Friday, April 26, 2024
HomeUncategorized‘पुनरावृत्ती’ टाळायची तर..

‘पुनरावृत्ती’ टाळायची तर..

– डॉ. जयदेवी पवार

कोरोनाचा नवा ‘स्ट्रेन’ लंडन तसेच ब्रिटनच्या दक्षिण भागात पाहायला मिळाला आहे. अमेरिकेत मृत्यू वाढत आहेत आणि संसर्गग्रस्तांची संख्या 20 कोटींच्या आसपास पोहोचली आहे.

- Advertisement -

ब्रिटन, अमेरिकेसह अनेक देशांत लसीकरण सुरू झाले आहे तरी रुग्णसंख्या वाढत आहे. रशियात रुग्णसंख्या रोज विक्रमी दराने वाढत आहे. लसीकरण हा कोरोनापासून बचावाचा एकमेव उपाय नाही, कारण लसीचे दोन डोस घ्यावे लागणार आहेत. यादरम्यान काळजी घेतली नाही, तर एकीकडे लसीकरण होत राहील तर दुसरीकडे संसर्गही वाढत राहील.

मावळते वर्ष कसे गेले, त्या वर्षभरात आपण काय-काय भोगले, हे आपल्याला आजन्म लक्षात राहणार आहे. आपण बरेच काही सहन केले आहे; परंतु त्याहूनही अधिक आपण बरेच धडे घेतले आहेत. आज देशात कोरोनासंबंधीची आकडेवारी दिलासादायक आहे. सोमवारी केवळ 16 हजार 72 रुग्ण समोर आले. 23 जूननंतरची ही सर्वांत कमी रुग्णसंख्या ठरली. रुग्ण बरे होण्याचा दरही (रिकव्हरी रेट) 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. राजधानी दिल्लीतील आकडेवारी सुधारत आहे. दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने रुग्णांवरील देखरेखीसाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा कालावधी 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढविला आहे.

केंद्र आणि राज्य सरकारांनी ताळमेळ राखत कोविड-19 वर विजय प्राप्त करण्यासाठी चांगले काम केले यात शंकाच नाही; परंतु ब्रिटनमधून आलेल्या सहा प्रवाशांना नव्या ङ्गस्ट्रेनफच्या विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून, हा धोक्याचा संकेत आहे. याचाच अर्थ असा की, कोरोनाचा नवा ङ्गअवतारफ भारतात पोहोचला आहे. हा विषाणू 70 टक्के अधिक वेगाने पसरत असल्याने भारताची चिंता वाढली आहे. गेल्या महिनाभरात सुमारे 33 हजार लोक ब्रिटनच्या विमानांमधून भारतात आले आहेत. त्यातील 114 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांना क्वारंटाइन करण्यात आले; मात्र या रुग्णांच्या संपर्कात विमानातील अन्य प्रवासी आले असणारच. त्यामुळेच राज्यांना आता लवकरात लवकर ङ्गकॉन्टॅक्ट ट्रेसिंगफचे काम सुरू करायला हवे. नव्या ङ्गस्ट्रेनफचा मुकाबला करणे हे खरोखर मोठे आव्हान असणार आहे.

कोरोनाचा हा रहस्यमय नवा ङ्गस्ट्रेनफ लंडन तसेच ब्रिटनच्या दक्षिण भागात पाहायला मिळाला आहे. अमेरिकेत तर अतिशय वाईट परिस्थिती आहे. तेथे 43 हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत आणि संसर्गग्रस्त रुग्णांची संख्या 20 कोटींच्या आसपास पोहोचली आहे. कोरोनाची लस नवीन आशा घेऊन आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी लसीकरणाची व्यापक योजना तयार केली आहे. पंजाब, गुजरातसह चार राज्यांत लशीची ङ्गड्राय ट्रायलफसुद्धा घेण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत लस साठवून ठेवण्यासाठी कोल्ड चेन तयार केली आहे.

नव्या वर्षाची सुरुवात नव्या आशेने होईल, असे यावरून लोकांना वाटत होते. परंतु त्याचबरोबर आपण हे लक्षात घेतले पाहिजे, की थोडासा बेजबाबदारपणा झाला तरी तो आपल्याला गंभीर संकटात लोटून देईल. आपण मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळलेच पाहिजेत. सॅनिटाइजरचा वापर आणि हात धूत राहणे महत्त्वाचे आहे. ब्रिटनसारखा नवा विषाणू आपल्याकडे पसरू लागला तर पुन्हा पहिल्यासारखी स्थिती होऊन बसेल. नव्या ङ्गस्ट्रेनफपासून मुलांना दूर ठेवायला हवे. कोरोनाग्रस्त रुग्णसुद्धा अनेकदा बेजबाबदारपणाचे दर्शन घडवीत असतात. परदेशातून आलेले दोन पॉझिटिव्ह रुग्ण एकांतवास केंद्रातून (क्वारंटाइन सेंटर) पळून गेले होते. मोठ्या मुश्किलीने त्यांना परत आणण्यात यश आले. एक रुग्ण तर पंजाबातील लुधियानाजवळ आढळला. कुटुंबापासून दूर राहणे कुणालाच आवडत नाही आणि कोरोनाग्रस्ताला एकांतात दिवस काढावे लागतात, हे खरे आहे. परंतु त्याला नाइलाज असून, तसे केले नाही तर आपल्याबरोबरच इतरांचा जीवही आपण धोक्यात घालू शकतो, हे संसर्गग्रस्तांनी लक्षात ठेवले पाहिजे.

कोरोना महामारीमुळे आरोग्यावरील खर्च बराच वाढला आहे. संकटकाळात सर्व तातडीच्या व्यवस्था उभ्या कराव्या लागल्या आहेत. त्या सर्व व्यवस्था कोरोनाचे रुग्ण वाढल्यास तोकड्या पडतात, हे आपण पाहिले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा नवा ङ्गस्ट्रेनफ फैलावल्यास व्यवस्थांवर किती ताण येईल, हे आपण आताच ओळखलेले बरे! गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना पूर्वीपासूनच जारी आहेत; परंतु नव्या वर्षात गृह मंत्रालयाने राज्यांना समारंभांवर नजर ठेवण्यास सांगितले आहे. सणासुदीच्या काळात लॉकडाउन शिथिल केल्याबरोबर सर्वत्र गर्दी वाढून रुग्णसंख्याही झपाट्याने वाढली होती, याचा अनुभव आपण घेतला आहे.

दिल्लीत टेस्टिंग आणि ट्रेसिंग वाढविण्यात आले तसेच कंटेन्मेन्ट झोनमध्ये सावधगिरीचे उपाय राबविण्यात आले, तेव्हा परिस्थिती सुधारली. या पार्श्वभूमीवर, कोरोनाच्या वेगाने पसरणार्‍या नव्या ङ्गस्ट्रेनफच्या बाबतीत किती काळजी घेतली पाहिजे, हे आपण ओळखायला हवे. नववर्षाचे स्वागत ठिकठिकाणी कर्फ्यूने झाले हे योग्य नसले तरी आवश्यक होते. नववर्षाचे संदेश एकमेकांना सोशल मीडियावरून पाठवूनच हा दिवस आपल्याला साजरा करावा लागला.

आपल्याकडे आरोग्य सुविधांची स्थिती फारशी चांगली नाही. ती सुधारणे हाच आपला धोरणात्मक प्राधान्यक्रम असायला हवा. खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनावरील उपचारांची व्यवस्था कमी दरात उपलब्ध असती, तर अनेक जीव वाचले असते, असे संसदीय समितीने काही दिवसांपूर्वी म्हटले होते. दुसरीकडे सार्वजनिक आरोग्यावरील सरकारी खर्च जीडीपीच्या अवघा दीड टक्केच आहे. त्यामुळे नव्या ङ्गस्ट्रेनफमुळे निर्माण होऊ शकणारी नवी आव्हाने पेलण्यास आपण किती सक्षम आहोत, याचा आढावा घेऊन तयारी करणे अत्यंत गरजेचे आहे.

सर्वांत चिंतेची बाब अशी की, कोरोना विषाणूबाबत अनेक देशांना गांभीर्यच नाही. ज्या देशांची सरकारे गंभीर आहेत, तेथील सर्वसामान्य नागरिक गंभीर नाहीत. युरोपीय देशांबरोबरच अमेरिकेतसुद्धा लोकांनी या विषाणूबद्दल गांभीर्य दाखविले नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे वर्ष उलटून गेले तरी या देशांमध्ये मृत्युतांडव सुरूच आहे. जगातील अनेक देशांच्या सरकारांनी लॉकडाउन आणि अन्य निर्बंध लोकांवर लादले. मात्र, सामान्य जनतेने त्याविरोधात आंदोलने केली. युरोपात जेव्हा लोकांना थोडी मोकळीक मिळाली, तेव्हा ते लगेच सुट्या व्यतीत करण्यासाठी घराबाहेर पडले.

समुद्रकिनारे गर्दीने ओसंडून वाहू लागले. विषाणू अजून नष्ट झालेला नाही आणि कोरोनाची दुसरी, तिसरी लाटही येऊ शकते असे विविध देशांची सरकारे सांगू लागली; परंतु लोक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. जग आता पूर्ववत झाले आहे, असे समजून लॉकडाउननंतर युरोपातील लोकांनी खुला व्यवहार सुरू केला. युरोपात हे संकट सरकारे गंभीर असूनसुद्धा कायम राहिले, कारण लोक गंभीर नव्हते. याउलट लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेतील देशांची सरकारेच गंभीर नव्हती. अशी परिस्थिती असतानाच आता नवा ङ्गस्ट्रेनफ आला आहे.

हा नवा विषाणू जसा अधिक वेगाने फैलावतो तसाच तो लहान मुलांना संसर्गग्रस्त करण्यास सक्षम आहे. लहान मुले आतापर्यंत कोरोनाच्या विषाणूपासून दूर राहू शकली होती. परंतु तरीसुद्धा रूप बदलून आलेला हा नवा कोरोना विषाणू नेमका कोणत्या देशातून पसरण्यास सुरुवात झाली या विषयावर चर्चा रंगली आणि तोपर्यंत डझनभर देशांत तो पोहोचला. सर्वाधिक रुग्ण ब्रिटनमध्ये आढळले आहेत; मात्र हा विषाणू सर्वांत आधी दक्षिण आफ्रिकेत आढळला, असे ब्रिटनचे म्हणणे आहे. दक्षिण आफ्रिकेतील नायजेरियातसुद्धा हा नवा ङ्गस्ट्रेनफ आढळला आहे. मात्र, नायजेरियाच्या म्हणण्यानुसार, ब्रिटनमध्ये आढळलेला विषाणू अधिक धोकादायक असून, नायजेरियातील विषाणू हे 501 म्युटेशन आहे. अशा प्रकारे एकमेकांकडे बोटे दाखविण्यात वेळ निघून गेल्यास मोठे नुकसान होऊ शकते. नायजेरिया हा आफ्रिकेतील सर्वांत मोठा देश असून, त्याची लोकसंख्या 20 कोटींपेेक्षा अधिक आहे. तिथे आजार बळावल्यास हाहाकार माजू शकतो.

कोरोना विषाणूच्या पाउलखुणा पाहिल्या असता आपल्या असे लक्षात येते की, श्रीमंत देशांमध्ये तो सर्वांत आधी पसरला. या देशांमध्ये वयोवृद्ध लोकांची संख्या अधिक आहे. त्यानंतर तो विकसनशील देशांत पसरला आणि सर्वांत शेवटी गरीब देशांमध्ये पोहोचला. परंतु जरी आफ्रिकेत नवीन विषाणू आढळला असला किंवा लॅटिन अमेरिकेत आधी आढळला असला, तरी तो त्या-त्या देशांसाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी धोका आहे, हे सर्वच देशांनी ध्यानात घेतले पाहिजे आणि नव्या, धोकादायक विषाणूला लवकरात लवकर अटकाव करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ब्रिटनमध्ये आढळलेल्या स्ट्रेनच्या विषाणूने बाधित झालेले रुग्ण जपानमध्येही दिसून आले आहेत. स्पेन आणि फ्रान्समध्येही नव्या विषाणूने ग्रस्त लोक आढळले आहेत. अगदी भारतातसुद्धा हा विषाणू आलेला असून, त्याचा फैलावण्याचा वेग पाहिला असता, एकमेकांकडे बोट दाखविण्याऐवजी संपूर्ण जगाने एकजूट होऊन त्याच्या नायनाटाची योजना आखायला हवी.

- Advertisment -

ताज्या बातम्या