Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedचर्चेतले व्हायरल

चर्चेतले व्हायरल

पालखेड बंधारा । बापू चव्हाण | Palkhed Dam

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामधले (nashik district) व इतरत्र चर्चेतले बिबट्यांचे (Leopards) सोशल (social media) व्हायरल व्हिडिओ (Viral video) चर्चेत असून याबाबतच नागरिकांमध्ये तरुणांमध्ये (youth) या व्हिडिओची (video) चर्चा होत असल्याचे पहावयास मिळत आहे.

- Advertisement -

सध्या माध्यमांमध्ये सिन्नर तालुक्यामध्ये (sinnar taluka) दोन बिबट्यांमध्ये नारळाच्या झाडावर दंगामस्ती करण्याचा व्हिडिओ पाहावयास मिळाला. त्यानंतर एक बिबट्या (Leopard) घराच्या गच्चीवरून कुंपणाच्या भिंतीवरून फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.

तर एक बिबट्या चक्क निलगिरीच्या झाडावर चढाई करून उतरताना दिसण्याचा तर बिबट्या बरोबर नागरिकांचा फोटोसेशन करताना एक व्हिडिओ सध्या व्हायरल (viral) झाला असून यामध्ये नागरिक एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे या बिबट्यावर हात फिरवताना दिसत आहे. मात्र बिबट्या शांतपणे उभा असल्याचे चित्र व्हिडिओ मध्ये दिसत आहे.

एका व्हिडिओमध्ये छोटा बछडा नागरिकांना घाबरवत असल्याचा व्हिडिओ (video) तर या आधी पालखेड बंधारा (palkhed dam) येथील धरणालगत चारपट्टेरी वाघ असल्याचा व्हिडिओ समोर आला होता त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र याबाबत वन विभागाकडून (Forest Department) स्पष्टीकरण देण्यात आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कमी झाले असले तरी सध्या दिंडोरी (dindori), निफाड (niphad), सिन्नर (sinnar) या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर असल्याचे बोलले जात असून

या बिबट्याने अनेक ठिकाणी शेतकर्‍यांची पाळीव जनावरे फस्त केली आहेत याशिवाय शाळेचे विद्यार्थी, नागरिक, महिला यांच्यावर देखील हल्ले केले आहे. एका बाजूला या बिबट्यांचे व्हिडिओ मनोरंजन म्हणून पहिले जात असते तरी एका बाजूला नागरिकांच्या जीवाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.त्यामुळे संबंधित विभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करणे ही काळाची गरज बनली आहे. बिबट्यांचे हे व्हायरल व्हिडिओ बघतात हे बिबटेच आता फोटोसाठी सरवले काय अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या