Friday, April 26, 2024
HomeUncategorizedविधानसभेत नाशिकच्या गुन्ह्यांचे पडसाद

विधानसभेत नाशिकच्या गुन्ह्यांचे पडसाद

नाशिक | वैभव कातकाडे | Nashik

मंंत्रिमंडळाच्या (Cabinet) हिवाळी अधिवेशनात (Winter session) नाशिकमधील (nashik) गुन्ह्यांचे (crime) पडसाद बघायला मिळाले. याचवेळी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) युवकांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांना (Commissioner of Police) आधी पार्किंग (parking) द्या आणि मग टोइंग कारवाई (Towing action) सुरु करा, याबाबत निवेदन (memorandum) दिले. शहरात गेल्या महिन्यात भाजपचे (bjp) पदाधिकारी अमोल इघे (Amol Ighe) यांची हत्या झाली होती. त्या दरम्यान पाच दिवसात 3 खून (murder) शहरात झाले होते.

- Advertisement -

तसेच शहरातील टोळीयुद्ध आणि खुलेआम होणार्‍या हत्या यामुळे शहरवासीय दहशतीखाली वावरत असल्याचे भाजप आमदार सीमा हिरे (BJP MLA Seema Diamonds) यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडत याप्रकरणी पोलिसांच्या (police) कार्यपद्धतीबद्दल नाराजी वर्तवली. तसेच, इघे यांच्या खूनप्रकरणानंतर पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचे आरोप होत आहे.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Leader of Opposition Praveen Darekar) यांनीही असा आरोप केला. त्याच दिवशी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर पोलीस कारवाई विरोधात पोलिस आयुक्तालयासमोर पतीसह आत्महत्येचा प्रयत्न (Attempted suicide) करणार्‍या राजलक्ष्मी मधुसूदन पिल्ले (रा. पाथर्डीफाटा) यांनी शुक्रवारी (दि.24) मुंबईत (mumbai) विधान भवनासमोर (Vidhan Bhavan) आत्महत्येचा प्रयत्न केला.

शहर पोलिसांविरोधात नागरिक, व्यावसायिक, राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. सातपूर येथील अमोल इघे खून प्रकरणानंतर पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचे आरोप, विधान भवनाबाहेर पोलिसांच्या असहकार्यामुळे एका महिलेने आत्महत्येचा केलेला प्रयत्न, विनापरवानगी आंदोलन (agitation) करणार्‍यांवर कारवाईनंतर आंदोलकांनी व्यक्त केलेली नाराजी, वाढती गुन्हेगारी आदी कारणांमुळे विविध क्षेत्रांतून शहर पोलिसांविरोधात नाराजी उमटत आहे. पोलीस आयुक्त फक्त वाहतूक विभागाबद्दलच आदेश काढत असून गुन्हेगारी रोखण्यात सपशेल अपयशी ठरत असल्याची चर्चा देखील नागरिकांमध्ये होत आहे.

शुक्रवारी (दि.24) मुंबईत विधान भवनासमोर पोलीस कारवाई विरोधात पोलीस आयुक्तालयासमोर पतीसह आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या राजलक्ष्मी मधुसूदन पिल्ले (रा. पाथर्डीफाटा) यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. युवा स्वाभिमानी पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष असलेल्या पिल्लेसह त्यांच्या पतीने 9 ऑगस्ट रोजी शहर पोलीस आयुक्तालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.

त्यांनी केलेल्या आरोपानुसार 3 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळच्या सुमारास संशयित अजय बागुल (ajay bagul), अकुंश वर्‍हाडे आणि प्रदीप चव्हाण यांनी हल्ला केला होता. मात्र या प्रकरणात कारवाई झाली नाही, असा पिल्ले यांचा आरोप आहे. न्याय मिळत नसल्याचा दावा करीत त्यांनी शुक्रवारी सकाळी मुंबईत विधानसभेबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला.

विविध राजकीय पक्ष, संघटना, व्यक्ती आंदोलन करत असताना विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाल्याने आंदोलनकर्त्यांनी पोलिसांविरोधात नाराजी वर्तवली आहे. परवानगी मागितली तरी मिळत नाही असा आरोप काहींनी केला आहे. त्याचप्रमाणे शहरातील वाढती गुन्हेगारी, रस्त्यांवर प्राणघातक हल्ले होत असून सोनसाखळी ओरबाडून नेणे, घरफोडी, वाहनचोरी, हाणामार्‍या आदी गुन्हे घडत असून गुन्हेगारांवर अंकुश बसवण्यात पोलीस प्रभावी ठरत नसल्याची ओरड नागरिकांमधून आहे.

राजकीय पक्ष सतर्क

टोइंगबाबत आता राजकीय पक्ष सतर्क होत असून टोइंग दरम्यान सामान्य नागरिकांना अतिशय मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. शहरात ठिकठिकाणी स्मार्त सिटीचे कामे सुरु असल्याने खड्डे खणण्यात आले आहेत. त्यामुळे वाहने लावण्यास योग्य जागा मिळत नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिलेल्या निवेदनावर पोलीस आयुक्त कशा पद्धतीने कार्यवाही करतात ते बघणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या