‘समृद्धी’चा अनुभव सिंहस्थ कुंभमेळ्याला कामी येणार

‘समृद्धी’चा अनुभव सिंहस्थ कुंभमेळ्याला कामी येणार

नाशिक | फारुख पठाण | Nashik

एशिया खंडातील सर्वात जलदगतीने तयार होणार्‍या शेकडो किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Highway) कामात मोलाची कामगिरी बजावणारे

संचालक असलेले डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Dr. Chandrakant Pulkundwar) यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी नाशिक महापालिका आयुक्तपदी (Nashik Municipal Commissioner) नियुक्ती केली आहे.

महापालिका प्रशासनाच्या वतीने 2027 मध्ये होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याचे (Simhastha Kumbhmela) नियोजनाला सुरुवात झाली आहे. यामुळे समृद्धी महामार्ग तयार करण्याचा दांडगा अनुभव आयुक्तांच्या माध्यमातून कुंभमेळाच्या तयारीला कामी येणार हे नक्की. नाशिक महापालिका आयुक्त तथा प्रशासक (Nashik Municipal Commissioner and Administrator) म्हणून डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पदाची सूत्रे घेतल्यापासून आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली आहे.

प्रशासनावर जबरदस्त पकड ठेवणारा या आयएएस अधिकार्‍याची कामाची शैली इतर अधिकार्‍यांपेक्षा वेगळी असल्याचे महापालिकेतील अधिकारी बोलून दाखवतात. त्याचप्रमाणे नाशिक महापालिकेत कामाच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी लोकप्रमुख कामांना पसंती दिली आहे. प्रदूषणमुक्त गोदा (Pollution free Godavari) करण्याचा त्यांचा मानस असून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे सूक्ष्म नियोजन करण्यावर त्यांनी भर दिला आहे. कुंभमेळ्याच्या नियोजनाची तयारी सुरू करताना त्यांनी 12 वरिष्ठ अधिकार्‍यांची टीम देखील तयार केली आहे. तर शहर अभियंता शिवकुमार वंजारी (City Engineer Shivkumar Vanjari) यांच्यावर समन्वय पदाची जबाबदारी दिली आहे.

मागच्या आठवड्यात त्यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेऊन विविध प्रकारच्या सूचना केल्या. यंदा पार्किंगसाठी (parking) जास्त जागा लागणार आहे. म्हणून नवीन जागांचा शोध घेण्याबरोबरच नव्याने 60 किलोमीटर लांबीचा नवीन बाह्य रिंगरोड तयार करण्याचे नियोजन सुरू केले आहे. त्याचबरोबर कुंभमेळ्याच्या कामाचे प्राधान्यक्रम ठरविण्याचे आदेशही आयुक्तांनी अधिकार्‍यांना दिले. नवीन रिंगरोड जलालपूर ते जलालपूरपर्यंत राहणार आहे. कुंभमेळापूर्वी साधारण चार वर्षात हे नवीन रिंगरोड तयार करण्यात येणार आहे.

नवीन रिंग रोड तयार करण्याबरोबर पूर्वीचे रस्त्यांना देखील व्यवस्थित करण्यात येणार आहे. निधीचा (fund) उपयोग करून घेताना भविष्याचा विचार करण्यात येणार आहे तसेच वॉटर ट्रीटमेंट प्लांट आदी प्रकल्प देखील या माध्यमातून शहरात तयार करण्यात येणार आहे. केंद्र तसेच राज्य शासनाकडून (state government) किती निधी येणार याबाबत अद्याप स्पष्ट नसले तरी महापालिका आपल्या पद्धतीने कामाचे नियोजन करीत आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार अधिकारी वर्गाकडून कामाच्या प्राधान्यक्रम ठरविण्यात येत आहे.

यामध्ये कुंभमेळ्यात येणार्‍या शाही स्थानांच्या तारखा, त्यादिवशी होणारे भाविकांची गर्दी, साधू महंतांच्या शाही मिरवणूक मार्ग आदींच्या कामाचे नियोजन करण्यात येत आहे. भाविकांना अधिकाधिक संख्येने स्नान करता यावे तसेच एका ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी घाटांची लांबी देखील वाढण्यावर विचार सुरू आहे. यासाठी महापालिका आयुक्त लवकरच शहरातील सर्व घाटांच्या पाहणी दौरा करणार आहे. या पाहणी प्रसंगी महापालिकेतील अधिकार्‍यांसह शासनातील अधिकारांना देखील पाचारण करण्यात येणार असल्याचे समजते. त्याचप्रमाणे स्मार्ट सिटीचे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहे.

नाशिकमध्ये (nashik) दर बारा वर्षांनी भव्य स्वरूपात सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होते. या काळात शाही स्नानाची पर्वणी असते म्हणून जगभरातून लाखो भाविक नाशिकमध्ये येतात. त्यांचा सर्व प्रकारच्या सोयी सुविधा शासनासह महापालिका प्रशासनाच्या वतीने पुरविण्यात येतात. महापालिकेला विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यासाठी नेमका किती निधी आवश्यक आहे. याबाबतचा आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे. आढावा घेण्यात आल्यानंतर शासनाकडे निधीची मागणी करण्यात येणार आहे. दरम्यान विद्यमान आयुक्तांचा समृद्धी महामार्ग कामाच्या अनुभव असल्यामुळे सिंहस्थ कामांचे नियोजन योग्य पद्धतीने होऊन त्याचा फायदा नाशिककरांना होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com