इंधनासह कच्च्या मालाचे दर वाढल्याने औद्योगिक क्षेत्र अडचणीत

jalgaon-digital
3 Min Read

नाशिक | रवींद्र केडीया | Nashik

उद्योगक्षेत्रातील (Industry sector) उत्पादनाला गती देण्याचा प्रयत्न सुरू असले तरी प्रत्यक्षात उद्योजकांसमोर इंधन दरवाढीसह (Fuel price hike) कच्चा मालाच्या (Raw material) दरांसोबतच बाजार भावाची तोंडमिळवणी करण्याच्या अडचणी निर्माण होत असल्याने उद्योगांची गती पुन्हा मंदावण्यास सुरुवात झाली आहे. कच्चा माल म्हणून वीज (electricity) व पोलाद (Steel) वापरणार्‍या उद्योगांनंतर उत्पादनाची गती मंद करण्याशिवाय पर्याय राहिलेला नसल्याचे चित्र आहे.

शासनाने लॉकडाऊन (Lockdown) उठवल्यानंतर उद्योग क्षेत्राला गती देण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला ही गती मंद असली तरी मोठ्या संख्येने उद्योजक व कामगार (Entrepreneurs and workers) उत्पादन प्रक्रियासाठी पुढे येऊ लागले होते. उत्पादनाला गती देताना तयार मालाची मागणी व महागाईमुळे (Inflation) उत्पादन मूल्याची तोंडमिळवणी करण्याचे लघु व मध्यम उद्योगांना समोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

कारखान्यातील (Factories) उत्पादनांचे मूल्य व उद्योगांना दिलेल्या दरात मोठी तफावत असल्याने त्याचा ताळमेळ जमवणे उद्योजकांना अडचणीचे होऊ लागले आहे. परिणामी करोना (corona) काळातून बाहेर पडू पाहणारी उद्यरोगांची चाके येणार्‍या काळात पुन्हा एकदा अडचणीच्या गर्तेत रुतण्याची शक्यता दिसू लागली आहे. खर्चाचा अतिरिक्त भार डोकेदुखी वीज मंडळाद्वारे अतिरिक्त अनामत रकमेसाठी आग्रह धरला जात आहे. ते न भरल्यास वीज पुरवठा खंडित (Power outage) केला जाणार असल्याची नोटीस बजावण्यात आलेली आहे.

या पार्श्वभूमीवर उद्योजकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. आधीच उत्तर महाराष्ट्रापेक्षा (North Maharashtra) विदर्भ मराठवाड्याला वीजबिलात (Electricity bill) सवलत दिली गेली असल्याने विदर्भ मराठवाड्याच्या तुलनेत उत्पादन मूल्य वाढत असल्याने स्पर्धेत टिकणे कठीण झाले असल्याने उद्योजक मेटाकुटीला आलेले आहेत. त्यात आता अनामत रकमेच्या मार्‍यामुळे उद्योजक त्रस्त झाल्याचे चित्र आहे.

मागणी-पुरवठ्याचा मेळ कठीण

उद्योगांचे उत्पादन सुरू न झाल्याने छोट्या व मध्यम उद्योगांच्या मालाची मागणी घटू लागलेली आहे. वीज दरवाढ, इंधन दरवाढ, स्टिलच्या दरात झालेली कमालीची वाढ या पार्श्वभूमीवर उद्योगांना उत्पादन मूल्यांची तोंडमिळवणी करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यात अनेक कारखान्यात दरांचे करार आधीच केलेले असतात. त्यामुळे नव्याने दरांच्या फरकाची तोंडमिळवणी करणे अशक्य होत असल्याने उद्योजक हवालदिल झालेले आहेत.

कंपनीसमोर कामगारांची वाढती गर्दी

उत्पादन प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. कच्च्या मालाच्या दरवाढीने मेळ करणे अवघड होत असल्याने कमी कामगारांमध्ये काम सुरू ठेवण्याचे धोरण उद्योजकांनी अवलंबलेले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कामगारांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण होऊ लागलेले आहेत. कुशल कामगारांसह हंगामी कामगार मोठ्या संख्येने कारखान्याच्या प्रवेशद्वारावर गर्दी करताना दिसून येत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *