Monday, April 29, 2024
HomeUncategorizedद्राक्षशेतीला पर्याय हवा!

द्राक्षशेतीला पर्याय हवा!

ओझे । विलास ढाकणे | Ozhe-Dindori

दिंडोरी तालुका (dindori taluka) हा धरणाचा (dam) तालुका असल्यामुळे नदी (river) व धरण (dam) परिसरामध्ये मुबलक पाणी (water) उपलब्ध असल्यामुळे येथील शेतकरी (farmers) वर्गाने जलवाहिनीद्वारे धरण व नदीचे पाणी आपल्या बांधापर्यत आणले.

- Advertisement -

पडीत असलेल्या माळरानाचे सपाटीकरण करून बॅककडून द्राक्षबागेसाठी (Vineyard) कर्ज उपलब्ध करूण आपल्या शेतात द्राक्षबागा फुलविल्या. मात्र, सतत हवामानात बदलामुळे (Climate change) द्राक्ष उत्पादक (Grape growers) शेतकरी सध्या अस्वस्थ झाल्याचे चित्र तालुक्यात पाहण्यास मिळत आहे. दिंडोरी तालुक्यात शेतकरी शोधता आहे.

द्राक्ष शेतीला (Grape farming) पर्याय (option) गेल्या दोन वर्षापासून करोना (corona) विषाणूच्या संसर्गामुळे द्राक्ष शेतीचे गणित पूर्णपणे कोलमडून गेले आहे. करोनामुळे द्राक्षाची निर्यात थांबली परिणामी स्थानिक बाजारपेठ द्राक्षाला मागणी नसल्यामुळे द्राक्ष उत्पादक हैराण झाले. व्यापारी नाही ट्रान्सपोर्ट बंद (Transport closed) यांचा फटका गेल्या दोन वर्षापासून द्राक्ष शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसला.

पहिल्या वर्षी शेतकर्‍यांनी हा फटका सहन करूण दुसर्‍या द्राक्ष हंगामाची जोरदार तयारी केली. पंरतु दुसर्‍या वर्षीही करोनामुळे तोच फटका पुन्हा बसला 50 टक्के द्राक्षबागा विकल्या गेल्या नाही 5 ते 6 रुपये किलोनो बेदाण्यासाठी द्राक्ष विकली गेली. त्यात असंख्य शेतकर्‍यांनी द्राक्ष बांधावर खुडून टाकली सलग दोन वर्षा द्राक्ष उत्पादकाना भांडवल सुद्धा निघाले नाही.

त्याप्रमाणे करोनामुळे द्राक्षबागा उशिरा खाली झाल्या परिणामी द्राक्षबागाना विश्रांतीचा कालावधी पुरेसा मिळाला नाही. द्राक्षवेली पूर्णपणे अशक्त झाल्या. त्यांमुळे वेलीमध्ये गर्भधारणा न झाल्यामुळे ऑक्टोबर छाटणीला द्राक्षवेलीवर घडच निघाले नाही. काही ठिकाणी घड निघाले पण अतिशय कमी त्यामुळे द्राक्षबागा उभ्या राहिल्या सतत दोन वर्षा द्राक्षबागाचा खर्च न परवडल्यामुळे अनेक द्राक्ष उत्पादकांनी तालुक्यात द्राक्ष बागेला कुर्‍हाड लावण्याचा निर्णय घेतला आहे.

करोना विषाणूच्या संसर्गामुळे दिंडोरी पश्चिम भागासह पेठ, सुरगाणा तालुक्यातील मजुरांनी द्राक्षबागेच्या कामास येण्यास नकार दिला या तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांनी मजुराना बाहेर कामाला जाण्यास मज्जाव केला. परिणामी द्राक्षबागाची छाटणीची कामे वेळेवर झाली याचा फटका सर्व द्राक्ष बागायदाराना कमी अधिक प्रमाणात बसल्यामुळे सध्या तालुक्यातील अनेक द्राक्षबागा द्राक्ष घडाविना उभ्या आहे.

या उभ्या द्राक्षबागाचा खर्च परवडण्या सारखा नसल्यामुळे शेतकरी वर्गाने बागा तोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात चालूवर्षी नोव्हेंबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पावसामुळे घडकुज, डावणी, भुरी रोगाचे प्रमाण अतिप्रमाण वाढले. फवारणीच्या खर्चाचे प्रमाण वाढले त्यात अनेक द्राक्षबागा गळकुज होऊन उभ्या राहिल्या आहे. त्यांमुळे सध्या द्राक्ष उत्पादक शेतकरी अनेक संकटाचा सामना करताना दिसत आहे.

द्राक्ष पीक हे अति संवेदनशील असल्यामुळे वातावरणातील बदलाचा द्राक्षावर मोठा परिणाम होत असतो. प्रत्येकवर्षी द्राक्ष पिकावर अवकाळी पाऊस, गारपिट आशा नैसर्गिक संकटाचा सामना गेल्या अनेक वर्षापासून द्राक्षबागायदार करताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षापासून काढणीला आलेल्या द्राक्षबागाचे अवकाळीने मोठे नुकसान केले आहे. सर्व खर्च करून काढणीला आलेल्या द्राक्षबागाचे असे नुकसान झाल्यामुळे शेतकरी मोठ्याप्रमाणात कर्जबाजारी झालेला आहे.

त्यात बॅक (bank) व सोसायट्यांचे काढलेले मध्यम मुदत कर्ज, पिक कर्ज पूर्णपणे थकलेले आहे सध्या बॅका शेतकरी वर्गाला उभ्या करत नाही शेतकर्‍यांची पत राहिलेली नाही अनेक बॅक व सोसायटीकडून शेतकर्‍यांना जमिनीच्या लिलावाच्या नोटीसा (Notice of auction) गेल्या. दोन वर्षापासून येण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक धास्तावला आहे.

द्राक्षपिकासाठी लागणारे रासायनिक खते (Chemical fertilizers), विद्रव्य खते (Soluble fertilizers),रासायनिक औषधे, जैविक औषधे (Biological drugs), थिनिंग डिपिंगचा खर्च, छाटणीचा खर्च, शेणखत वाढलेली मजुरी या सर्वाचे भाव गगनाला भिडल्यामुळे द्राक्ष उत्पादक हैराण झालेला दिसत आहे. सध्या दिंडोरी तालुक्यात नैसर्गिक आपत्ती व कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे द्राक्ष उत्पादकाचे जे नुकसान झाले त्यांमुळे बहुसंख्य शेतकर्‍यांनी आपल्या द्राक्ष बागेला कुराड लावण्यास सुरुवात केली असून तोडलेल्या द्राक्ष बागेत काय पीक घ्यावे याचे नियोजन सध्या बळीराजा करताना दिसत आहे.

यात तोडलेल्या द्राक्षबागेत वेलवर्णीय पिक घेण्यास शेतकरी वर्गाने पंसती दिली आहे. वेलवर्णीय पिकासाठी अँगल तारीची फिटिंग महत्वाची असते त्यांमुळे तोडलेल्या द्राक्षबागेत दुधीभोपळा, कारले, दोडके, गिलके पिके चांगले होतात. काही शेतकरी याच ठिकाणी रब्बी व खरीप हंगामातील टोमॅटो पिकांचे नियोजन करताना दिसत आहे. यात काही शेतकर्‍यांकडून ऊस पिकाला प्रथम प्राधान्य मिळत आहे. ऊस पिकांवर ऊन, थंडी, पाऊस यांचा फारसा परिणाम होत नाही. उत्पादक जरी कमी निघाले तरी पैसा हमखास अशी शेतकर्‍यांची सध्या धारणा झालेली आहे.

द्राक्षबागामध्ये कर्जबारी झालेल्या शेतकर्‍यांपुढे सध्या अनेक समस्या उभे आहे. त्यात प्रामुख्याने मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा खर्च ,शेतीचा खर्च, घरातील वृद्धांचा दवाखान्याचा खर्च, लग्नाला आलेल्या मुला, मुलींचा खर्च या एक ना अनेक समस्या सध्या शेतकरी वर्गापुढे आ वासून उभ्या आहे तर शासन मात्र पिकांचे पंचनामे करून अल्पशी मदत देऊन शेतकर्‍यांची बोळवण करताना दिसत आहे शासनाने शेतकर्‍यांच्या पिकांना हमीभाव दिल्यास शेतकर्‍यांचे चित्र बदलू शकते अशी चर्चा सध्या होताना दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या