Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedद्वारका येथील भुयारी मार्गातून दुचाकी धावणार

द्वारका येथील भुयारी मार्गातून दुचाकी धावणार

नाशिक | Nashik | फारूक पठाण

नाशिकचे (nashik) प्रवेशद्वार असलेल्या द्वारका चौफुली (dwarka chaufuli) वरील वाहतूक कोंडी (traffic jam) ही जुनी समस्या आहे. त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी केंद्रापासून महापालिका प्रशासनापर्यंत (municipal administration) विविध प्रयोग करण्यात आले मात्र, ते अद्याप यशस्वी झाल्याचे दिसत नाही.

- Advertisement -

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन याठिकाणी चार बाजूने भुयारी मार्ग (subway) तयार करण्यात आले आहे, मात्र त्या भुयारी मार्गाचा देखील वापर होताना दिसत नाही. यामुळे सध्या महापालिकेने या भुयारी मार्गला टाळे ठोकले आहे. या भुयारी मार्गातून सीबीएस (CBS) प्रमाणे कमीत कमी पालिका बाजार तरी सुरू व्हावे, किंवा दुचाकी जाण्यासाठी तरी जागा उपलब्ध व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.या भुयारी मार्गाचा उपयोग सुरू झाल्यावर रात्रीच्या वेळी टवाळखोर मंडळी या ठिकाणी बसतात त्यांना चाप बसेल.

देशभरातून लाखो भाविक नाशिकमध्ये येतात. मात्र नाशिकचे प्रवेशद्वार असलेल्या द्वारका चौफुलीवरील वाहतूक कोंडी पाहून त्यांना देखील धक्का बसतो. द्वारका चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध प्रयोग आता पर्यंत झाले, मात्र एकही आतापर्यंत यशस्वी झाला नाही. मध्यंतरी पोलीस आयुक्तांनी (commissioner of police) अनेक मार्ग बदलून काही मार्ग एकेरी केले होते.

त्याचा उपयोग झाल्यावर काही प्रमाणात कोंडी कमी झाली होती, मात्र जो पर्यंत या ठिकाणी वाहतूक पोलीस (traffic police) व खाकीवर्दीतले पोलीस तैनात होते तो पर्यंत लोकांनी त्याचा पालन केले. पोलिसांनी येणे बंद करताच वाहतूक पुर्वीप्रमाणेच झाली आहे. या ठिकाणी पुर्वी मोठे सर्कल होते. कोंडी कमी करण्यासाठी ते देखील कमी करण्यात आला, सध्या अत्यंत कमी प्रमाणात सर्कल असूनही कोंडी काही कमी होण्याचा नाव घेत नाही.

दुसरीकडे द्वारका चौकाला अतिक्रमणाचा मोठा विळखा पडला आहे. जुने नाशिककडून येणार्‍या मार्गावर मोठ्याप्रमाणात रस्त्यात अतिक्रमण (encroachment) झाले आहे. त्याच प्रमाणे या ठिकाणी हातगाडीवाले देखील उभे राहतात. पुर्वीच हा मार्ग कमी त्याच अतिक्रमण यामुळे त्याचा भार चौकात पडतो. त्याच प्रमाणे नाशिकरोडहून येणार्‍या रस्त्याच्या कोपर्‍याला (हॉटेल गजानन जवळ) देखील अतिक्रमण पुन्हा वाढले आहे. अधिकृत धार्मिकस्थळ (religious place) हटविण्याची कारवाई झाली त्यावेळी हा भाग पुर्णपणे मोकळा करण्यात आला होता, मात्र मध्यंतरी पुन्हा त्याच वाढ झाल्याने मोठ्याप्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी होते.

जुनी द्वारका हॉटेलच्या कोपर्‍यावर रिक्षांची गर्दी देखील दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे औरंगाबाद (aurangabad road) रस्त्याने येणार्‍यांना त्याचा मोठा त्रास होतो. या ठिकाणीही हातगाडीवाल्यांची संख्या वाढली आहे. त्याचप्रमाणे द्वारका पोलीस चौकी जवळही कायम गर्दी राहते. बाहेरगावाहून येणार्‍या बस याच ठिकाणी थांबून प्रवाशांना सोडतात. एकाच वेळी दोन व त्यापेक्षा जास्त बस थांबल्यावर त्याच्या मागे वाहनांच्या रांगा लागायला सुरूवात होते.

यामुळे देखील वाहतूक कोंडी होते. अशा विविध कारणांनी द्वारका चौफुलीवर कोंडी होते, त्यावर एक उपाय म्हणून भुयारी मार्ग तयार करण्यात आले होते, मात्र त्याचा उपयोगच होत नसल्याने तो आता त्रासदायक ठरत आहे. द्वारका चौकातील चार ठिकाणी जाण्यासाठी व येण्यासाठी प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहे. ते इतके मोठे असून त्यामुळे देखील कोंडीत भर पडत आहे.

भुयारी मार्गाचा वापर होत नसल्याने त्याला प्रशासनाने टाळे ठोकले आहे. भुयारी मार्गाचा वापर व्हावा, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असतांना त्याला बंद करुन काय उपयोग होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातून दुचाकी जायला मार्ग तयार करण्याची गरज असून ते श्नय नसल्यास सिबीएस प्रमाणे आंतमध्ये लहान गाळे तयार करुन पालिका बाजार तरी व्हायला हवे. यामुळेह मनपाला देखील उत्पन्न मिळेल व काही बेरोजगारांना रोजगारही उपलब्ध होणार.

खरे तर ज्यावेळी मार्ग तयार झाले, त्यावेळीच नियोजन करुन सर्वांशी चर्चा करुन ‘स्काय वॉक’ सारखा प्रोजे्नट तयार करायला हवे होते. किंवा भुयारी मार्गातून पुण्याप्रमाणे दुचाकी व चारचाकीला जाण्यासाठी मार्ग दिला असता तर निश्चित द्वारका चौफुलीची वाहतूक कोंडी कमी झाली असती. आताचे भुयारी मार्ग तयार आहे, त्याचा उपयोग होतांना दिसत नाही. त्याचे रुपांतर व्यवसायिक कामासाठी करण्यासाठी केंद्राचे नियमात बसत नाही. म्हणून त्याचे निकष बदलून त्यात सिबीएस सारखे गाळे तयार केल्यावर त्याचा वापर होणार किंवा दुचाकीला जाण्यासाठी तरी मार्ग तयार व्हावे, यासाठी आपण केंद्र सरकाराकडे पाठपुरावा करणार आहोत.

– हेमंत गोडसे, खासदार

नागरिकांसाठी सोय व्हावी खरेतर नागरिकांच्या सोयीसाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आले, मात्र आतापर्यंत त्याचा फारसा उपयोग होतांना दिसत नाही. त्याचा वापर व्हावा व नागरिकांना सोय व्हावी, यासाठी आम्ही सतत मागणी केली आहे. रात्रीच्या वेळी टवाळखोर या ठिकाणी जमा होता. त्यांचाही बंदोबस्त व्हावा. सध्या भुयारी मार्ग बंद असल्याने त्याचा त्रास होत आहे. आंतमध्ये दुकाने टाकण्याची परवानगी तरी मिळावी. जेणेकरून गोरगरीबांचा फायदा होणार.

– अजीम सय्यद, जिल्हाध्यक्ष वाहतूक सेना

- Advertisment -

ताज्या बातम्या