Friday, April 26, 2024
HomeUncategorizedडिजिटल शाळेचे स्वप्न अधूरे

डिजिटल शाळेचे स्वप्न अधूरे

पाटोदा । महेश शेटे | Patoda

2017 मध्ये सर्वत्र शाळा (schools) डिजिटलचे (digital) वारे वाहू लागल्यानंतर आपलेही मुले शिकत असलेली शाळा डिजिटल (School Digital) व्हावी. यासाठी आपण काय करू शकतो याचा विचार करत पाटोदा (patoda) येथील एका अवलियाने प्रत्येक शनिवारी मोफत कटिंग करून देत शिक्षकांकडे पैसे जमा करण्यास सुरुवात केली. परंतु स्थानिक व्यवस्थेची अनास्था आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown) ते स्वप्न अधुरेच राहिले.

- Advertisement -

दहा हजाराहून अधिक लोकसंख्या असणार्‍या येवला तालुक्यातील (yeola taluka) पाटोदा या गावांमध्ये जिल्हा परिषद (zilha parishad) आस्थापनाच्या पाच शाळा आहेत. त्यापैकी गावालगत असणार्‍या जिल्हा परिषद शाळा (Zilha Parishad School) भाग 1 व शाळा भाग 2 डिजिटल करून आपल्या पाल्यांना खासगी शाळांच्या तोडीस तोड शिक्षण (education) उपलब्ध करून देण्याचा मानस पाटोदा येथील नाभिक व्यावसायिक नामदेव जाधव यांनी जिल्हा परिषद शिक्षक सखाराम सोनवणे यांच्याकडे व्यक्त केला. शिक्षकांनी आपल्या पगारातून काही वर्गणी देण्याचे कबूलही केले, परंतु खर्‍या अर्थाने शाळा डिजिटल करावयाची झाल्यास एक ते दीड लाखाहून अधिक खर्च येईल.

हा खर्च उभारायचा कसा या संकल्पनेतून जाधव यांना एक युक्ती सुचली. त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना (students) कटिंगचे पैसे शिक्षकांकडे जमा करण्याचे सुचवले व त्या विद्यार्थ्यांची प्रत्येक शनिवारी ते मोफत कटिंग करून देऊ लागले. यातून येणार्‍या पैशां सोबतच सहा महिन्यानंतर एक पालक सभा बोलून पालकांना विनंती करून काही लोक वर्गणी जमा करायचे यावर शिक्षक व जाधव यांचे एकमत झाले. ठरल्याप्रमाणे पालकांशी समन्वय साधण्यासाठी एका समाजसेवी संस्थेच्या प्रतिनिधीस जाधव यांनी पाचारण केले.

त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पालकांनी लोकवर्गणी जमा करण्यास सुरवातही केली. परंतु कार्यक्रमात स्थानिक ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व गटाचे जिल्हा परिषद सदस्य उपस्थित झाले आणि त्या स्वप्नाला खीळ बसवली. लोकवर्गणी जमा करण्याची काय गरज आहे, ग्रामपंचायत निधीतून आम्ही शाळा डिजिटल करून देऊ असे मत तत्कालीन सरपंचांनी मांडले. शाळेला टीव्ही भेट देणे याचा अर्थ शाळा डिजिटल होणे नव्हे तर शाळेमध्ये प्रोजेक्टर असणे, त्या प्रोजेक्टरला माहिती तंत्रज्ञान आधारित इंटरनेट जोडून विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी मदत करणे म्हणजे शाळा डिजिटल करणे हे लक्षात घेऊन जाधव यांनी प्रत्येक शनिवारी विद्यार्थ्यांच्या कटिंग करून देण्याचा आपला उपक्रम सुरूच ठेवला.

परंतु लॉकडाउन झाल्यामुळे मात्र त्यांच्या उपक्रमाला ब्रेक लागला. शाळा डिजिटलच्या स्वप्नाला आम्ही पूर्णत्वास नेऊ असा शब्द देणारे ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यही बदलले आहेत. जाधव यांनी शाळा डिजिटलसाठी केलेले प्रयत्न स्थानिक प्रशासनाने हाणून पाडल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी डिजिटल शाळेचे स्वप्न बाजूला ठेवले.

- Advertisment -

ताज्या बातम्या