स्मार्ट सिटीच्या कामाने वाहतूककोंडी

पोलीस प्रशासनाला सोबत घेण्याची गरज
स्मार्ट सिटीच्या कामाने वाहतूककोंडी

नाशिक | निशिकांत पाटील | Nashik

नाशिक शहरात (nashik city) वाहतूक कोंडीची (traffic jam) समस्या दिवसेंदिवस वाढत असतांना गेल्या काही वर्षांपूर्वी स्मार्ट सिटीने (smart city) सीबीएस व मेहेर सिग्नल (CBS and Meher Signal) येथील डावीकडच्या वळणासाठी देखील सिग्नल लावल्याने दिवसेंदिवस वाहतूक कोंडीसह नागरिकांना सिग्नलच्या नियमाचे उल्लंघन केले म्हणून आर्थिक दंड (Financial penalty) सोसावा लागत आहे.

गेल्या काही वर्षांपूर्वी स्मार्ट सिटीने (smart city) अशोकस्तंभ ते त्रंबकनाका सिग्नलपर्यंत रस्ता दुतर्फी काँक्रिटीकरण (concretization) केले. त्यावेळी सीबीएस सिग्नल व मेहेर सिग्नल येथे डावीकडच्या वळणासाठी देखील सिंग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. वास्तविक पाहता नाशिक शहरात (nashik city) सदरहू दोन सिग्नल सोडले की इतरत्र कोठेही डावीकडच्या वळणावर वाहनचालकाला आपले वाहन थांबवावे लागत नाही.

मेहेरकडून सीबीएस सिग्नलकडे जातांना फक्त डावीकडे वळण्यासाठी परवानगी आहे. सदरहू रस्त्यालगत डावीकडच्या वळणावर सिमेंटचे गट्टू लावून फूटपाथ करण्यात येऊन रस्ता लहान करण्यात आला आहे. यामुळे येथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. मेळा बसस्थानकाकडून सीबीएस सिग्नलकडे डाव्या बाजूला जातांना वाहन चालकांना डावीकडच्या वळणासाठी न थांबल्याने वाहतूक पोलिसांकडून (Traffic Police) दंडात्मक कारवाईला (Penal action) सामोरे जावे लागते.

याठिकाणी वाहनचालक व वाहतूक पोलिसांमध्ये बर्‍याच वेळा वादावादी देखील झाली आहे. स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांनी (Officials of Smart City) त्यावेळी येथील काम करतांना किंवा सिग्नलचे नियोजन करतांना पोलीस प्रशासनाला सोबत घेणे गरजेचे होते. जे-ने करून येथील नियोजन व्यवस्थित करता आले असते व शहरात दररोजची होणारी वाहतूक कोंडी काही प्रमाणात का होईना कमी झाली असती. सीबीएस सिग्नलकडून मेहेर सिग्नलला जात असताना 18 सेकंद कुठलाही सिग्नल सुरु नसतो.

सर्व सिग्नलचे लाल दिवे सुरु असतात. स्मार्ट सिटीने हे नियोजन देखील केले नसल्याने या सिग्नलवर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते. नाशकात बर्‍याच ठिकाणी स्मार्ट सिटीचे काम सुरु आहेत. त्या ठिकाणी काम करतांना तरी स्मार्ट सिटीने पोलीस प्रशासन व जाणकारांच्या सल्ल्याने काम करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com