Friday, April 26, 2024
HomeUncategorizedत्र्यंबकेश्वर पिंडीवर वजलेपन होणार

त्र्यंबकेश्वर पिंडीवर वजलेपन होणार

त्र्यंबकेश्वर । मोहन देवरे | Trimbakeshwar

कोट्यवधी शिवभक्तांचे श्रद्धास्थान, बारा ज्योर्तिलिंगांपैकी (Twelve Jyotirlingas) एक असलेले देशातील एक शिवमंदिर (Shiva temple) त्र्यंबकेश्वर मंदिरातील (Trimbakeshwar temple) महादेवाच्या पिंडीची झीज होत आहे.

- Advertisement -

या पिंडीवर लवकरच वज्रलेप (Vajralep) करण्यात येईल असे संकेत येथे मिळत आहे. परंतु याबाबतचा अंतिम निर्णय पुरातत्व खात्याच्या अधिकार्‍यांच्या पाहणी व निरीक्षणानंतर फलद्र्ूप होईल.

त्रंबकेश्वर मंदिर महादेवाच्या पिंडीत शाळुंका नसून गोलाकार खड्डा आहे. यात कळशीभर पाणी मावेल असा खड्डा असून त्यात अंगठ्याच्या आकाराची ब्रम्हा, विष्णू, महेश (Brahma, Vishnu, Mahesh) अशी तीन लिंगे उंचवटे आहेत. महेशच्या लिंगातून गोदावरीचे पाणी (godavari water) तीर्थ पाझरत असते. अनादी कालापासून हे स्थान स्वयंभू ज्योतिर्लिंग (Jyotirlinga) आहे.

या उंच वाट्यावर असणारा कांगोरा म्हणजे पाळ होय. या पाळचा टवका निखळू लागला आहे. गुरुवारी हा प्रकार लक्षात आल्यानंतर देवस्थान ट्रस्ट, केंद्रीय पुरातत्व विभाग (Central Department of Archaeology), पोलीस विभाग (Police Department) यांच्याकडे नोंदी घेण्यात आल्या.आतील शिवलिंगे सुरक्षित आहे. आता या ठिकाणी झीज झालेल्या ठिकाणी वज्रलेपन होण्याची शक्यता आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिर हे केंद्रीय पुरातत्व विभागाच्या (Central Department of Archaeology) अखत्यारित असून या विभागाचे अधिकारी उद्या (दि.19) पाहणी करतील. यापूर्वी 2006 मध्ये लेपन करण्यात आले होते. वेळोवेळी काही नियम पिंडीची झीज होऊ नये म्हणून घालून देण्यात आले होते.

काही नियम पाळले गेले तर काही नियम पाळले गेले नाही. पिंड सुरक्षित राहावी म्हणून गुरु शरणानंद महाराज यांनी चांदीचे कवच दिलेले होते. पूजे प्रसंगी लावले गेलेले नाही.पिंडीची पूजा होते कवचाची नाही, असे सांगून हे कवच लावण्यात आले नाही, त्यामुळे पिंडीच्या पाळ्या क्षतीग्रस्त होत असल्याची चर्चा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या