पाणी अडवून आदिवासी विकास

पाणी अडवून आदिवासी विकास

खोकरविहीर । देवीदास कामडी | Khaokar Vihir

सुरगाणा (surgana), पेठ (peth), त्र्यंंबकेश्वर (Trimbakeshwar), पश्चिम दिंडोरी (dindori), इगतपुरी (igatpuri) या तालुक्यातील आदिवासी भागातील (tribal area) शेतकरी (farmers) विकसित होण्यासाठी व रोजगार (Employment), द्राक्षकामगार यांना स्थानिक रोजगार उपलब्ध होऊन स्थलांतर रोखण्यासाठी पाणी हाच एकमेव उपाय आहे.

जल (water), जंगल (forest) व जमीन (land) हीच आदिवासीची खरी संपत्ती आहे. त्रिसूत्री घटकांवर आदिवासी समाजाचा (tribal community) विकास आधारित आहे. शेतीला पाणी उपलब्ध झाल्यास शेतकरी बारमाही पीक काढुन रोजगार साधनामध्ये वाढ होईल. विविध उद्योग निर्मितीस चालना मिळेल, यासाठी तालुक्यातील नार, पार, पिंजाळ, दमणगंगा, उपनद्या, लहान मोठे नाले यांना छोटे मोठे सिमेंट प्लग बंधारे (Cement plug dams) बांधणे आवश्यक आहे. रोजगार निर्मिती करतांना या तीनही घटकांना धक्का लागू न देता स्थलांतर रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

जल

पाण्यावर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती (Job creation) होऊ शकते. पाणी जर मोठ्या प्रमाणत छोटे बंधारे, केटी बंधारे याद्वारे पाणी उपलब्ध झाल्यास शेती व शेतीवर आधारित उद्योग यामुळे स्थलांतर कमी होईल. मत्स्यशेती करूनही रोजगार उपलब्ध होईल. परंतु मोठी धरणे होऊ नयेत याला स्थानिक आदिवासींचा विरोध आहे. कारण विचारल्यास आदिवासींकडे मालकी हक्काची जमीन मुबलक असून वनक्षेत्र जास्त प्रमाणात आहे. जंगलाचे प्रमाण जास्त असल्यामुळे हीच आदिवासींची संपती नष्ट होऊ नये, यासाठी तालुक्यातील लोक मोठे प्रकल्पाला विरोध करीत आहेत.

तालुक्यातील शिक्षित लोकांनीच जनजागृती करुन गुजरात राज्यात जे घडले त्या पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वरमध्ये कदापि घडू नये, यासाठी छोट्या सिमेंट प्लग बंधारचेची मागणी करीत आहे आणि याला कुठलाही विरोध नाही. मोठ्या धरणांमुळे बरेचशे भूमीहीन होतात व बाकी अल्पभूधारक होतात. छोटे पाझर तलाव बांधणे, नद्यांवर 2 ते 3 कि.मी. अंतरावर केटी बंधारे बांधणे. वृक्ष लागवड करणे व त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे. मुळात पाणी जमिनीत जिरवायला हवे. जिरलेच नाही तर विहिरीत, बोअरवेल तसेच इतर जलस्त्रोतात पाणी कोठून येणार त्यासाठी विहीर, बोअरवेल रिचार्ज करणे आवश्यक आहे.

जंगल

लोणचे निर्मिती- जंगलातील विविध फळांपासून लोणचे निर्मिती उद्योग सुरू करता येईल. आवळा, करवंदे, भोकर, काकड, आंबा, तसेच वासत्यापासून (बांबु) मोठ्या प्रमाणात लोणचे बनवून मार्केटिंग केले तर रोजगार निर्मिती होईल. विविध वनस्पतींचे तेल- निरगुडी तेल, माक्याचे तेल, निलगिरीचे तेल आदी पानांपासून पत्रावळी तयार करणे, पळस, टेभुर्णी, आसंद, यांच्या पानांपासून पत्रावळी तयार करणे, तसेच चामेल व करवळ यांच्या पानांचा पत्रावळी म्हणून उपयोग करून रोजगार उपलब्ध होईल. किमान ज्या व्यक्तींना निसर्गाबद्दल आपुलकी आहे त्यांनी जरी समारंभात पानांच्या पत्रावळी जास्तीच्या मोबदल्यात का होईना मागणी केली तर नक्कीच पत्रावळ्या बनवल्या जातील.

बांबूपासून कुटीर उद्योग

आपल्या भागात मोठ्या प्रमाणात बांबू आहेत. बांबूपासून पूर्वी मोठ्या प्रमाणात घरगुती वापरात येणार्‍या वस्तू बनवल्या जात (सुप, डालखा, शेनुगला, दुरडा, झिला, मुसका, ताटुक, कनग्या, बिला ) इत्यादी वस्तु मोठ्या प्रमाणात बनवल्या जात. आजही काही प्रमाणात बनवल्या जातात. त्या मोठ्या प्रमाणात बनवल्या गेल्या तर त्यातून रोजगार निर्मिती उपलब्ध होईल. तसेच शेतीसाठी बांबू मोठ्या प्रमाणात उपयोगात येतो. कल्पवृक्ष मोह- मोहाचे झाड आज सगळ्यांना परिचीत आहे. मोह फुलांपासुन आयुर्वेदिक लाडु, सॅनिटायझर, तसेच त्यापासून योग्य प्रक्रिया करून जे मद्य बनवले जाते ते जर प्रमाणात (1 ते 2 झाकणे) घेतले तर ते एक औषधच आहे. मोह फळांपासून (मोहटं) भाजी व बियांपासुन तेल निर्मिती केली जाते. यात आणखी संशोधन केले व योग्य प्रकारे उपयोग केला तर हा कल्पवृक्ष ठरेल व मोठ्या प्रमाणत रोजगार निर्मिती करून देईल.

रानभाज्या

वर्षभरात विविध प्रकारच्या रानभाज्या (आकर्‍या, केनी, उळसा, तेरा, तेरी, देहगडी, वाघाटा, पेंढरा, चाईचा मोहुर, चवळ येल, मोखा, मोहटं, शेवळा, लोती) यातुन जसे रानभाज्या महोत्सव इत्यादी उपक्रमातून रोजगार उपलब्ध होईल.

जंगल कसे वाचवणार

आपल्या भागात जंगल नष्ट होण्याला आपलाच माणुस कारणीभूत आहे. साग बाहेर विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर तोड झाली. शेतीसाठी डाह्या जाळणे यामुळे जंगल तर तोडले गेलेच पण ते जाळल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जंगलाची न भरून येणारी मोठी हानी झाली व होत आहे. जंगल नष्ट झाले तर काय दुष्परिणाम होतील या बाबत जागरूकता निर्माण करायला हवी. आंबा, चिकू, मोह, जांभुळ, फणस, काजू व इतर नगदी उत्पन्न देण्र्‍या वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्याबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com