धोकादायक कसारा घाट

धोकादायक कसारा घाट

इगतपुरी । वाल्मिक गवांदे | Igatpuri

मुंंबई - नाशिक महामार्गावरून (Mumbai - Nashik Highway) प्रवास करताय तर सावधान, कसारा घाटात (Kasara Ghat) अनेक अपघात होऊन तुटलेले कथडे धोका निर्माण करीत आहेत. त्यामुळे कसारा घाटातून (Kasara Ghat) प्रवास करताना नागमोडी वळणे (zigzag turns) सावधपणे पूर्ण करा.

महामार्गावरील नागमोडी वळणाचा (zigzag turns) असलेल्या कसारा घाटात निकृष्ट बांधकाम असल्यामुळे अनेक ठिकाणी संरक्षक कथडे तुटून पडलेले आहेत. तर काही कथडे दुचाकी, कार (car), ट्रकच्या (truck) धक्याने तुटले आहे. मात्र दुरुस्तीच्या नावाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (National Highway Authority) व त्यांनी नेमेलेल्या ठेकेदार कपंनीने (Contractor cups) अनेकदा दुरुस्तीच्या नावाखाली थातूर मातुर काम केने आहे.

जुन्या कसारा घाटातुन (Kasara Ghat) प्रवास करतांना नियमित ये जा करणारे वाहन चालक प्रवासी जरा जपूनच प्रवास करीत असले तरी या मार्गीकेवरून दररोज हजारो नवखे प्रवासीही प्रवास करीत असतात. या प्रवाशांना नागमोडी वळणाचा व कमकुवत संरक्षण कथड्याचा (Weak defense wall) अंदाज येत नसल्याने आज पर्यंत अनेक अपघात या जुन्या कसारा घाटात झाले आहेत. या अनेक झालेल्या अपघातात काही मयत झाले तर काहींना कायमचे अपंगत्व आले. त्यातच या दोन वर्षात संरक्षक कथडे (defense wall) तोडून तर संरक्षक कथडे नसलेल्या ठीकाणी 6 ते 7 वाहनांचा 400 फूट खोल दरीत पडून अपघात झाला आहे.

तुटलेले संरक्षक कथडे (defense wall) दुरुस्त झाले नाहीत. या कथड्यामुळे रात्रीच्या वेळी मोठा आपघात होऊन वाहने दरीत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या तुटलेल्या कथड्या भोवती प्रशासनाने प्लास्टिक बॅरीगेट्स (Plastic barricades) लावले असुन ते रात्रीच्या अंधारात व दाट धुक्यात वाहन चालकांना दिसून येत नाहीत. असाच प्रकार टोपाची बावडी जवळ पण असुन त्या ठिकाणी देखील प्लास्टिक बॅरीगेट्स (Plastic barricades) लावले गेले आहेत. परंतु सद्या या बॅरीगेट्सच्या भरवशावर वाहन चालकांची सुरक्षा येऊन ठेपली आहे.

कसारा घाटातील असुरक्षित तुटलेल्या कथड्या सहीत ठीक ठीकाणी दरडी डोकावत आहेत. घाटाच्या दोन्ही लेनवर मोठया पावसात लहान मोठे दगडी रस्त्यावर येत आहेत. त्याच बरोबर कसारा घाट उतरून आल्यावर मुबंईकडे जाताना रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याने परिणामी अशावेळी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत महामार्ग सुरक्षा पोलीस व कसारा पोलीस यांनी सुरक्षेच्या कारणास्तव घाटातील रस्ता दुरुस्त करावा यासाठी वर्षभर पाठपुरावा केला मात्र ठीम्म प्रशासनाने याकडे लक्षच दिले नाही.

दरम्यान राष्ट्रीय महामार्ग असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावरील कसारा घाटातुन प्रवास करणार्‍या वाहनचालकांच्या, त्यातील प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव महामार्गावरील धोकादायक समस्याबाबत महामार्ग पोलीस घोटी केंद्र व कसारा पोलिसांनी संबंधित प्रशासनाकडे अनेकदा लेखी तक्रारी करून त्यावर उपाययोजना करण्याची विनंती केली. परंतु टोल कंपनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व्यवस्थापनाकडून पोलिसांच्या पत्रांना केराची टोपली दाखवली जात आहे.

कसारा घाटात अनेक ठीकाणी धोकादायक ठिकाणे असुन जुन्या कसारा घाटातील साईबाबा खिंड, आबांपॉईंट, हिवाळा ब्रिज वळण, व त्यापुढील 2 किलोमीटरचा रस्ता तसेच नवीन घाटातील बिबलवाडी वळण, ब्रेक फेल पॉईंट, धबधबा पॉईंट, लतीफवाडी उतार, ओहळाची वाडी ही ठिकाणे धोकादायक आहेत. या धोक्याच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी वाहन चालक प्रवाशांसाठी ब्लिकर लाईट, तुटलेल्या कथड्या लगत तात्पुरत्या स्वरूपात तरी रेडीयम बॅरीगेट्स लावल्यास वाहन चालकांना रात्रीच्या वेळी वाहन चालवणे सोईचे ठरु शकते.

विशेष म्हणजे गस्त घालणारे पोलीस तसेच टोल कपंनीच्या कर्मचार्‍यांची सुरक्षा देखील राम भरोसे आहे. महामार्गावर गस्त घालणारे पोलीस, टोल कपंनीच्या पेट्रोलिंग करणार्‍या कर्मचार्‍यांची सुरक्षा देखील या घाटात रामभरोसे असल्याने वाहन चालक व सुरक्षाकर्मी यांना 7 कि.मीटरचा घाट जीव मुठीत घेऊन पार करावा लागत आहे. 7 कि.मीटरच्या जुन्या कसारा घाटात ठीक ठीकाणी संरक्षक कथड्यांची दुरावस्था झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व टोल कंपनी याकडे दुर्लक्ष करीत असून एखादी मोठी दुर्घटना घाटात झाल्यास त्याला सबधित यंत्रणा कारणीभूत असेल, असे मत आपत्ती व्यवस्थापन पथकाचे शाम धुमाळ, यांनी म्हटले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com