
नाशिक | नरेंद्र जोशी | Nashik
महाराष्ट्र राज्याला (Maharashtra State) पुरातत्वीय अवशेष, स्मारके, हस्तलिखिते, पारंपारिक कला व इतर सांस्कृतिक परंपरांच्या (Cultural traditions) स्वरूपात समृद्ध असा वारसा आहे.
भूतकाळातील वैभवाचे प्रतीक असलेल्या स्मारकांचे जतन (Preservation of monuments) व पुनरूज्जीवन करून पुढच्या पिढीला आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची ओळख (Recognition of culture and tradition) करून देणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र प्राचीन स्मारके (Maharashtra Ancient Monuments), पुराणवास्तूशास्त्र विषयक स्थळे व अवशेष अधिनियमामध्ये स्मारकाच्या जतन, संवर्धन व सुशोभिकरण कामामध्ये लोकसहभागाची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार जनतेसमोर एखाद्या योजनेच्या स्वरूपात ही तरतूद सादर केल्यास स्मारकाच्या जतन दुरूस्तीस मोठा हातभार लागु शकतो. मात्र आजपंर्यंत पुरतत्व खात्याप्रमाणेच हा विषयही दुर्लक्षित राहीला आहे.
आता पहिल्यांदा त्याबाबत खुली ऑफर देऊन पुरातत्व खात्याने पुढाकार घेतला आहे. नाशिकमधील (nashik) धर्मदाय संस्था व मोठ्या कंपन्यांंचा यास हातभार लागल्यास नाशिकच्या पर्यटन विकासाला (Tourism development of Nashik) एक प्रकारे चालना मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यात (nashik district) असलेल्या 28 राज्य संरक्षित स्मारकांचे पालकत्व स्वीकारण्यासाठी तसेच त्या स्मारकांचे जतन (preserve), संवर्धन (Conservation), सुशोभिकरण (beautification) करण्यासाठी नाशिकमधील स्थानिक स्वराज्य संस्था (Local Self-Government) / खासगी कंपनी विश्वस्त मंडळ यांना खात्याने खुली ऑफर दिली आहे.
यासाठी महाराष्ट्र राज्यातील (state of Maharashtra) सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसांचे जतन करणे व नाशिक जिल्ह्यातील राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन देखभाल, सुशोभिकरण इ. कामांसाठी सार्वजनिक सामाजिक सहभाग (Public social participation) मिळविणे, संस्था व्यक्ती यांना स्मारकांचे पालकत्व घेण्याकरिता प्रोत्साहित करणे, खासगी क्षेत्रातील कौशल्याचा, ज्ञानाचा आणि अनुभवाचा जतन व दुरूस्ती कार्याकरिता उपयोग करून घेणे या हेतूने पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजना सुरू करण्यात आली आहे.
आपल्या गौरवपूर्ण वारशाचे जतन आणि संवर्धन करू इच्छिणार्या संस्थांना आणि व्यक्तींना या मोहिमेत प्रत्यक्ष सहभागाची संधी देऊन त्यांना प्रोत्साहन देणेकरिता ही योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेमध्ये खाजगी कंपनी/ विश्वस्त मंडळ व्यक्ती यांना त्यांचे ज्ञान, अनुभव, कौशल्य आणि भांडवल गुंतवून राज्य संरक्षित स्मारकांचे जतन करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एखादे स्मारक या योजने अंतर्गत घेतल्यानंतर त्याची देखभाल दुरुस्ती/ सुशोभिकरण हे संबंधित संस्थेतर्फे करण्याचा प्रयत्न ओहे.
कोणाला यामागे खासगीकरणाचा वास येईल. मात्र जतनासाठी कोणीतरी पुढाकार घेणेही गरजेचे आहे. जिल्ह्यात नाशिक, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, दिंडोरी, मालेगाव, येवला तालुक्यात बरीच मंदिरे, लेणी संरक्षित वास्तू म्हणून घोषित आहेत. पुरातन ठेवा जतन करण्याची जबाबदारी पुरातत्व विभागाने स्वीकारलीच आहे. नाशिक तालुक यातील अंजनेरी गावातील हेमाडपंती मंदिरे, दिंडोरीच्या आंबेगावमधील पुरातन मंदिर, जुने नाशिकमधील जुनी मातीची काझीगढी, सिन्नरचे अय्येश्वर मंदिर, त्रिंगलवाडीमधील जैन लेणी, मालेगाव तालुक्यातील झोडगेचे हेमाडपंती महादेव मंदिर व संरक्षित वास्तूंमंध्ये समाविष्ट असलेली सर्व मंदिरे पुरातन व हेमाडपंती असून त्यावरील दगडी कोरीव नक्षीकाम आणि स्थापत्यकला दुर्मीळ आहेत.
बारा जोतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराचीही स्थापत्यकला लक्षवेधी आहे. संपूर्ण काळ्या पाषाणाचा वापर करून ही मंदिरे बांधण्यात आली आहेत. भारतीय पुरातत्व विभागाने या वास्तूंचे संरक्षण करत त्यांचे जतन करण्यासाठी त्या संरक्षित वास्तू म्हणून घोषित केल्या आहेत. या योजनेला आता इच्छा आणि शक्तीची गरज आहे. ती संस्थानी पूर्ण केली तर या जुन्या वारशावर चार चांद लागल्याशिवाय राहणार नाही.