अहो, पार्किंग तरी कुठे करू?

नागरिकांना भेडसावतोय प्रश्न
अहो, पार्किंग तरी कुठे करू?

नाशिक । वैभव कातकाडे | Nashik

शहरात जुलै महिन्यपसून (July month) नो पार्किंग झोनमध्ये (No parking zone) उभ्या असलेल्या गाड्यांना टोईंग (Towing) करून उचलून नेण्यास सुरुवात झाली. सद्यस्थितीत टोइंग होत असलेल्या ठिकाणांच्या जवळपास वाहनतळच नसल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे अहो, पार्किंग तरी कुठे करू असा आर्त प्रश्न नागरिक करत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात वाहनतळाचा प्रश्न न सोडवताच टोइंग कारवाई सुरू केली, अशी ओरड होत आहे.

दरम्यान, पोलिस प्रशासनाने (Police administration) टोइंग कारवाई सुरू करण्यापूर्वी नागरिकांकडून हरकती, सूचना मागवल्या होत्या. त्यावेळी मोजक्या सूचना वगळता कोणीही त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे आता आरोप करण्यापेक्षा नियम पाळण्याची वृत्ती अंगीकारून वाहनचालकांनी कारवाई टाळली पाहिजे. जिल्हा प्रशासन (District Administration), पोलीस प्रशासन (police administration), महापालिका (Municipal Corporation) यांनी जबाबदारी ओळखून शहरात पुरेशी वाहनतळं उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. रस्त्याच्या कडेला बेशिस्तरीत्या वाहने उभी करून वाहनचालक त्यांची कामे करण्यासाठी निघून जातात.

त्यामुळे वाहतूक कोंडी (Traffic jams) होऊन इतरांच्या वेळेचा अपव्यय होत होता. यावर तोडगा काढण्यासाठी वाहतूक शाखेने (Transportation Branch) सुरुवातीला बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई (Punitive action) केली. मात्र, त्याचा अपेक्षित परिणाम दिसत नसल्याने त्यांनी टोइंग व्हॅन (Towing van) सुरू करण्याचा निर्णय घेतला . त्यानुसार शहरातील मोजक्या भागात टोइंग कारवाईस सुरुवात झाली.

‘आधी वाहनतळ द्या, मग कारवाई करा’, अशी मागणी नागरिकांकडून सोशल मिडीयासह सर्वच स्तरावर होत आहे. कारवाई सुरू होताच वाहनतळ नसल्याचा प्रश्न समोर आला असून प्रत्यक्षात स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील प्रशस्त रस्त्यालगत आता वाहने पार्क करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, तेथेही बेशिस्तरीत्या वाहने पार्क केली जात असल्याचे चित्र असते. त्यामुळे टोइंग कारवाई होत असल्याने दंडाच्या भीतीपोटी का होईना शिस्त लागून वाहतूक कोंडीची समस्या निकाली लागण्याची शक्यता आहे.

सायकल ट्रॅक झाला पार्किंग स्पॉट

दोन वर्षांपूर्वी स्मार्ट रोडचे (Smart Road) उद्घाटन झाले. शहरात प्रदूषण (Pollution) कमी व्हावे. सायकलचे प्रमाण वाढावे या उद्देशाने स्मार्ट रोड बनविताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पादचारी मार्ग (Pedestrian walkway) आणि वाहतुकीच्या रस्त्याच्या मध्ये एक सायकल ट्रॅक (Cycle track) करण्यात आला. या सायकल ट्रॅकची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात झाली. मात्र, सध्याची वास्तव परिस्थिती बघता या ट्रॅकचा वापर सायकल चालविण्यासाठी कमी पण अवैध पार्किंग (Illegal parking) साठीच होत असल्याचे बघायला मिळत आहे. अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका या भागात असलेल्या सायकल ट्रॅकबाबत फक्त एकाच ठिकाणी दिशादर्शक फलक आहे.

त्यासोबतच या रस्त्यावर महत्वाचे असे जिल्हाधिकारी कार्यालय (Collector's Office), होमगार्डचे ऑफिस (Homeguard's office), जिल्हा सत्र न्यायालय, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आणि सेंट्रल बस स्थानक या महत्वाच्या कार्यालयांचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे हा रस्ता नेहमीच रहदारीचा रस्ता म्हणून ओळखण्यात येतो. याठिकाणी कामानिमित्त येणार्‍या नागरिकांना गाड्या कुठे पार्क कराव्या हा प्रश्न असतो. न्यायालयात असलेली पार्किंग ही फक्त वकिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे वाहनधारक सर्रास पादचारी मार्ग आणि सायकल ट्रॅकवर वाहने पार्क करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com