बंदीला पर्यटकांचा ठेंगा

बंदीला पर्यटकांचा ठेंगा

इगतपुरी । वाल्मिक गवांदे | Igatpuri

मागील आठवड्यापासुन इगतपुरी तालुक्यात (igatpuri taluka) जोरदार पावसाला (rain) सुरुवात झाल्याने तालुक्यातील धरणसाठयात कमालीची वाढ झाली. भावली धरण तीन दिवसांपूर्वीच ओव्हरफ्लो (overflow) झाले आहे. या पावसामुळे ठीक - ठीकाणी डोंगर ऊतारावरून पाण्याचे धबधबे सुरू झाल्याने पर्यटकांची (Tourists) इकडे गर्दी वाढत आहे.

तालुक्यात भावली डॅम (Bhavli Dam), अशोका धबधबा, वैतरणा डॅम (Vaitrana Dam), भंडारदरा धरण (Bhandardara Dam), दारणा धरण (Darna Dam), भाम धरण (Bham Dam) आदी ठीकाणी पर्यटनासाठी (Tourism) मोठी गर्दी होत आहे. मात्र शनिवारी वन विभागाच्या (Forest Department) वतीने पर्यटनस्थळी जाण्यास बंदी घातल्याने पोलीसांनी भावली धरणाकडे जाण्यास बंदी घालुन पर्यटन स्थळाकडे जाणार्‍या मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. मात्र पर्यटकांना येथे येण्यासाठी बंदी असुनही चोरी छिप्या मार्गाने पर्यटक शनिवार व रविवारी मोठया प्रमाणात हजेरी लावली. या पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मुंबई (mumbai), नाशिक (nashik), पुणे (pune) अशा महाराष्ट्राच्या (maharashtra) विविध भागातुन शनिवार, रविवारी व सुट्टीच्या काळात लाखो पर्यटक भेट देवुन आनंद घेण्यासाठी येत आहेत.

पावसाळी पर्यटनाचा आनंद काही औरच! आणि त्यातही धबधब्याखाली चिंब भिजायला कुणाला आवडणार नाही ? कसारा घाट (Kasara Ghat) परिसर हा पावसाळयात नेहमीच पर्यटकांसाठी सुखावह पर्यटनाचा (Tourism) आनंद देणारा परिसर आहे. गेले काही दिवस मनसोक्त बरसणार्‍या पावसाने घाट परिसरात सर्वत्र हिरवेगार गालिचे आणि बहारदार हवा अनुभवायला मिळत आहे. पावसाळी पर्यटनस्थळाच्या शोधात असलेल्या निसर्गप्रेमींसाठी अशोका धबधबा हा उत्तम पर्याय असून मुंबई, ठाणे, कल्याण, वाशी, नवी मुंबई इथल्या पर्यटकांसोबतच नाशिक शहर आणि परिसर त्याचबरोबर स्थानिक इगतपुरी शहर आणि कसारा परिसरातील पर्यटकही या धबधब्यात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतांना दिसत आहेत.

अप्पर वैतरणा धरण - 26 कि. मी. आहे. या ठीकाणी विजनिर्मितीचा मोठा प्रकल्प आहे. येथील धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्या आनंद लुटण्यासाठी नाशिक, मुंबई, पुणे येथुन मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत असतात. भंडारदरा - 35 कि. मी., दारणा धरण 30 की. मी., खोडाळा - 30 कि. मी., सुंदरनारायण गणेश मंदीर देवबांध - 35 कि. मी., याशिवाय कुलंग, अलंग, मलंग, कळसुबाई, रतनगड या उत्तुंग डोंगररांगा तसेच सांधन दरी, रंधा धबधबा या ठिकाणपासून जवळच आहे.

कसारा घाटा जवळ भातसा रिव्ह्रर व्हैली, उंट दरी, पाच धबधबे, असे सुंदर ठिकाणे आहेत. कसारा घाटातील धुके अनुभवणे तर एक रोमांचकारी अनुभव असतो. मात्र पर्यटन स्थळावर बंदी घातल्याने आलेल्या पर्यटकांनी इगतपुरी शहरातील रेल्वे तलाव व नगरपरिषद तलावाकडे आपला मोर्चा वळवल्याचे पाहावयास मिळत आहे. पर्यटन बंदीमुळे अनेक पर्यटकांचा हिरमोड होताना पाहावयास मिळत आहे. सुरक्षेच्या कारणावरून वनविभागाने पर्यटकांना पर्यटनस्थळी जाण्यास बंदी घातली आहे.

या पार्श्वभुमीवर जिल्हा पोलीस विभागाकडुन मोठा पोलीस बंदोबस्त पाठवण्यात आला आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील पिंप्रीसदो चौफुलीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असुन छुप्या पध्दतीने भावली धरणाकडे जाणार्‍या पर्यटकांवर कारवाई करण्यात येत आहे,अशी माहिती पोलिस निरीक्षक वसंत पथवे यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com