दिवाळीच्या सुट्टीचा गोंधळ

दिवाळीच्या सुट्टीचा गोंधळ

नाशिक | Nashik | शुभम धांडे

करोनामुळे (corona) जनजीवन विस्कळित झाले होते. त्यातच सर्व काही पूर्वपदावर आणण्यासाठी अनेक मार्गांनी प्रयत्न होत आहेत. मात्र करोनामुळे विस्कटलेली शिक्षणव्यवस्था (education system) पुर्वपदावर आणण्यासाठी महत्वाचा असलेला शिक्षण विभाग (department of education) आणि स्थानिक पातळीवर असणार्‍या संस्था, विभाग त्यांच्या वारंवार घेण्यात येणार्‍या निर्णयांमुळे चर्चेचा आणि विद्यार्थ्याच्या भविष्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरत आहे.

शिक्षण विभागाकडून ई-शिक्षणातल्या (e-learning) त्रुटी, शाळा (schools) सुरू करण्यासंदर्भात वारंवार बदललेले निर्णय, प्रत्यक्ष शिक्षण सुरू झाल्यावर तासिकांचा घोळ आणि आता त्यापाठोपाठ दिवाळीच्या सुट्यांमधील गोंधळ यामुळे त्यांच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाली आहेत.

दरम्यान दरवर्षी स्थानिक शिक्षण विभागाकडून पातळीवरील विचार करुन सुट्यांचे नियोजन (Vacation planning) करण्यात येते. मात्र शिक्षण विभागाबाबत निर्णय घेताना राज्य सरकारने समन्वय राखणे अत्यंत आवश्यक आहे. असे असताना राज्य पातळीवर परस्पर सुट्यांबाबत निर्णय जाहीर करत विभागात कोणते समन्वय नसल्याचे वारंवार दिसून येत आहे.

असमन्वयाचा फटका

बर्‍याच विद्यालयांमध्ये परीक्षा व इतर कार्यालयीन कामे सुरू असताना अचानक सरकारतर्फे शिक्षणाधिकार्‍यांना सुटीसंदर्भात आदेश देण्यात आले. त्यानुसार राज्यभरात 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर सुट्या लागू केल्या. त्यामुळे शाळांचे नियोजन कोलमडले, यामुळे शिक्षण खात्यातील असमन्वयाचा फटका सर्व शाळांसह विद्यार्थी व पालकांना बसला आहे.

बदलण्यात आलेले निर्णय

  • 25 ऑक्टोबर 2021 शिक्षण निरिक्षक मंडळचे परिपत्रक (जा. क्र. शिनि/दवि/शासु/2021/2514) 1 ते 20 नोव्हेंबर सुटी

  • 27 ऑक्टोबर 2021 शिक्षण निरिक्षक मंडळचे सुधारित परिपत्रक (जा. क्र. शिनि/दवि/शासु/2021/2557) 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर सुटी

  • 27 ऑक्टोबर 2021 महाराष्ट्र राज्य शासनाचे परिपत्रक (संकीर्ण-2021/प्र.क्र.142/एस.डी.-4) 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर सुटी

  • नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने माध्यमिक शाळांना 1 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत तर प्राथमिक शाळांना 25 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत सुट्या जाहीर केल्या होत्या.

  • महापालिका शिक्षण विभागाने प्राथमिक आणि माध्यमिक ला 1 ते 20 नोव्हेंबर सुटी लागू केली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com