नाशिकची हवा शुद्धच

तपासणी केंद्रांना मनपाचा अडसर
नाशिकची हवा शुद्धच

नाशिक | रवींद्र केडीया | Nashik

नाशिकच्या (nashik) हवेची गुणवत्ता (Air quality) ही प्रदूषित हवेच्या सीमेवर आहे. त्यावर वेळीच लक्ष दिले नाही तर नाशिकची हवा प्रदूषित (Air polluted) होण्यास वेळ लागणार नाही. झपाट्याने ढासळत असलेला नाशिकमधील हवेचा स्तर दिवसागणिक खालावत असल्याचे बोलले जात होते. मात्र प्रत्यक्षात समोर आलेल्या आकडेवारीनुसार नाशिकची गुणवत्ता समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणाद्वारे (Maharashtra Pollution Control) उभारण्यात येणारे संयंत्र हे हवेतील पीएम 10, पीएम 2.5, सीओ, एनओ, एनओ 2, एनएच 3, ओझोन (Ozone), व्हीओसी तसेच तापमान (Temperature), आर्द्रता (Humidity), सोलर रेडिएशन (Solar radiation), हवेचा वेग, हवेची दिशा ही माहीती गोळा करणार आहे. ही संपूर्ण माहीती या केंद्रातील संयंत्रामुळे उपलब्ध होणार आहे. यामुळे हवेची गुणवत्ता कोणत्या भागात खराब आहे. हे समजून येणार असल्याने ती सुधारण्यासाठी उपाय योजना करता येणार आहे.

ही हवेची गुणवत्ता तपासणी यंत्रणा (Air quality inspection system) उभारणीसाठी शहरातील, विविध 5 ठिकाणांची निवड करण्यात आलेली आहे. त्यात एक आयमा रिक्रिएशन सेंंटर (AIMA Recreation Center) परिसरात राहणार होते. त्यादृष्टीने प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजनही (bhumipujan) करण्यात आले होते. दुसरे केंद्र गुरु गोविंद सिंग कॉलेज (Guru Gobind Singh College) परिसरात उभारले जाणार असून, या संस्थेने जागा देत प्लिथंही उभी केली आहे. तिसरे केंद्र उद्योग भवन येथे, चौथे आरटीओ कॉलनी तर पाचवे मंडळाने दिलेल्या माहितीनुसार हे केंद्र अंबड सीएक्यूएमएस येथे उभारण्याचे प्रस्तावित आहे.

पहाणीच्या अहवालानुसार मुख्यतः पावसाळ्यानंतरच्या महिन्यांत (ऑक्टोबर ते फेब्रुवारी) कार्बन मोनोऑक्साइडचे (Carbon monoxide) प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त होत असते. हा कल जवळजवळ सर्व केंद्रांच्या पहाणीत दिसून आला. महाराष्ट्रात (maharashtra) औरंंगाबाद (Aurangabad), चंद्रपूर (Chandrapur) आणि नाशिक (nashik) येथे उभारलेल्या केंद्रातील अहवालानुसार कार्बन मोनोऑक्साइड तपासणी केंंद्रात नोंदवलेल्या कार्बन मोनोऑक्साइड प्रमाण हे विहित मानकांच्या मर्यादेत होते. त्यासोबतच कार्बन मोनोऑक्साइड प्रदूषणाच्या बाबतीत वांंद्रे, नागपूर, पुणे आणि सोलापूरला कार्बन मोनॉक्साईडचे वाढलेले प्रमाण कमी करण्यासाठी धोरण राबविण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

...तर निधी जाईल परत

प्रत्यक्षात नाशिकची हवा शुध्द असणे अपेक्षित आहे. ज्या प्रमाणात येथे वनराई उभारण्यात आलेली आहे. त्यामुळे येतील हवेची गुणवत्ताअधिक बारकाईने तपासता यावी, त्यासोबतच प्रदूषित भागावर लक्ष देता यावे, यासाठी शहराच्या विविध 5 ठिकाणांवर 24 तास कार्यरत असणारे हवा गुणवत्ता नियंत्रण यंत्रे बसविण्यात येणार होते. त्याकरिता विविध संस्थांनी जागाही देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, महापालिकेकडून ना हरकत दाखलाच दिला गेला नसल्याने, ही केंद्रे उभी राहू शकली नसल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सांगण्यात आले. त्यामुळे शासनाचा या केंद्रासाठीचा निधीही परत जाण्याची भिती वर्तवली जात आहे.

Related Stories

No stories found.