Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedविमानतळाचा मार्ग खडतर

विमानतळाचा मार्ग खडतर

जानोरी । संदीप गुंजाळ | Janori-Dindori

दिंडोरी (dindori) लोकसभा व विधानसभा (Lok Sabha and Vidhan Sabha) आज भूषण ठरले आहे. कारण दिंडोरी लोकसभेच्या खासदार डॉ. भारती पवार (mp dr. bharti pawar) यांना केंद्रीय आरोग्यमंत्री (Union Health Minister) व दिंडोरी विधानसभेचे आमदार नरहरी झिरवाळ (MLA Narhari Jirwal) यांना विधानसभा उपाध्यक्ष (Deputy Speaker of the Assembly) म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

- Advertisement -

त्याच दिंडोरी तालुक्यात (dindori taluka) नाशिक (nashik) विमानतळ (Airport) आहे ते देखील दिंडोरी तालुक्यासाठी भूषणावहच समजावे लागेल. परंतु, त्या विमानतळाला जोडणारे रस्ते मात्र आज दुरूस्तीच्या प्रतिक्षेत आहे हे मात्र दुर्दैवाने दुर्भाग्य समजावे लागते. याकडे केंद्रीय मंत्री व विधानसभा उपाध्यक्ष लक्ष केंद्रित करतील का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. रस्ता संबंधित विभागाने तात्काळ विशेष निधी वापरून मजबूत रस्ता बनवावा व याकडे केंद्रीय आरोग्यमंत्री व विधानसभा उपाध्यक्षांनी लक्ष केंद्रित करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नाशिक विमानतळ म्हटलं तर अवघ्या तालुक्याला त्याचा अभिमानान वाटतो.परंतु विमानतळ ते अक्राळे हा रस्ता पुर्ण खराब झाला असून विमानतळावर जाण्याचा रस्ता हा मृत्युचा सापळा बनला आहे. त्याचबरोबर विमानतळ-आंबेदिंडोरी- म्हसरूळ रस्त्यावरील खड्डे (potholes) आज जीवघेणे ठरत असतांना प्रशासन याकडे पुर्ण दुर्लक्ष करते हे नवलच.

पावसाळा (reany season) आला की खड्ड्यांचे साम्राज्य आणि नंतर रस्त्याला ठिगळे मारून तात्पुरती मलमपट्टी हे दरवर्षीचे दृश्य. परंतु ठिगळं मारत किती दिवस जीवांशी खेळणार? पावसाळा संपताच तत्काळ रस्ता दुरुस्त करण्यात येईल म्हणून संबंधित विभागाने फक्त आश्वासनेच दिले.

परंतु अद्याप रस्ता दुरुस्तीला ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्याने नागरीक संताप व्यक्त करत असतांनाच दिंडोरी लोकसभेच्या भूषण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार तसेच दिंडोरी विधानसभेचे भूषण विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे देखील याकडे दुर्लक्ष करीत आहेत की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या या रस्त्याकडे तात्काळ संबंधित विभागाने लक्ष केंद्रित करून अधिकाधिक मजबूत रस्ता बनवावा अशी मागणी परिसरातून होत आहे.

अ्क्राळे-विमानतळ रस्ता हा गुजरात – शिर्डीला जोडणारा जवळचा रस्ता म्हणून वणी- सप्तशृंगीदेवी भक्तांसाठी सोयीस्कर मार्ग आहे. रोजची रहदारी मोठ्या प्रमाणात होत असुन अवजड वाहनांचीही वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. अक्राळे ते विमानतळ या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असुन रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच ओळखणे मुश्किलच झाले आहे. अक्राळे ते नाशिक एअरपोर्ट रस्त्यावर खड्डे पडले असल्याने रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. वाहने चालवताना रस्त्यावरील खड्डे चुकविताना होणारे लहान मोठें अपघात होत आहेत.

अक्राळे फाटा ते विमानतळ हा रस्ता पुर्ण खराब झाला असून सध्या त्या रस्त्यावरही पुर्ण खड्डे झाले आहे. वाहनधारकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागते. समोरच्या वाहनाचा पूर्ण अंदाज येत नाही व खड्डे चुकविण्याच्या नादात वाहने समोरासमोर एकमेकांना धडकतात. तसेच पुढील वाहन येईपर्यंत खड्डा चुकविण्याच्या नादात मोटरसायकली स्लीप होवून अपघात होणे हे तर नित्याचेच झाले आहे. तरीही प्रशासन याबाबतीत कोणतीच दखल घेत नाही हेच एक आश्चर्य वाटते.

सध्या विमानतळ निरंतर चालू राहण्यासाठी तेथून महत्वाच्या शहरांना जोडण्यासाठी अधिकाधिक विमानांची उड्डाणे होण्यासाठी हालचाली गतिमान होत आहे ते भुषणावह असले तरीही विमानतळाला जोडणार्या रस्त्याकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसत आहे हे नवलच. अक्राळे फाटा ते अक्राळे हा रस्ता एम. आय. डी. सी. ने हस्तगत केल्याने तो रस्ता संबंधित विभागाने नवीन तयार केला आहे.परंतु अक्राळे ते विमानतळ रस्ता हा पूर्ण दुर्लक्षितच आहे.रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे संबंधित ठेकेदाराने हमी घेतली असली तरीही तो किती वर्षांसाठी हमी होती हे तर गुलदस्त्यातच आहे.

रस्त्याला ठिगळे मारून किती दिवस हा रस्ता बनवणार हेच उमजत नाही. संपूर्ण रस्ता ठिगळांचा बनल्याने आणि ते ठिगळेही दर पावसाळ्यात पुन्हा उधडून आणखी मोठमोठे खड्डे पडत असल्याने हा रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून झाले असल्याचे सांगण्यासही खेद वाटत असले तरी संबंधित प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत रस्ता दुरूस्तीसाठी तारीख पे तारीख देत आहेत. गुजरातकडून शिर्डी तसेच सप्तशृंंगीगडावर जाण्यासाठी हा सोयीस्कर मार्ग असल्याने सदर रस्त्यावरील वर्दळ जास्त आहे.

तसेच आजुबाजुच्या गावांसाठीही तालुक्याला जोडणारा रस्ता असल्याने दररोज या रस्त्याने ये – जा करावी लागत असल्याने मोठी तारांबळ होत असून याकडे तात्काळ लक्ष देवून संबंधित विभागाने हा रस्ता ठिगळांपेक्षा अधिकाधिक मजबूत रस्ता आणि तत्काळ बनवण्याची आज गरज आहे.

अक्राळे ते विमानतळ हा रस्ता अतिशय महत्त्वाचा रस्ता असून तो आज ‘असून अडचण नसून खोळंबा’ असा झाला आहे. संबंधित विभागाने याकडे तात्काळ दखल घेत कारणे न दाखवता विशेष दुरुस्तीमध्ये मजबूत रस्ता बनवावा जेणेकरून सर्व सामान्य नागरिकांना प्रवास करतांना त्रास होणार नाही व निरापराधांना नाहक जीव गमवावा किंवा अपंगत्व पत्करावे लागण्याची वेळ येवू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संबंधित विभाग सक्षम नसेल तर जिल्हा परिषदेकडे तो रस्ता वर्ग करावा जेणे करून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या रस्त्याला निधी उपलब्ध करता येईल. संबंधित विभागाने सर्वसामान्य नागरिकांना वेठीस न धरता तत्काळ विशेष निधी उपलब्ध करून देवून मजबूत रस्ता तयार करावे व नागरिकांची होणारी कुचंबणा दुर करावे अन्यथा, तसे न झाल्यास मोठे आंदोलन उभे करण्यात येईल यास सर्वस्वी जबाबदार संबंधित प्रशासन असेल.

प्रवीण जाधव, माजी जि. प. गटनेते

- Advertisment -

ताज्या बातम्या