Sunday, April 28, 2024
HomeUncategorizedमंदिराचे काय चुकले?

मंदिराचे काय चुकले?

– डॉ. ऋतु सारस्वत, समाजशास्र अभ्यासक

बॉलिवूडची अभिनेत्री मंदिरा बेदी यांनी पतीच्या पार्थिवाला खांदा देण्यावरुन आणि अंत्यसंस्काराच्या वेळी जीन्स टि-शर्ट घातल्यावरुन सध्या टीकाटिप्पणी सुरू आहे. वास्तविक, पती गेल्यावर विधवा पत्नीच्या मनात निर्माण होणार्‍या भावना सारख्याच असतात. मग झगमगाटाच्या दुनियेत वावरते म्हणून मंदीराला खांदा देता येणार नाही का? या दुनियेत राहणार्‍या लोकांना भावना, प्रेम नसतात का? जिन्स आणि टिशर्ट ऐवजी एखादा पारंपरिक पेहराव केला असता तर ट्रोलर्सना तिच्या भावना अधिक चांगल्या रितीने समजून घेतल्या असत्या का? पेहरावरून भावनांचे मोजमाप करणे हा निष्ठूर विचार आहे. वस्तुतः आपली समस्या मंदिरा नसून बुरसटलेली मानसिकता ही आहे.

- Advertisement -

बॉलिवूडची अभिनेत्री मंदिरा बेदी यांनी पतीच्या पार्थिवाला खांदा देण्यावरुन आणि अंत्यसंस्काराच्या वेळी जीन्स टि-शर्ट घातल्यावरुन लोकांच्या उमटलेल्या प्रतिक्रिया या बुरसटलेल्या मानसिकतेचे दर्शन घडवतात. हा समाज सभ्यतेचा आव आणण्याबरोबरच आधुनिक विचारसरणीचा दावा करतो. परंतु महिलांचा प्रश्‍न येतो तेव्हा तिला पितृसत्ताक कुटुंब पद्धतीत बसवण्याचा प्रयत्न करतो आणि बिथरल्यासारखा वागतो. मंदिरा बेदीचा पेहराव आणि पतीच्या पार्थिवाला खांदा देण्याच्या निर्णयावरुन समाजातील एका गटात तीव्र नाराजी उमटली आहे. सोशल मीडियावर या कृतीवरून आरोपांच्या ङ्गैरी झडल्या गेल्या आहेत.

सध्याच्या काळात आपण खूपच निष्ठूर झालो आहोत आणि ही बाब दु:खद आहे. आपल्या भावना अतिशय पूर्वग्रह दुषित विचाराने भरलेल्या आहेत. महिलेला केवळ आपण कागदोपत्री मान आणि सन्मान देतो. प्रत्यक्षात एखादी नवी परंपरा रुजली तर ती त्रासदायक ठरु शकते, या विचाराने तथाकथित आधुनिक समाज विरोध करतो. आपण स्वत:ला कधीही प्रश्‍न विचारण्याचा प्रयत्न केला नाही. लोकांच्या भावनांचे मोजमाप करण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिली किंवा कसा मिळवला याबाबत कधीही विचार झाला नाही. वास्तविक आपण कोणालाही कसेही आणि काहीही बोलले तरी ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर खपवले जाते आणि ते आपणही गृहित धरले आहे. परंतु एखाद्या हुतात्मा जवानाची पत्नी जेव्हा पतीच्या पार्थिवाला खांदा देते तेव्हा आपले मन हेलावते आणि रोमांच उभे राहतात. मग अन्य बाबतीत हा न्याय का लागू होत नाही.

या ठिकाणी देशासाठी बलिदान देणार्‍या जवानांची तुलना एका उद्योजकाची अजिबातच करायची नाही. परंतु एका विधवेच्या मनात असणारी भावना आणि तिला होणारा त्रास याची जाणीव होण्यासाठी तुलना केली जात आहे. पती गेल्यावर विधवा पत्नीच्या मनात निर्माण होणार्‍या भावना सारख्याच असतात. मग मंदिरा बेदी झगमगाटाच्या दुनियेत वावरते म्हणून तिला खांदा देता येणार नाही का? या दुनियेत राहणार्‍या लोकांना भावना, प्रेम नसतात का? मंदिरा बेदी जिन्स आणि टिशर्ट ऐवजी एखादा पारंपरिक पेहराव केला असता तर तिला ट्रोल करणार्‍या लोकांना तिच्या भावना अधिक चांगल्या रितीने समजून घेतल्या असत्या का? एखाद्या पेहरावरून भावनांचे मोजमाप केले जात असून हा निष्ठूर विचार आहे. आपली समस्या मंदिरा बेदी नाही तर बुरसटलेली मानसिकता ही आहे आणि ती पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. कोणत्याही तथ्याशिवाय प्रत्येक गोष्ट धर्माच्या तराजूत मोजणारा समाज हा भारतातील महान परंपरेपासून अनभिज्ञ असून त्या परंपरेत महिलेला नेहमीच समांतर स्थान देण्यात आले आहे. आधुनिक कपड्यांपुरताच मर्यादित राहणारा समाज आधुनिकता हा शब्द विचारांशी जोडलेला आहे हे जाणून आणि समजून घेण्याचेही कष्ट घेत नाही.

आधुनिकता म्हणजे सर्वांना समान न्याय, कोणताही भेदाभेद नसणे, सर्वांच्या विचारांचा आदर करणे होय. प्राचीन काळातील ग्रंथात असलेल्या वेदांमध्ये स्त्रीला सर्व अधिकार दिले असून त्यावर आज पुरुषांची एकाधिकारशाही सुरू आहे. तथाकथित बुद्धिजीवी वर्गाला हजारो वर्षांपूर्वी लिहलेल्या वेदातही विधवा विवाहाचा उल्लेख होता ही बाब ठावूक आहे का? नाही. म्हणून हा आधुनिक आणि सभ्य समाज धर्माच्या नावावर आज एकविसाव्या शतकातही विधवा विवाहाचा विचार मान्य करत नाही. ऋग्वेदात स्पष्टपणे म्हटले की, ङ्गउदीर्ष्व नार्यस्तू जीवों गतासुमीतमुप शेष एहि. हस्तग्राभस्य दिधिषोस्तवेदं पत्युर्जनत्वमभि सं बभूवफ म्हणजेच, हे विधवा स्त्री, जो सोडून गेला आहे, त्या मृत पतीला सोडून उठ आणि जीवंत लोकांत पतीचा शोध घे. त्यासमवेत संततीचा विचार कर. या मंत्रांचा सध्याच्या काळात सर्वांना विसर पडला आहे. तथाकथित सभ्य समाजामध्ये ही बाब नवीन परंपरा रुजवणारी होती आणि ती सहजासहजी मान्य होणारी नव्हती. परंतु धर्म आणि परंपरेचा सोयीने अर्थ लावला जात असताना एखाद्या महिलेस कसे स्वीकारायला हवे, यावरुनही संभ्रम आहे.

आपण महिलेला नेहमीच अमानुष वागणूक दिली आहे. यापासून कोणताच वर्ग अपवाद राहिलेला नाही. जर एखाद्या विवाहित अभिनेत्याशी एखाद्या नायिकेचे संबंध जोडले गेले तर त्या नायिकेला नेहमीच दुषणं दिली जातात आणि पुरुषाला मात्र निर्दोष ठरवले जाते. स्त्री शक्तीला कमी लेखणारा समाज हा अचानक स्त्रीला एवढी शक्ती देतो की काही वेळा चांगला पुरुष देखील शत्रू वाटू लागतो. विवाहानंतर काही दिवसांत किंवा महिन्यात एखाद्याची नोकरी सुटली, व्यापारात नुकसान झाले तर त्याचे खापर नववधूवर ङ्गोडले जाते. हे तिचे दुर्देव म्हणावे लागेल. जर एखाद्या अपघातात नवविवाहितेच्या पतीचा मृत्यू झाला तर पत्नीला अपशकूनी म्हणून हिणवले जाते.

असा आरोप करताना समाजाला कोणतीही लाज वाटत नाही. एखादेवेळी पत्नीच्या आकस्मिक मृत्यूसाठी एखाद्या पुरुषाला जबाबदार धरल्याचे उदाहरण आहे का?े समाज इतका कठोर आणि अन्यायकारक का बनला याबाबत आपण कधी विचार केला आहे का? खरोखरच एखादी स्त्री एवढी शक्तीशाली आहे की ती कोणाच्या परवानगीशिवाय एखाद्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित करेल किंवा एखाद्याच्या मृत्युला कारणीभूत ठरेल. एखादी स्त्री अवहेलना सहन करत असेल, मानअपमान सहन करत असेल तर ती त्यागाची मूर्ती, आदर्श ठरवली जाते. याला विरोध केला तर ती वाईट असल्याचा शिक्का मारला जातो. त्यामुळे तिचे कोणतेच स्थान निश्‍चित नाही. अशा स्थितीत स्वत:ला माणूस म्हणून सिद्ध करण्यासाठी होणारी धडपड मात्र ही कधीही न संपणारी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या