Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedउच्चतंत्राने वाहतूक नियंत्रित

उच्चतंत्राने वाहतूक नियंत्रित

: पौर्णिमा चौघुले-श्रींगी, पोलीस उपायुक्त (वाहतूक), नाशिक आयुक्तालय

महानगरांतील दैनंदिन वाहतुकीचे नियंत्रण करताना पोलीस प्रशासनाला बरेच कष्ट घ्यावे लागतात. त्यावर उपाय म्हणून वाहतूक नियंत्रणासाठी आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. आगामी काही वर्षांत ही यंत्रणा उच्च तंत्रयुक्त (हायटेक) होईल व या यंत्रणेतून वाहतुकीचे नियंत्रण केले जाईल. सध्यापेक्षा ते अधिक अचूक असेल.

- Advertisement -

दिवसेंदिवसशहरे विस्तारत आहेत, त्यासोबतच खासगी वाहनांची संख्याही वाढत आहे. काही अपवाद वगळता रस्ते मात्र आहे तेवढेच राहतात. प्रवासाची विविध साधने अपुरी पडतात. त्यामुळे नागरी वाहतूक अवघड समस्या बनते. महानगरांमधील नित्य वाहतुकीचे नियंत्रण करताना पोलीस प्रशासनाला बरेच कष्ट घ्यावे लागतात.

यावर उपाय म्हणून वाहतूक नियंत्रणासाठी आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. आगामी काही वर्षांत ही यंत्रणा उच्च तंत्रयुक्त (हायटेक) होईल व या यंत्रणेतून वाहतुकीचे नियंत्रण केले जाईल.

शहरांतील रस्त्यांचा बराचसा भाग व खुल्या जागांचा उपयोग वाहनतळ म्हणून होऊ लागला आहे. नागरिकांची त्यामुळे गैरसोय होते व गर्दीचे अडथळे विशेषत्वाने जाणवतात. शहरांतील काही विभाग व रस्ते किंवा रस्त्यांचा काही भाग यांचा वापर करण्याची बंदी मोटारवाल्यांवर घातली जाते. अशा अडचणीतून मार्ग काढण्याचे प्रयत्न शहरांतून करण्यात येतात.

तरीसुद्धा खासगी वाहनांच्या बाबतीत सार्वजनिक वाहतूक संस्थांच्या मानाने अपघातांचे प्रमाण कितीतरी अधिक असते. हे सर्व धोके टाळण्यासाठी सार्वजनिक बस वाहतूकसेवेचा अधिक उपयोग करण्यासाठी उत्तेजन देण्याची गरज आहे. मिनी बस वाहतुकीने खासगी वाहनांची वाहतूक आटोक्यात ठेवण्याचे प्रयत्न चालू आहेत. बहुतेक मोठ्या शहरांमध्ये ङ्गमेट्रोफ वाहतूक व्यवस्था सुरू करण्यावर भर दिला जात आहे. रस्त्यावरील वाहन संख्या कमी होण्यास त्यामुळे मदत होऊ शकेल.

नागरी वाहतुकीचे प्रश्न सोडवण्यासाठी आधुनिक तंत्रविद्येचा वाढत्या प्रमाणावर उपयोग केला जात आहे. व्यवस्थापन तंत्राचा व संगणक यंत्राचा वापर करून वाहतूकसेवा अधिक कार्यक्षम करण्याचे प्रयत्न चालू आहेत. नजीकच्या भविष्यात सौरऊर्जा, पवनऊर्जा आदी ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर केल्यास पर्यावरणाचा समतोल नक्कीच राखता येईल. इलेक्ट्रिक वाहनांचा आवाज कमी असल्याने ती ध्वनिप्रदूषणाने बेजार झालेल्या नागरी जीवनात मोठाच स्वागतार्ह बदल घडवून आणतील.

इलेक्ट्रिक वाहनांच्या आगमनानंतर पेट्रोल-डिझेल वाहने हळूहळू कमी करावी लागतील. इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणारी चार्जिंग व्यवस्था निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. आगामी काळात हायड्रोजन किंवा फ्युएल सेलवर चालणारी वाहने हे दोन खूप आकर्षक पर्याय झपाट्याने विकसित होत आहेत. अंतरे खर्या अर्थाने आणि लाक्षणिक अर्थाने कमी होत आहेत. जे काम प्रत्यक्ष हजर राहूनच करावे लागत होते ते काम आता प्रवास न करता तंत्रज्ञानाने घरबसल्या करता येत आहे.

मालवाहतूक तसेच विविध प्रकारच्या सेवांमध्ये मोठी वाढ होणार आहे. त्याचा उपयोग रस्त्यावरील वाहतूक नियमनाची वेगळी उपाययोजना निर्माण करण्यासाठी होऊ शकेल. आधुनिक यंत्रणेद्वारे आणीबाणीची किंवा धोक्याची, अपघाताची माहिती तत्काळ मिळेल.

त्यावर मात करण्यासाठी तत्काळ मदत पुरवणे, स्वयंचलित गती नियंत्रण, नियम उल्लंघनाबद्दल चालकाला क्षणिक सूचना देणे आदी आणि इतर अनेक गोष्टी तंत्रज्ञानाने सहज साध्य होऊ शकतात. वाहनतळ शुल्क आकारणे, दंड आकारणे, टोल भरणे यांसारख्या वेळखाऊ आणि त्रासदायक घटना स्वयंचलित करता येत आहेत. या व्यवहारांतील भ्रष्टाचाराला आळा घालायला यांत्रिकीकरणाचा फायदा मिळू शकतो, ही आणखी एक जमेची बाजू आहे.

शेअर्ड मोबिलिटी : वैयक्तिक वाहनांची वाढती संख्या पाहता शेअर मोबिलिटीकडे एक चांगला पर्याय म्हणून पाहिले जात आहेत. उत्तम प्रकारची बस वाहतूक निर्माण करणे आणि ती कार्यक्षमतेने चालवणे ही आजची मोठी गरज आहे. पुढच्या दशकात यावर फार मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहेत.

आता महानगरांत ङ्गमेट्रोफ हा मोठा पर्याय सार्वजनिक वाहतुकीसाठी पुढे येत आहे. सुरक्षित वाहने : सुरक्षित रस्तेबांधणी करणे आणि सुरक्षित वाहनांची निर्मिती या दोन महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष केंद्रित झाले आहे. वाहनांमध्ये सुरक्षेसाठी अनेक यंत्रणा सुसज्ज असतात. यात मोठ्या सुधारणा होत आहेत. यात वाहनचालकाच्या चुका न होण्यासाठी वाहनांच्या रचनेत योग्य ते बदल केले जात आहेत.

अतिश्रमामुळे किंवा कंटाळा आल्याने डोळ्यांवर येणारी झापड, वाहनात होणारे क्षणिक बिघाड यांसारख्या घटनांची तत्काळ नोंद घेऊन चालकाला सावध करणे आणि प्रसंगी आणीबाणीची उपाययोजना करणे या कार्यप्रणालीही तयार आहेत. याचीच पुढची पायरी म्हणजे स्वयंचलित वाहने! इंटेलिजंटफ वाहने नक्कीच सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठे पाऊल असेल.

सध्या इ-चालान नाशिक पोलिसांनी सुरू केले आहे. मात्र आगामी काळात सर्व चौकात सीसीटीव्ही कॅमेर्यांद्वारे चोवीस तास देखरेख (मॉनिटिरींग) करून त्याद्वारेच नियम तोडणार्यांचा पुरावा व इ-चालान घरपोच येण्याची व्यवस्था दृष्टिपथात आहे.

मालवाहतुकीसाठी रोबोचा वापर ही मात्र निश्चित स्वरुपात साकारता येण्यासारखी संकल्पना आहे. ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या पसरलेल्या आणि कमी लोकवस्तीच्या देशात डिलिव्हरी ड्रोनचा वापर सुरू आहे. ते आपल्याकडे येऊ शकते. अर्थात, याचा गैरवापर ड्रग वाहतूक, अवैध टेहळणी इत्यादींसाठी होऊ नये म्हणून नवीन कायदे करावे लागतील.

हायपरलूप हा एक वेगळा पर्याय येऊ घातला आहे. मोठ्या ट्यूबसदृश मार्गातून अतिशय वेगाने होणारी वाहतूक असे त्याचे वर्णन करता येईल. प्रायोगिक स्वरुपात या तंत्रज्ञानाची उभारणी आणि चाचणी सुरू झाली आहे. यामुळे भविष्यात सर्वच वाहतूक व नियंत्रण यंत्रणा ङ्गहायटेकफ होणार हे नक्की!

- Advertisment -

ताज्या बातम्या