शिवसेनेचा जोर कोणाचा?

मुख्यमंत्री शिंदे यांचे नाशिकमध्ये तीन वेळा दौरे
शिवसेनेचा जोर कोणाचा?

नाशिक | फारूक पठाण | Nashik

राज्याचे मुख्यमंत्री (Chief Minister) तथा बाळासाहेबांची शिवसेना (shiv sena) पक्षाचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नुकताच नाशिक (nashik) दौरा करून गेले, मात्र पाहिजे तसा त्यांच्या दौरा झाला नसल्याचे राजकीय (politics) वर्तुळात चर्चा आहे.

शिंदे यांनी बंड करून तब्बल शिवसेनेतील 40 आमदारांना आपल्याबरोबर घेतले होते. नाशिक मधील मालेगाव (malegaon) तसेच नांदगाव (Nandgaon) येथील दोन्ही आमदार त्यांच्याबरोबर होते. त्यामुळे आगामी काळात नाशिक (nashik) मधील मोठ्या संख्येने शिवसेनेचे नेते, माजी लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक शिंदे यांचे बरोबर जाणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती, मात्र अद्याप पाहिजे त्या प्रमाणात शिंदे यांच्या शिवसेनेला नाशिकमध्ये यश मिळाले नसल्याचे दिसून येत आहे. फक्त माजी नगरसेवक सोडलं तर अद्याप एकही माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झालेला नाही. यामुळे शिंदेंचा दौरा हा थंड झाल्याचे चित्र आहे.

नाशिक दौर्‍यात शहरात मुख्यमंत्री शिंदे गटाच्या पक्ष कार्यालय उद्घाटन सोहळा झाला असला तरी ठाकरे गटातील अनेक दिग्गज नगरसेवक यावेळी पक्षप्रवेश करतील असा दावा करण्यात येत होता, मात्र तसे झाले नाही. तर दुसरीकडे मुन्सिपल कामगार सेनेच्या अध्यक्षपदावरून सुरू झालेला वाद त्या दिवशी पुन्हा उफाळून आला होता.

शिंदे गटाचे नेते कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात व्यस्त असताना माजी मंत्री तथा शिवसेनेचे मुन्सिपल कर्मकार सेनेचे संस्थापक असलेले बबन घोलप (baban gholap) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना पक्षाचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची शहराध्यक्षपदी केली होती, मात्र त्यांनी कार्यालय ताब्यात घेतले नव्हते. हीच संधी साधत बडगुजर यांनी महापालिकेत येऊन आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.

यामुळे इतर पक्षांच्या नेत्यांचा प्रवेश तर दूरच राहिले,तर शिंदे गटाच्या ताब्यात असलेली मुन्सिपल कर्मचारी सेना तसेच त्याचे कार्यालय देखील उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे गेल्यामुळे तो वेगळा फटका शिंदे गटाला बसला. मात्र शिंदे गटाचे शहराध्यक्ष तथा म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष असल्याचा दावा करणारे माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी थेट पोलीस ठाण्यात या बाबत तक्रार केली आहे.

शिवसेनेत ऐतिहासिक बंडखोरी झाल्यानंतर सर्वत्र पडझड होत असताना नाशिकमधील (nashik) नगरसेवकांनी पक्षप्रमुख ठाकरेंना साथ दिली. नवीन नाशिक भागातील माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी थेट मुंबई (mumbai) मुख्यंमत्री शिंदे गटात प्रवेश करून महानगरप्रमुख पद आणले आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दोन आमदार तसेच एक हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांच्या रूपाने खासदार तर तिदमे यांच्या रूपाने एक माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले होते.

यामुळे शिंदे गटाचे ताकद नाशिकमध्ये वाढली होती तर काही दिवसांवर दसरा मेळावा होणार होता शिंदे यांच्या गटाकडून पुन्हा असा दावा करण्यात येत होता की मुंबईच्या मेळाव्यात नाशिक मधील सुमारे एक डझन माजी नगरसेवक प्रवेश करतील, मात्र मेळावा होऊन गेलं तरी एकाही माजी नगरसेवकाने प्रवेश केला नाही. किरकोळ स्वरूपाचे प्रवेश सोडले तर नाशिक शिवसेनेतील एकही दिग्गज नेता अद्याप शिंदे गटाला जोडला गेलेला नाही.

यामुळे ऑक्टोबर रोजी नाशिक मध्ये बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री शिंदे येणार आहे. त्या वेळेला नाशिकमध्ये मोठा बॉम्ब फुटणार असल्याचा दावा देखील करण्यात आला. मात्र शिंदे आले दौरा केला कार्यालयाचे उद्घाटन केले या संपूर्ण दौर्‍यात एकही मोठा प्रवेश झाला नसल्यामुळे शिंदे यांचा दौरा फुसका बारच निघाला, अशी चर्चा सुरू झाली आहे.

उद्धव गटात देखील डॅमेज कंट्रोल व्हावे

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून राज्यभर प्रवेश सुरू झाले आहे. एकीकडे प्रवेश सोहळे लहान मोठ्या स्वरूपात होत आहे तर दुसरीकडे नुकत्याच झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत देखील शिंदे गटाला जागा मिळाल्याने उत्साह वाढला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे शिंदे गट ही लढाई देशाच्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे, मात्र दुसरीकडे पक्ष वाढीसाठी दोन्ही गटाकडून प्रयत्न देखील सुरू आहे.

दरम्यान उद्धव गटाकडे जे लोक आहेत त्यांना अजून बांधून ठेवण्याची गरज असून पक्षाने वरिष्ठ पातळीवरून त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे काही नेत्यांनी बोलून दाखवले आहे. नाशिक तसे पाहिले गेले तर बालेकिल्ला, यामुळे खासदार संजय राऊत सतत नाशिकला येऊन पक्षाचे संघटन मजबूत करत आले आहे. मात्र सध्या ते तुरुंगात असल्यामुळे नाशिकचे मुंबईशी संवाद तुटल्याचे दिसून येत आहे.

काही नेत्यांचे दौरे सुरवातीला झाले असले तरी आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांनी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सतत नाशिक करणे गरजेचे आहे तसेच स्थानिक वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याबरोबरच नागरिक समस्यांसाठी प्रसंगी आंदोलन उभारण्याची गरज असल्याचे देखील बोलले जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com