Friday, April 26, 2024
HomeUncategorizedआदिवासी समस्यांचा ‘घोट’

आदिवासी समस्यांचा ‘घोट’

खोकरविहीर । देवीदास कामडी | Khokar Vihir

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही आजही ग्रामीण भागातील (rural area) पाणी समस्या (water problem) जैसे थे आहे. पाण्यासाठी रानोमाळ भटकणार्‍या बायाबापड्या यांचा संघर्ष आजही थांबलेला नाही, यावर भाष्य करणारी गोष्ट ही शॉर्ट फिल्म (Short film) नाशिक जिल्ह्यातील (nashik district) पाण्यासाठी काम करणार्‍या जलपरिषद परिवाराने सुजय फिल्म प्रोडक्शनच्या प्लॅटफॉर्मवरून आणली आहे आणि या प्रश्नाला वाचा फोडली आहे.

- Advertisement -

यामध्ये प्रामुख्याने घोट घोट पाण्यासाठी वणवण फिरणार्‍या महिलांची समस्या मांडतानाच रस्ते (road), आरोग्य (health), रोजगार (employment), स्थलांतर आदी विषयांकडे लक्ष वेधले आहे. या लघुपटाच्या मुख्य भूमिकेत नायक-नायिका नसले तरी कौशी नावाच्या छोट्या मुलीला मध्यवर्ती ठेवत त्यातून आशय प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला आहे. लघुपटात कौशी मुकी दाखवण्यात आली आहे

रात्रीच्या वेळी पाणी संपल्यानंतर ती आणि तिची गरोदर आई पाणी आणण्यासाठी जातात. तेथे रात्रीच्या अंधारात ओढवलेल्या प्रसंगानंतर पुढील नाट्यमय प्रसंग दाखवण्यात आले आहेत. मुकी असणारी कौशी एकप्रकारे आदिवासी समाजाचे प्रतीक आहे. तिला आपल्या भावना, दुःख मांडता येत नाहीत. ती जे सांगते ते प्रत्येकाला समजून घ्यावे लागते.

अगदी तसेच आदिवासी समाजाच्या (tribal community) बाबतीत म्हणता येईल. स्वातंत्र्याला सात शतके होऊनही आदिवासी भागात अजूनही पायाभूत सोयी, आरोग्य (health), शिक्षण (education), रोजगार, पिण्याचे पाणी पोहोचलेली नाही. प्रत्येक निवडणुकीत त्यांना वेगवेगळी आश्वासने देऊन मतदान पार पाडले जाते. मात्र त्यांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात असेच आतापर्यंत आपल्या अवनत अवस्थेबद्दल मुका असणारा हा समाज एक दिवस जागा होऊन बोलू लागेल, असा सूचक संदेश देण्याचा प्रयत्न लघुपटाच्या शेवटच्या प्रसंगातून दिला आहे.

लघुपटाच्या शेवटी तिचा मामा आपल्या बहिणीच्या मृत्यू वेळी कायदा सुव्यवस्था, आरोग्य व राजकीय क्षेत्रातील पदाधिकार्‍यांवर चिडतो. व्यवस्थेने आपल्या बहिणीचा बळी घेतल्याचे तो तेथे उपस्थित असणार्‍यांना सुनावतो आणि लघुपट संपतो. एकीकडे देश आंतरराष्ट्रीय स्तरावर नवनवीन झेप घेत असताना दुसरीकडे पाण्याचा प्रश्न कोणाला सोडवता आला नाही, हे मात्र सत्य आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या