील कसरत होणार आहे. शिवसेनेच्या दोनही गटांच्या आपापसातील वादात आगामी महापालिका निवडणुकीत अन्य पक्ष्याला काही फायदा होईल का? हे येणारी वेळच ठरवेल, मात्र नागरिकांमध्ये याबाबत कमालीची उत्सुकता असल्याचे चौकाचौकांमधील गप्पांवरुन दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या