Friday, April 26, 2024
HomeUncategorizedमानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय करावे?

मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय करावे?

रोजची आपली धकाधकीची जीवनशैली, जीवघेणी स्पर्धा, कामकाजाची जागा, शिक्षण, खेळ अशा अनेक ठिकाणी सर्व गोष्टींचा तोल सावरता सावरता आपल्यावर मानसिक ताण वाढत जातो. अनेकदा आपल्याला नैराश्य येते. कशातच रस राहत नाही. त्याने अनेक शारीरिक आजारांना आपणच आमंत्रण देतो आणि त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात.

मंगेश पाडगांवकर यांंच्या एका कवितेप्रमाणे-

- Advertisement -

सांगा कसं जगायचं?

कण्हत कण्हत की गाणं म्हणत

तुम्हीच ठरवा?

मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी खाली दिलेल्या गोष्टी तुम्ही करू शकता…

1. सकाळी लवकर उठणे व चालणे, जॉगिंग, छोटे-मोठे व्यायाम, योग केल्यामुळे शरीरात उर्जा, उत्साह निर्माण होतो व तो आपल्याला दिवसभरासाठी पुरतो.

2. सकारात्मकता आतूनच निर्माण करा व स्वतःला बोला मी आनंदी आहे.

3. कुटुंबासोबत रहिल्याने, त्यांच्याशी बोलल्याने आपण आनंदी राहतो. मनातल्या गोष्टी त्यांच्याशी बोलून मनावरचा ताण बराच कमी करता येतो.

4. सोशल साईट चा आपल्यावर वाईट परिणाम होईल इतका वापर करू नका.

5. अधिक विचार करणे टाळा. त्यामुळे आपल्या वागणुकीवर आणि भावनांवर परिणाम होतो.

6.प्रत्येकाने एखादा तरी छंद जोपासावा ज्यातून आपल्याला आनंद मिळतो.

7. आपल्यातल्या चांगल्या गुणांचा लोक कल्याणासाठी वापर करा. त्याने तुम्हाला समाजाकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन मिळेल.

8.जसे शरीराच्या आजारांसाठी आपण डॉक्टरांकडे जातो, तसेच आपल्याला शक्यता वाटली तर मानसशास्त्राचे डॉक्टर आहेत, त्यांचाही योग्य तो सल्ला घ्यावासा वाटला तर अवश्य घ्या.

9.ज्या गोष्टी आपल्याला पटतात त्यावर ठाम राहा. कुणाच्या दबावाखाली आपले निर्णय बदलू नका.

10.चौरस आहार व पुरेशी झोप.

शेवटी आपले आरोग्य आपल्याच हातात असते.

क्वोरा (Quora) या प्रश्‍न-उत्तरांच्या एका संकेतस्थळावर एका प्रश्‍नाला उत्तर देताना श्रुती यांनी ही माहिती दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या