Sunday, April 28, 2024
HomeUncategorized'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम्' : पण 'हॅलो' शब्द नेमका आला कुठून?

‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ : पण ‘हॅलो’ शब्द नेमका आला कुठून?

अहमदनगर | Ahmednagar

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत यापुढे महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालयांत अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करतील, या सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घोषणेवरून राजकारण तापले आहेत.

- Advertisement -

सरकारी कार्यालयात फोनवर नमस्कार करण्याऐवजी वंदे मातरम् म्हणण्याच्या निर्णयाला रझा अकादमीने विरोध केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी संवाद साधताना जय बळीराजा म्हणाव अशी सूचना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कर्याकर्त्यांनी सूचना दिली आहे. तर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मी जय महाराष्ट्र म्हणेन, अशी प्रतिक्रिया दिली आहे. पण आजच्या काळात एखादी व्यक्ती सुशिक्षित असो किंवा अशिक्षित, फोन करताना सर्वच जण पहिला शब्द हॅलो बोलतात. परंतु आपणास कधी हा प्रश्न पडला आहे की हॅलो हा शब्द नेमका आला कुठून?.. जाणून घेऊयात…

अलेक्जेंडर ग्राहम बेल यांनी १० मार्च १८७६ मध्ये टेलिफोन चा शोध लावला होता, त्यांना या शोधाचे पेटंट मिळाले, तेव्हा त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या सोबती मित्राला एक फोन केला तो मित्र होता वाटसन. आणि बेल यांनी त्याला फोन वर मला तुझी गरज आहे, असे म्हटले आणि त्याला आपल्याकडे बोलावून घेतले. बेल फोन वर हॅलो नाही तर अहो (Ahoy) असे म्हणत. आणि जेव्हा लोकांनी सर्वप्रथम फोनचा वापर सुरु केला तेव्हा लोक एकमेकांना आर यु देअर (Are You There) असे विचारत असत. यामागे असे कारण होते कि समोरच्या व्यक्तीला आपला आवाज व्यवस्थित जातो कि नाही. पण एकदा थॉमस अल्वा एडिसन यांनी Ahoy ला हॅलो ऐकले आणि तेव्हापासून त्यांनी फोन वर सुरुवातीला हॅलो बोलण्याचा प्रस्ताव मांडला. १८७७ मध्ये एडिसन यांनी या प्रस्तावाला पिट्सबर्ग सेंट्रल डिस्ट्रिक्ट आणि प्रिंटिंग टेलीग्राफ कंपनीचे मालक स्मिथ यांना पत्र लिहिले कि, टेलिफोन वर जेव्हा बोलण्याची सुरुवात होईल तेव्हा सगळ्यांनी हॅलो या शब्दाचा उल्लेख करावा आणि तेव्हा त्यांनीही हॅलो या शब्दाचाच सर्वप्रथम वापर केला होता.

दरम्यान फोन कॉलवर हॅलो या शब्दाच्या जन्माबद्दल आणखी एक सिद्धांत आहे. दाव्यानुसार, अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांच्या गर्लफ्रेंडचे नाव हॅलो असे होते. त्यामुळेबेल यांनी बनवलेल्या पहिल्या टेलिफोनवरून ते त्यांच्या गर्लफ्रेंडशी बोलताना सुरवातीला तीच हॅलो असे नाव घेत असत. त्यामुळे फोनवर बोलताना हॅलो हा शब्द वापरला जाऊ लागला.

(माहिती स्त्रोत गुगल)

- Advertisment -

ताज्या बातम्या