टचलेस हॉस्पिटॅलिटीचे नवे पर्व सुरु होईल

देशदूत वर्धापनदिन विशेष लेख
टचलेस हॉस्पिटॅलिटीचे नवे पर्व सुरु होईल

कोविडनंतर संपूर्ण हॉस्पिटॅलिटी उद्योगात मोठे फेरबदल होतील. प्रवाशांच्या आणि अतिथींच्या आरोग्यावर, स्वच्छतेवर आणि आरोग्यावर बरेच लक्ष केंद्रित केले जाईल. तसेच ‘टचलेस हॉस्पिटॅलिटी’चे नवे पर्व सुरू होईल...

नारायण शेलारे | नाशिक

हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीने गेल्या दहा वर्षांत नाशिकचा चेहरामोहरा बदलला आहे. या उद्योगाने नाशिक शहर विकसित होण्यासाठी मदत केली आहे. येत्या 25 वर्षांत हे क्षेत्र नाशिकच्या विकासाची शक्ती ठरणार आहे. प्रदूषणमुक्त, निसर्गरम्य, धरणे या सर्व बाबी एकत्रितपणे पर्यावरण पर्यटनाला चालना देतात.

शहरात अधिक सेंद्रीय रिसॉर्टस्, आरोग्य आणि निरोगीपणासाठी रिसॉर्टस्, वाईन यार्डस् आणि संबंधित हॉस्पिटॅलिटी असे अनेक पर्याय येत आहेत. मी हेही सांगेन की, आगामी काळात नाशिक हे मीटिंग्ज, प्रेझेन्टिव्हज, कॉन्फरन्सेन्स अ‍ॅण्ड एक्झिबिशन्स (एमआयसीएस)चे सर्वाचे मोठे केंद्र बनणार आहे. विशेषत: कोविडनंतर सर्व कंपन्या आपल्या सेवकांना घरून काम करण्यास सांगत असताना त्यांच्या ऑफलाईन कामाची आणि बैठकीची संकल्पना वाढत चालली आहे.

अशा कंपन्यांतील सेवकांना काम आणि विश्रांती या दोन्ही गोष्टींसाठी नाशिकसारखे एखादे ठिकाण निवडले जाईल, कारण आपल्या शहरात ते शक्य आहे. सर्वच शहरांना चांगला कनेक्ट असलेले, तंत्रज्ञानाने सुधारित व सोबतच निसर्गरम्य वातावरण असे वैशिष्ट्य नाशिकचे असल्याने ऑफर देणे शक्य होणार आहे.

हॉस्पिटॅलिटी या उद्योगावर पहिल्यांदाच असे मोठे संकट आले आहे. गेल्या अनेक दशकांत प्रथमच अशी घटना घडली. कोविडनंतर संपूर्ण हॉस्पिटॅलिटी उद्योगात मोठे फेरबदल होतील. प्रवाशांच्या आणि अतिथींच्या आरोग्यावर, स्वच्छतेवर आणि आरोग्यावर बरेच लक्ष केंद्रित केले जाईल. तसेच ‘टचलेस हॉस्पिटॅलिटी’चे नवे पर्व सुरू होईल.

व्हॅल्यू सर्व्हड सर्व्हिसेस, रोबोट सर्व्हर आणि पूर्वनिर्धारित चेक-इन असू शकतात. न्यूयॉर्कमधील हॉटेलमध्ये सद्यकाळात बाथरूमचा आरसा दूरस्थ क्लिकवर दूरध्वनीमध्ये रूपांतरित करण्याचा पर्याय आहे तर दुसर्‍या ठिकाणी सेवा देण्यासाठी रोबोट बटलर आहे. यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाने आज हॉटेलमधील सेवांमध्ये बदल घडवून आणला आहे.

ज्या कंपन्या नवनव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणार नाहीत अशा कंपन्या नामशेष होतील. नवनवे तंत्रज्ञान व बुद्धिमत्ता अतिथींना सेवांमध्ये चांगला अनुभव देतील. ‘चॅटबॉटस्’ आधीपासूनच बुकिंग आणि समस्या सोडवण्याचा अनुभव सुलभ करत आहेत.

येणार्‍या काळात प्रत्येक अतिथीसाठी सेवा, प्रवासाची पद्धत जसजशी वेगवान होईल तसतसे व्यवसायासाठी हॉटेलमध्ये परत जाण्याची आवश्यकता कमी होईल आणि त्याचबरोबर विश्रांतीची मुदत अनेक पटीने वाढेल. तर व्यवसायातील सहली, एकत्रित विश्रांती सहलींसह येऊ शकतील आणि अशा गरजा भविष्यात पूर्ण केल्या गेल्या पाहिजेत. एकंदरीत आतिथ्य उद्योग भविष्यात उत्साहाने भरला जाईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com