Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedरसवंती, थंडपेयांंकडे कल

रसवंती, थंडपेयांंकडे कल

नांदगाव । संजय मोरे | Nandgaon

एप्रिल-मे महिन्यात तापमानानाने (Temperature) 41 ते 44 अंश सेल्सिअस पातळी गाठली आहे. वाढत्या उकाड्यामुळे शहरातील बाजारपेठ व रस्ते निर्मनुष्य होत चालले असून ग्राहकांची वर्दळदेखील मंदावली आहे.

- Advertisement -

उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्यांची गर्दी रसवंतीकडे (juice shop) वाढत आहे. यंदाचा उन्हाचा पारा (mercury) कडक असल्याने शीतपेयांनीही (Soft drinks) तेवढीच मागणी राखून ठेवली आहे. मार्च महिन्याच्या प्रारंभी रसवंती सुरू करण्यात आल्या आहेत. वाढलेल्या उन्हाने त्यांना आता सुगीचे दिवस आले आहेत. उसाच्या रसाबरोबर उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी कुल्फीस मागणी वाढली आहे.

परप्रांतीय कुल्फी विक्रेते विविध चवींच्या कुल्फी (Kulfi) तयार करून विकतात. या गारव्याकडे ग्राहक आकर्षित होत आहेत. उन्हाळ्याच्या (summer) दिवसात व्यवसायाभिमुख दृष्टिकोनामुळे त्यांनाही सुगीचे दिवस आले आहेत. याबरोबर विविध प्रकारचे आईस्क्रीम (Ice cream), फ्रुटसलाड (Fruit salad) विक्रेतेही ठिकठिकाणी दिसत असून उष्ण तामानाचा सामना करण्यासाठी या पदार्थांचा आस्वाद घेण्याचे प्रमाण वाढले आहे. याबरोबर खेडोपाडी विक्री होणारा गारेगार अल्प दरात प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये द्रव स्वरुपात पकिंग असलेल्या पेप्सीची मागणी वाढली आहे. बाहेरच्या शीतपेयांपेक्षा घरचे चांगले अशी भूमिका ठेवणारे घटक लिंबूपासून तयार होणार्‍या सरबतास पसंती देतात.

दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. हवामान खात्याकडून देशभरातील विविध राज्यांत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा दिल्यानंतर याचे परिणाम महाराष्ट्रातही दिसू लागले आहेत. नांदगाव तालुक्यात तर कमाल तपमानाने 41 ते 43 अंशांची पातळी केव्हाच ओलांडली आहे. आगामी काही दिवस उन्हाची तीव्रता आणखी वाढणार असल्याचे चित्र आहे.

नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून हवेच्या उष्ण लहरी आणि तळपत्या झळा सहन करताना नांदगावकर अक्षरश: घामाघूम झाले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे चक्कर येऊन बेशुद्ध पडण्याच्या प्रकारातदेखील वाढ होऊ लागली आहे. उन्हात फिरल्यामुळे तसेच उन्हाचा प्रकोप असह्य झाल्यामुळे चक्कर येणे, मळमळ होणे, उलट्या होणे, डोके दुखणे, घाम येणे, वारंवार थकवा येत आहे. दमा असलेल्या नागरिकांना श्वासोच्छ्वासाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. उष्माघाताची लक्षणे दिसताच बाधित व्यक्तीला वातानुकूलित जागेत, सावलीत किंवा थंड्या जागी बसवावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या