Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedगांधी जयंती विशेष लेख : नेतृत्वाची उत्प्रेरणा : थिएटर ऑफ रेलेवन्स

गांधी जयंती विशेष लेख : नेतृत्वाची उत्प्रेरणा : थिएटर ऑफ रेलेवन्स

नाशिक | धनंजय कुमार

नेते आकाशातून टपकत नाहीत. ना कुठल्या फॅक्टरीत जन्माला येतात. नेते जमिनीतून अंकुरतात. संस्कार, संवेदना, निषिद्ध आणि मर्यादांमध्ये त्यांचे संगोपन होते. शोषण-अन्याय पाहून ते उद्वेलित होतात. स्वत:ला ते मानवीय-सामाजिक प्रयोगशाळेत तापवतात आणि मग इतरांसाठी यथासंभव सुगम मार्ग शोधतात…

- Advertisement -

कमकुवत व्यक्तींचे दुःख तुम्हाला जोपर्यंत दुःखी करीत नाहीत, तुम्हाला अस्वस्थ करीत नाही तोपर्यंत आपण नेता नाही. गांधीजींची नेता होण्याची यात्रा बघितली तर खूप काही स्पष्ट होते. गांधीजी लहानपणी सामान्य मुलांप्रमाणेच होते. जेथे अस्वस्थ, असहज वाटे; तेथून बचाव करण्यासाठी ते मार्ग शोधायचे. त्याच क्रमाने मुंबई कोर्टात महिनो-महिने येऊन जाऊनही ते केस लढण्यासाठी धैर्य मिळवू शकले नाहीत.

संभव आहे खरे बोलण्याचा संकल्प त्यांच्या मार्गात आडवा येत असावा. कारण वकिली करणे फक्त सत्य साक्ष एवढेच नाही. दक्षिण आफ्रिकेला जाण्याची गोष्ट आली तेव्हा वकिली करण्याच्या असहजतेमुळे गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत जाण्याचे स्वीकारले. निघताना आपल्या आईकडून मिळालेली शिकवण गाठोड्यात बांधून घेऊन गेले. त्याचे पालन होईल याचा पूर्ण प्रयत्न केला.

स्वत: बदलण्याऐवजी गांधीजींनी पारंपरिक मार्ग शोधला. आपल्या गुजराती समाजाशी जोडले गेले. परंतु येथे नियमाविरूद्ध घडत आहे, अन्यायकारक घडत आहे, असे पाहिले तेव्हा तिथे त्यांनी प्रतिकार केला. माणसा-माणसात भेद आहे हे त्यांनी पाहिले.

भारतीयांसोबत ब्रिटिश अत्यंत अमानुषपणे वागतात, अमानवी व्यवहार करतात हे त्यांनी पाहिले तेव्हा त्यांना वाईट वाटले. त्यांचे हृदय पिळवटून निघाले आणि प्रतिकारासह सेवेचा मार्ग त्यांनी स्वीकारला.

सेवा आणि प्रतिकारासोबत ते सत्य, निष्ठा आणि अहिंसा या तत्त्वांवर ठाम होते. ब्रिटिशांनी त्यांचा अपमान केला. त्यांना मारहाण केली, परंतु गांधीजींनी सत्य, अहिंसा, प्रतिकार आणि सेवा यांचा मार्ग सोडला नाही. या निष्ठेने गांधीना गांधीजी बनवले.

गांधीजींना मजबूत करण्याचे काम नरसी मेहता यांच्या भजनाने केले… ‘वैष्णव जन तो तैंने कहिये जो पीर पराई जाणे रे…’. बालपणात पाहिलेल्या ‘सत्य हरिश्चंद्र’ या नाटकाने त्यांना बळकटी देण्याची भूमिका निभावली. गांधीजींच्या बॅरिस्टर पदवीच्या अभ्यासाने त्यांना बळकट करण्याचे काम केले. त्यांच्या संवेदनशीलतेने मजबूत केले. गांधीजींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्याने त्यांना पुढे नेले ते म्हणजे ध्येयापर्यंत पोहोचण्याची त्यांची जिद्द! असे करताना ते अधीर होत नसत.

उलट सतत मानवप्रवृत्तीने वागत होते. परिणामी अन्याय करणारे स्वतः बेचैन होत. अन्याय करणार्‍यांवर रागवण्याऐवजी ते त्यांना आरसा दाखवत. अन्याय करणार्‍यांना, जुलूम करणार्‍यांना ते हेलावून टाकत आणि शेवटी गांधीजी सफल होत होते. गांधीजींची हत्या झाली नसती तर निःशंक भारत पाकिस्तान पुन्हा एकत्र झाले असते. ब्रिटिशांची फाळणीची नीती यशस्वी झाली नसती. जगासमोर गांधीजी एक अभूतपूर्व उदाहरण सादर करण्यात यशस्वी झाले असते.

गांधी नेता यासाठी होते की, स्वतःचे गुण-अवगुण ते जाणत होत. केवळ जाणत होते असे नव्हे तर त्या अवगुणांवर विजय मिळवण्यासाठी ते सतत प्रयोग करीत. माणसात अनेक त्रुटी असतात हेही ते जाणत होते. त्या त्रुटींना जिंकून जगासमोर एक उदाहरण ते ठेवू इच्छित होते की, मनुष्य स्वतःच्या कमजोरीवर विजय मिळवू शकतो. हिंसा, द्वेष आणि चढाओढ या सगळ्यांपासून वाचता येते व जगाला सुंदर बनवता येते.

परंतु गांधीजींच्या हत्येने त्यांचे हे कार्य पूर्ण होऊ दिले नाही. गांधीजी मनुष्याला मनुष्य बनवण्याची कला जाणत होते. मनुष्याला मनुष्य बनवण्याची कला येते कुठून? रंगचिंतक मंजुल भारद्वाज म्हणतात की, मनुष्याला मनुष्य बनवण्याची कला कलेत अंतर्निहित आहे.

आपण गांधीजींचे उदाहरण घ्या! गांधीजींच्या बालमनावर ‘सत्य हरिश्चंद्र’ नाटकाचा गहिरा प्रभाव पडला. नेहमी खरे (सत्य) बोलण्याचा त्यांनी वसा घेतला. एक सत्य बोलण्याच्या सवयीने त्यांना आयुष्याला समजण्याची गुरुकिल्ली दिली.

प्रत्येक व्यक्तीमध्ये नेता होण्याचे गुण असतात, परंतु ते संगोपन करून वाढवण्याची आवश्यकता आहे, असा मंजुल भारद्वाज यांचा विश्वास आहे. स्पष्ट दृष्टी, स्पष्ट उद्दिष्टे आणि ध्येय गाठण्याची सात्विक जिद्द व्यक्तीला नेता बनवते. गांधींची जिद्द केवळ ध्येय गाठण्यासाठीचा आग्रह नव्हता. त्यांना ते ध्येय सात्विक मार्गाने साध्य करायचे होते. ही सात्विक जिद्द गांधीजींना नेता बनवते.

अन्यथा राजाही ध्येय गाठतो. अगदी वाईट व्यक्तीदेखील ध्येय साध्य करते. दुसरे म्हणजे गांधींचे ध्येय साध्य करणे हा चमत्कार नव्हे तर तो एक वैज्ञानिक प्रयोग आहे. गांधीजींनी संगितलेल्या मार्गावर चला. ध्येय कितीही दुर्मिळ असले तरीही ते साध्य होईल.

मंजुल म्हणतात, सांस्कृतिक चेतनेशिवाय ते जागृत होऊ शकत नाही. गांधीजी आपल्या सांस्कृतिक चेतनेचे नायक आहेत. मी त्यांना पहिला गुरू मानतो. जगात अनेक क्रांती झाल्या, पण कोणतीही क्रांती माणसाला माणूस बनवू शकली नाही. सर्व क्रांती सत्तेवर येऊन संपल्या आणि सत्ता पुन्हा त्याच व्यवस्थेत बदलली, ज्या व्यवस्थेविरूद्ध क्रांती घडली होती. साम्यवादी क्रांतीची तीच दशा का झाली? आज पाहा, दोन्ही मोठे साम्यवादी देश अमेरिकेपेक्षा मोठे साम्राज्यवादी बनले आहेत. मग प्रश्न असा उद्भवतो की, क्रांती कुठे व का भरकटते? क्रांती यासाठी मार्ग भरकटते.

कारण त्यात सत्य आणि निष्ठा नसते. क्रांतीत इतरांना व्यवहाराने जिंकून घेणे किंवा आपलेसे करण्याची क्षमता नाही. दुर्बल व्यक्तीची वेदना जाणणारे हृदय नसते. सत्ता बंदुकीच्या गोळीतून निघू शकते. परंतु मनुष्य कलेतून निर्माण होतो. सांस्कृतिक चेतनाच मनुष्याला मनुष्य बनवू शकते. आम्ही ज्या नाट्य सिद्धांताचे सूत्रपात केले ते ‘थिएटर ऑफ रिलेव्हन्स’ नाट्य सिद्धांत सांस्कृतिक चेतनेचे द्वार उघडते.

माझ्यासाठी थिएटर हे केवळ करमणुकीसाठी केलेले कलेचे प्रदर्शन नाही तर कलेच्या माध्यमातून थियेटर मनुष्यात सांस्कृतिक दीप प्रज्वलित करण्याचे माध्यम आहे. म्हणूनच याला ‘थिएटर ऑफ रिलेव्हन्स’ म्हटले. कलाकाराला ते केवळ विषयाशी जोडत नाही तर त्याच्या आत परिवर्तनाची गंगा प्रवाहित करते.

माणसाचे जीवन बदलत नाही तोपर्यंत कला अपूर्ण आहे आणि मानवी जीवन बदलण्यात राजकारणाची महत्वाची भूमिका आहे, असे मंजुल म्हणतात. म्हणून कला आणि राजकारणाचा गहन-थेट संबंध आहे, असा विश्वास आहे. गांधी राजकारणी नव्हते. ते संवेदनशील व्यक्ती होते. इतरांचे दु: ख त्यांना त्रस्त करायचे.

त्या वेदनेपासून मुक्तीमार्ग काढण्यासाठी मार्गस्थ व्हायचे. जेव्हा ते मुक्तीच्या मार्गावर मार्गस्थ झाले तेव्हा त्यांचा सत्ता आणि शोषण करणार्‍या शक्तींशी सामना व्हायचा. गांधीजींनी रंगमंचावर अभिनय केला नसला तरी ते जीवनरुपी रंगमंचावरील खूप मोठे अभिनेते होते. त्यांना पाहून इंग्रजांचेही अंत:करण पाघळायचे.

म्हणूनच जगाला गांधीजींसारख्या एक नव्हे तर अनेक नेत्यांची गरज आहे. संपूर्ण मानवजातीला मानवतेच्या दिशेने नेणारा नेता! आणि हे केवळ सांस्कृतिक क्रांतीतूनच शक्य आहे. ही मशाल हाती घेऊन ‘थिएटर ऑफ रिलेव्हन्स’ चालत आहे. आमचे साथीदार चालत आहेत. गांधींचे स्वप्न बंद डोळ्यांनी पाहिलेले निद्रेतील स्वप्न नव्हते तर उघड्या डोळ्यांनी पाहिलेले स्वप्न होते. ते साकार होणार हे निश्चित! गांधीजींचा मार्ग हाच दुनियेचा योग्य मार्ग आहे.

(प्रस्तुत लेखक सृजनशील लेखक, प्रयोगशील चित्रपट व मालिका निर्मितीचे अधिवक्ते आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या