उद्योजक संघटनांची प्रतिमा मलीन

उद्योजक संघटनांची प्रतिमा मलीन

नाशिक | रवींद्र केडीया | Nashik

उद्योजक संघटनांंच्या (Entrepreneurial Associations) निवडणुका (election) नेहमीच वादात राहिलेल्या आहेत. गेल्या काही वर्षात या निवडणूकांमध्ये राजकीय फंडे वापरण्याकडे कल वाढला आहे. प्रामुख्याने बोगस मतदान (voting) करुन घेतले जात असल्याने हा विषय गंभीर झाला आहे.

मात्र यावर ठोस निर्णय होत नसल्याने उद्योजकही (Entrepreneur) या गोष्टींकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. उद्योजक संघटनांचा उद्देश हा सहकारी संस्थां (Co-operative Societies) सारखा नाही. यातून सस्थेची पर्योयाने उद्योजकांची प्रतिमा मलीन होऊ लागलेली आहे. किंबहुना त्यांच्या प्रतिष्ठेला न शोभणार्या कृत्यांमुळे संस्थेच्या व्यासपीठाचा उकिरडा होऊ लागला आहे. हे बदलण्यासाठी सर्वच गटांतून प्रयत्न होण्याची गरज आहे.

उद्योजकांची संघटना म्हणून ’निमा’ (Nima) व ’आयमा’ (AIMA) या संघटनांकडे शासनासह सर्वच स्थरांवर आदराने पाहिले जात होते. ’निमा’च्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजीला उधाण आले होते. सर्वसाधारणपणे दोन गटात सरळ लढती होत असतात. मात्र त्यावेळी तिरंगी लढत झाली. निवडणूका (election) रंगात आलेल्या असतानाच अचानक निवडणुकीदरम्यान एका गटाने दुसर्या गटाला पाठिंबा जाहीर केला.

यावेळी झालेल्या धांधलीत बोगस मतदान करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले होते. एका महिलेला बोगस मतदान करताना पकडल्यानंतर मतदान रांगेत असलेले बोगस मतदार मतदान केंद्रातून गायब झाले होते. त्यामुळे मतपेटीतून मतपत्रिका देखील कमी निघाल्या होत्या. याप्रकरणातून संघटनेची इभ्रत चव्हाट्यावर येईल ही भूमिका घेत उद्योजकांनी हे प्रकरण रेटून नेले.

यंदा झालेल्या आयमा निवडणुकीत असाच बोगस मतदान करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. एका प्रतिथयश उद्योजकाच्या कारखान्याचा प्रतिनिधी म्हणून एक युवक मतदान करायला आला. त्याची ओळख न पटल्याने पोलिंग एजंटने ओरड केली. या बोगस मतदाराने कोणालीही लक्षात येण्याच्या आत मतदान कक्षातून धूम ठोकली. मतदान प्रतिनिधी त्याच्या मागे धावले.

तो कारमध्ये बसून पळून जाण्यात सफल झाला. या प्रकरणातदेखील उद्योजकांनी पुन्हा एकदा या प्रकाराला बगल देण्याचा प्रयत्न केला. सातत्याने हा प्रकार होऊनही हेतुपुरस्सर या प्रकारांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे उद्योग क्षेत्रात पुन्हा एकदा राजकीय रस्सीखेचीचा प्रत्यय येऊ लागला आहे.

राजकारणात निवडणुका जिंकण्यासाठी साम-दाम-दंड-भेद याचा वापर केला जातो. इथे जातीय भेद करून प्रांतीय वाद निर्माण करून मतांची भीक झोळीत पाडण्यासाठी विविध प्रलोभने दिली जात होती. राजकीय नेत्यांप्रमाणे मोठमोठ्या हॉटेल्समध्ये पार्ट्यांचे फडही रंगले असल्याचे दिसून आले होते. या पार्श्वभूमीवर उद्योजकांनी उद्योजक संघटनेचे पावित्र्य जपण्यासाठी असल्या प्रकारांना थारा देऊ नये अशी भूमिका ज्येष्ठ उद्योजक व्यक्त करताना दिसून येतात.

प्रत्यक्षात या आयोगाच्या निवडणुकीतही आयमा निवडणुकीतही तीन ते चार मतपत्रिका कमी निघाल्या याचा अर्थ मतदान करताना बोगस मतदार पकडला गेल्यानंतर उर्वरित मतदान करतात. तीन ते चार बोगस मतदारांनी पळ काढल्याचे समोर येत आहे. त्यामुळे असल्या प्रवृत्तींना आळा घालायचा असेल तर उद्योजक संघटनांनी ठोस पावले उचलायला हवीत. याची चर्चा केवळ निवडणूकीपुरती मर्यादित न ठेवता कायम स्वरुपीचा तोडगा यावर काढला पाहिजे.

निवडणुकांमध्ये अशा पद्धतीने मतदान प्रक्रिया घडत राहिली तर चांगले उमेदवार अथवा चांगले उद्योजक संघटनांच्या कार्यापासून वा या निवडणुकांपासून दूर जातील. मोठे उद्योजक अशा भानगडीत मुळीच उतरणार नाहीत.

एकीकडे मोठ्या उद्योजकांना सामावून घेणे अथवा मोठ्या उद्योगांना संघटनांच्या कार्यात रस घेण्यास भाग पाडणे हा प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे अशा पद्धतीने सत्तासंघर्षासाठी कोणत्याही स्तरावर जाऊन लढा देणार्या प्रणालीत मोठ्या उद्योगांनी का व कसा सहभाग घ्यावा? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. उद्योजकांनी व संस्थाचालक यावर आत्मपरीक्षण करतील का?

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com