Sunday, April 28, 2024
HomeUncategorizedबासरीच्या मधूर स्वरांनी वाढतो जॉगर्सचा उत्साह

बासरीच्या मधूर स्वरांनी वाढतो जॉगर्सचा उत्साह

नाशिक | राजेंद्र सूर्यवंशी Nashik

सध्या हिवाळा (cold season) असल्याने सकाळची थंड हवा (Cold air), हवेतील गारवा आणि सकाळचे (morning) प्रसन्न वातावरणात जॉगिंग (Jogging) करताना बासरीचे (flute) मधूर स्वर कानावर पडले तर जागर्सचा उत्साहात अजून भर पडते.

- Advertisement -

हे चित्र बघावयास मिळते ते शहरातील विविध जॉगिंग ट्रॅकवर (Jogging track). हे बासरीचे मंजुळ स्वर जॉगर्स पर्यंत पोहचविण्याचे काम गेल्या काही वर्षापासून बासरीवादक सुनिल बच्छाव (Flute player Sunil Bachhav) यांच्याकडून सुरू आहे. सध्या गोल्फक्लब मैदानावर (Golf club grounds) त्यांच्या बासरीने सकाळी येणार्या जॉगर्ससह व्यायामप्रेमी देखील सुखावतात. या गारव्यात नाशिकच्या (nashik) गोल्फ क्लब मैदानावर दोन ते अडीच हजार नागरिक जॉगिंग आणि व्यायाम (Exercise) करण्यासाठी आलेले असतात. प्रत्येकजण आपापला व्यायाम करीत असतो. त्याचबरोबर या मैदानावर क्रिकेटचे (Cricket) पाढे गिरवणारे खेळाडू, योगाप्रेमी (yoga) आणि इतर खेळांचे प्रशिक्षण घेण्यास अनेक खेळाडू देखील तेथे आलेले असतात.

मात्र बासरीवादक सुनील बच्छाव हे आपल्या वासुरीची धून संपूर्ण गोल्फ क्लब मैदानावरील नागरिकांना ऐकू यावी म्हणून छोटा माइक (Mike) व त्याबरोबर असलेला छोटा एम्लीफायर (Amplifier) याच्या सहाय्याने गोल्फ क्लब वरील सर्व जॉगर्स व त्या ठिकाणी असलेल्या सर्वांपर्यंत पोहचविण्यास यशस्वी झाले आहेत

त्यांच्या बासरी वादनाच्या छंदाविशयी बोलताना धुळे जिल्ह्यातील (dhule district) शिंदखेडा (shindkheda) गावपासून 7 कि.मी. अंतरावर असलेल्या वीरदेल गावचा मुळ रहिवाशी लहानपासूनच मला बासरीवादनाची आवड निर्माण झाली.

शाळेत असतांनाच स्वातंत्र्यदिन (Independence Day) किंवा इतर कार्यक्रमासाठी मला बॅण्ड वादन करावे लागत असे. त्याचबरोबर बासरी वादन करत असत. सुरुवातीला मी बासरीवर राष्ट्रगीत (National anthem) म्हणण्यास सुरुवात केली. त्यानंतर अनेक गाणी वाजवायला लागलो.बासरीवरील माझे बोट व्यवस्थित उचलले जात नव्हते. त्यामुळे सूर पाहिजे तसा निर्माण होत नसल्याने गोपाळ पाठक सरांनी माझी काय चूक होत आहे हे सांगितले आणि त्यांचे बासरी वादनाविषयीचे मार्गदर्शन लाभले. तेथून माझा बासरी वादनाचा खरा प्रवास सुरू झाला. बासरीचे तसे विविध प्रकार आहेत.

मी पहिली बासरी घेतली ती 600 रुपयांची आता माझ्याकडे 10 ते 12 बासरीचा किट आहे. हा किट आणि माईक माझ्याजवळच ठेवत असतो. या माईकमुळेच गोल्फ क्लबच्या संपूर्ण लोकांपर्यंत पोहोचत आहे. मी सीएट एम्प्लॉईज को. ऑप. सोसायटीत काम करीत असून, एलआयसीचाही व्यवसाय सांभाळतो. तेथील माझ्या सहकान्यांनी माझे अनेक छोटे-मोठे कार्यक्रम आयोजित करीत असतात. माझ्या बासरी वादनाने लोकांना आनंद देणे हेच माझे ध्येय असल्याचे ते म्हणतात.

सध्या ते सकाळी पांडवलेणी, गंगापूर येथील बालाजी मंदिर,काळाराम मंदिर, कृषीनगर जॉगिंग ट्रक आणि गोल्फ क्लब मैदान येथे बासरी वादन करीत आहेत. गोल्फ क्लब मैदानावरील वातावरण खुप चांगले आहे. या ठिकाणी झाडांनी वेढलेला जॉगींग ट्रक आहे. त्याचबरोबर माझ्या बासरी वादनाला मोठ्या प्रमाणात साद देखिल मिळतो. अनेक जणांची ईच्छा आहे की मी आता बासरीचे प्रशिक्षण सुरू करावेत. पण आज नोकरी आणि एलआयसीचे काम करीत असल्याने जेव्हा मी सेवानिवृत होईल त्यावेळी नक्की मी याचा विचार करणार असल्याचे बच्छाव यांनी स्पष्ट केले मी एकदा रामोजी फिल्मसिटीमध्ये गेलो होतो. त्यावेळी तेथे माझ्याकडून चार गाणी वाजवून घेतली.

आता माझा मानस आहे की ही आवड पुढेही अशीच सुरू ठेवावी. त्यातून कला जिवंत राहिल. आपल्याकडे जे आहे ते दुसर्याला देणे यातच मला खरा आनंद वाटतो. खरे तर मी दोन दिवसांपासून गोल्फ क्लब येत असलो तरी इंदिरानगर, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक असे विविध प्रकारच्या जॉगींग ट्रॅकवर जाऊन मी बासरी वादन करीत असतो. तेथील लोकांचे अभिप्राय मला आनंद देऊन जात असतात. गोल्फवर येणार्या जगप्रेमींसाठी मी दररोज सकाळी 6.30 ते 7.30 या वेळेत बासरी वादन करणार असल्याचे बच्छाव यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या